BREAKING NEWS
latest

नव्या सरकारसमोर जलद महाराष्ट्रासाठी या प्रकल्पांचे आव्हान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. तसेच सत्ता स्थापन झाल्यानंतर नव्या महायुती सरकारसमोर अनेक प्रकल्पांचे आव्हानं देखील असणार आहे. जलद महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे जाळे उभारण्याचे नव्या सरकारपुढे आव्हान असणार आहे. तसेच त्यामध्ये अनेक प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असल्याचे दिसत आहे. 

राज्यात नुकतेच बहुमतांनी महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांचा शपथविधी सोहळा ५ सप्टेंबरला पार पडणार आहे. त्यानंतर राज्याच्या पुढच्या कामकाजाला जोरदार सुरुवात होणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. तसेच राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणायची असेल तर दळणवळणाच्या पायाभूत सुविधांचे जाळे उत्तम असणे आवश्यक असते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. मात्र असे अनेक मोठे प्रकल्प वेगाने राज्यात राबवण्याची गरज आहे.

मुंबई मधील वांद्रे ते विरार कोस्टल रोड किंवा विरार-अलिबाग कॉरिडॉर असू देत. तसेच मुंबई-गोवा महामार्ग किंवा पुणे-बंगळुरू एक्स्प्रेस-वे असू देत. तसेच पुण्याचा रिंग रोड प्रकल्प किंवा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग असो. असे अनेक प्रकल्प लवकरात लवकर जनतेच्या सेवेत येण्याची गरज आहे. त्यामुळे मेट्रो शहरांचा विचार केला असता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेगाने सुधारण्याची गरज आहे. मुंबईत अनेक मार्गांची कामे ही अतिशय हळुवार पद्धतीने सुरू आहेत. कारण जोपर्यंत ही मेट्रो मार्ग खुले होत नाही तोपर्यंत मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार नाही. त्यामुळे नवीन सरकारमध्ये शहर विकास, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी अशी अनेक खाती अतिशय कार्यक्षम आणि दूरदृष्टी लाभलेल्या नेत्यांकडे देण्यात येण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याला आजच्या गरजा भागवायच्याच आहेत, मात्र उद्याचा जलद महाराष्ट्र देखील घडवण्यासाठी पायाभरणी करायची आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत