दिल्ली : भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते.
माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांचा जन्म दि.२६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ.सिंग यांनी सन १९४८ साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. सन १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर सन १९६२ साली डॉ.सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केले. त्यांचे इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे. सर्व सामान्यांचे मत आहे की, असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचा अल्पपरिचय- डाॅ.मनमोहन सिंह यांनी सन १९९१मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. डाॅ.मनमोहन सिंह यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट केलं. डाॅ.मनमोहन सिंह यांनी देशाला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ.मनमोहन सिंग यांना ओळखले जाते. डॉ.मनमोहन सिंग यांनी भारताचे १४वे पंतप्रधान होते. डॉ.मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे.
डॉ.मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात त्यांनी युएनसीटीएडी सचिवालयात काही काळ काम केले. यानंतर सन १९८७ आणि १९९० या काळात त्यांची जीनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. डॉ. मनमोहन सिंग यांनी सन १९७१ साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर सन १९७२ साली डॉ.मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी अर्थमंत्रालयात अनेक महत्वाची पदे भूषवली. यात अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद,रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद या पदांचा समावेश होता. यानंतर सन १९९१-१९९६ या पाच वर्षांच्या काळात ते भारताचे अर्थमंत्री होते. हा काळ स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो.डॉ.मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले धोरण तयार केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. डॉ.मनमोहन सिंग यांना सन १९८७ या काळात भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण मिळाला. त्यानंतर भारतीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान- १९९५, अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड- १९९३ आणि १९९४, केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार- १९५६, केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार, असे काही विशेष पुरस्कार मिळाले. याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बूनसारख्या अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्डसारख्या अनेक विद्यापीठांकडून डॉ.मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सन १९९३मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. डाॅ.मनमोहन सिंह यांनी सन २००४ ते २००९ असे दोन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवले. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक विकास आणि सामाजिक नियोजनावर विशेष भर देण्यात आला.
भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांचं दि.२६ डिसेंबर, गुरुवारी निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभरात शोककळा पसरली आणि राजकीय वर्तुळात सात दिवसांचा दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ.मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत आणि अध्यात्मांत त्यांना प्रचंड रस होता. डाॅ.मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली.
!! भारताचे महान नेते डाॅ.मनमोहन सिंग यांच्या पावन चरणी सप्ताहभर ही श्रद्धासुमने समर्पित !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा