कल्याण : गेल्या काही दिवसापासून ठाणे शहर पोलीस विभाग ऍक्शन मोडवर असल्याचे दिसून आले आहे. याचे मुख्य कारण वाढती गुन्हेगारी व नवीन वर्ष साजरा करण्यासाठी लोकं बाहेर पडत असून काही अनुचित घटना घडून अतिप्रसंग घडू नयेत यासाठी पोलीसांतर्फे कल्याण-डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उशिरा रात्री बिनकामाने मोकाट फिरणारे तसेच नशेखोर यांना लगाम घालण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कंबर कसली आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारी रात्री शंभर फुटी रोड कोळसेवाडी, डोंबिवली, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बिनकामाने फिरणारे नशेखोर यांच्यावर पोलीस उपायुक्तांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमध्ये रात्री उशिरा बिनकामाने फिरणारे आणि नशेखोर यांना पोलीस ठाण्यात नेऊन शंभर उठा बश्या काढून सोडण्यात आले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सध्या पोलीस विभाग ऍक्शन मोड वर असल्याने महिला वर्गांनी या कारवाईचे स्वागत आणि प्रशंसा केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा