BREAKING NEWS
latest

महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी केली कल्याण मधील महापालिकेच्या मराठी शाळांची पाहणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड  यांनी आज महानगरपालिकेच्या मनपा शाळा क्रमांक ३३ धाकटे शहाड, शाळा क्रमांक ६३ मिलिंद नगर, शाळा क्रमांक ६८ बारावे या तीन शाळांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान शाळा इमारत, वर्ग खोल्या, दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा तसेच शाळा परिसर यांची त्यांनी पाहणी केली आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी वर्ग सुरू असताना संवाद साधला. शाळेसंदर्भातील बाबी म्हणजे विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, शैक्षणिक सुविधा पुरविणे, शाळा इमारत सुसज्ज करणे याबाबत संबंधित अधिकारी व अभियंता यांना त्यांनी सूचना दिल्या, त्याचप्रमाणे विनापरवानगी रजेवर जाणाऱ्या शिक्षकांची विनावेतन रजा मंजूर करण्याबाबत व वेळेत शाळेत हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, तसेच वेळप्रसंगी निलंबित करण्याची कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्त इंदु राणी जाखड यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी  विजय सरकटे तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत