भिवंडी - भिवंडी तालुक्यातील मौजे लोनाड गावाच्या हद्दीतील शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पॅरामाउंट लॉजीट्रेड गोदाम संकुलातील नाल्या मध्ये बिबट्या अडकून पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर पडघा पोलीस व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते. बिबट्या ला जेरबंद करणे कठीण असल्याचे निदर्शनास येताच मुंबई बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यु पथकास दुपारी बिबट्याला पकडण्यासाठी पाचारण करण्यात आले. ज्या ठिकाणी बिबट्या अडकून पडला होता ती जागा अरुंद बोळ असल्याने या बोळात क्रेनच्या सहाय्याने पिंजरा ठेवून दुसऱ्या बाजूने दिवाळीतील फटाक्याचे बॉम्ब फोडून मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वन विभागाचे कर्मचाऱ्यांना यश मिळाले.
त्या नंतर पिंजरा क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून बिबट्यास रेसक्यू पथकाच्या रुग्णवाहिकेत टाकून बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात घेऊन गेले आहेत. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पडघा वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा