डोंबिवली : आयुष्याच्या टप्प्यामधला पहिला टप्पा म्हणजे 'शिक्षण' आणि त्यानंतरचा महत्वाकांक्षी टप्पा म्हणजे 'नोकरी'. दोन्ही गोष्टीसाठी योग्य मार्गदर्शक लाभला तर योग्य मार्ग स्वीकारण्यास मदतच होते. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय डॉ.राजकुमार कोल्हे यांनी अशाच एका कार्यशाळेचे आयोजन 'जे एम एफ' च्या 'मधुबन' वातानुकुलीत दालनामधे केले. इयत्ता नववी पासून पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले जवळपास २०० विद्यार्थी या कार्यशाळेत हजर होते.
नोकरीसाठी मुलाखतीला जाताना कोणकोणत्या आवश्यक गोष्टींची कशी तयारी करायला पाहिजे त्याचे मार्गदर्शन डॉ.राजकुमार कोल्हे यांनी मुलांना केले. त्यामधे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा परिचय पत्रक (बायोडाटा/रेज्युमे) कसा असावा, त्याच बरोबर मुलाखतीला सामोरे जाण्याधी तुमच्यामधील आत्मविश्वास तुमच्या मनामधे आणि चेहऱ्यावर असला पाहिजे, असे डॉ.राजकुमार कोल्हे यांनी कार्यशाळेत उपस्थित मुलांना सांगितले.
मुलाखती दरम्यान दिशाभूल करणारे अनेक प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातात त्यासाठी गोंधळून न जाता विचार करून आत्मविश्वास पूर्वक त्याची उत्तरे द्या कारण त्या प्रश्नातच उत्तरे दडलेली असतात, तुमचा बायोडाटा (परिचय पत्रक) हा सुटसुटीत, नीटनेटका आणि संपूर्ण खऱ्या माहितीचा असावा व तो लिहण्याची पद्धत देखील कशी असावी याची माहिती देऊन डॉ.राजकुमार कोल्हे यांनी त्याबद्दलची चित्र फित दाखवली. त्याच बरोबर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सराव मुलखातीचे (मॉक इंटरव्ह्यू) देखील आयोजन केले.
सर्व उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी केले व त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ही कार्यशाळा सफ़ल करण्यासाठी प्राचार्य नाडर सर, प्रोफेसर गिरीष छगाणी, उपप्राचार्या वनिता लोखंडे, सर्व अध्यापक वर्ग यांनी सराव मुलाखतीचे आयोजन करण्यात मोलाचे सहकार्य करून अतिशय सुंदर रीतीने ही कार्यशाळा खूपच उपयुक्त अशी झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा