डोंबिवली: 'जे एम एफ' शिक्षण संस्थेच्या ब्रह्मा रंगतालय प्रांगणात शनिवार दि.२१/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळात १६ वा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. सौ.प्रेरणा कोल्हे, कोषाध्यक्षा कु. जाह्णवी कोल्हे, संस्थेचे व्यवस्थापक श्री. कुमार दुपटे, प्राचार्य डॉ. आर.एन.नाडार, उपप्राचार्या डॉ. वनिता लोखंडे, मुख्य समन्वयक मंजुला धवले, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मृणाली जाधव, करिष्मा कापडणे, भावेश बोमेरा, धनीषा भांगळे, खुशबू दूबे बक्षीस वितरण प्रमुख भारती गायकर, लक्ष्मी चव्हाण, आर.विजयालक्ष्मी, फॅशन शो प्रमुख विठ्ठल कोल्हे, राजकुमारी बांडे, ज्युनिअर कॉलेज प्रभारी प्राचार्य श्री. अल्पेश खोब्रागडे, उपप्राचार्य श्री. एकनाथ चौधरी, विद्यामंदिर उपप्राचार्या तेजावती कोटियन व इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचा आरंभ नटराज आणि सरस्वती पूजनाने झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवलीचे पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रशांत मोरे सो, डोंबिवलीतील नावाजलेले व्यक्तिमत्त्व श्री. दीपेश म्हात्रे, दीपक पांडे, लाभले होते. दोघेही प्रमुख पाहुण्यांनी कॉलेजच्या तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उत्कृष्ट कलाकार व टीव्ही फेम शान मिश्रा यांनीही उपस्थित राहून आपला बहुमूल्य वेळ दिला. तारुण्याचा उपयोग देश सेवेसाठी करावा असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आपली संगत कशी आहे व कशी असावी यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असते. आपली संगत जर चांगली असेल तर आपले व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. याकरिता त्यांनी आईन्स्टाईन आणि त्यांचे ड्रायव्हर यांचे उदाहरण सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात जवळजवळ २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि ८०० पेक्षा जास्त विद्यार्थी कार्यक्रमासाठी हजर होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रंगारंग कार्यक्रम करून विद्यार्थी व शिक्षकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश कांबळे सर व केसर थबे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम' ने झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा