डोंबिवली - औषध विक्रेत्यास पोलीसांकडून जबरदस्ती दुकानातून बाहेर काढत दुकान बंद करण्याच्या निषेधार्थ शेकडो केमिस्ट बांधवांनी डोंबिवली पोलीस स्टेशनवर हल्लाबोल केला. आमदार राजेश मोरे, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी मेडिकल दुकानावर भविष्यात हेतूपूर्वक कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असे आश्वासन डोंबीवलीचे सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी यावेळी मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळला दिले. पोलीस प्रशासनाकडून संघटनेच्या सर्व मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या.
डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे चेअरमन निलेश वाणी, सचिव संजू भोळे, रेवाशंकर गोमतीवाल, विलास शिरूडे, राजेश कोरपे, लीना विचारे यांनी यावेळी प्रशासन समवेत चर्चा केली.
रात्रीच्या वेळी दुकानासमोर ग्राहकांची जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती प्रशासनाने यावेळी केली. नशेखोर यांची दिवसेंदिवस गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने रात्रीच्या वेळेस विनाकारण फिरणाऱ्या वर अंकुश बसने आवश्यक असल्याचेही पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा