डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने ३५७ कोटी १७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागली आहे. यामुळे २७ गावांना अनेक वर्षापासून भेडसावणारा पाणी प्रश्न पुढील अनेक वर्षासाठी सुटणार आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या २७ गावातील नागरिकांची अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नातून सुटका होणार असल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रोकांत शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना तीव्र पाणी टंचाई भेडसावत असल्याने नागरिकांकडून पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी होत होती. म्हणून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या त्रुटी दूर करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना केली जाणार आहे अशी विचारणा केली असता कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, निवडणूक प्रचारादरम्यान देखील २७ गावातील नागरिकांची ओढाताण प्रकर्षाने दिसून आल्यामुळे आमदार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात या भागासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर करावी तसेच पाण्याचा कोटा वाढविण्याची मागणी केली होती. तर या भागाचे कल्याण लोकसभा खासदार असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार बैठका घेत वाढीव निधी मंजूर करण्याकरिता सतत प्रयत्नशील होते. त्यांनी या योजनाचा वेग वाढवत पाणी प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या प्रयत्नानंतर या योजनेसाठीच्या वाढीव निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
२७ गावात २८ जलकुंभ, २ भूस्तर टाक्या आणि ११ पंप हाऊस, वितरण व्यवस्था यासारखी कामे करण्यासाठी राज्य शासनाने ३५७ कोटी १७ लाखाचा निधी मंजूर केला आहे. यामुळे मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेची कामे वेगाने पूर्ण होऊ शकणार आहेत. एकीकडे निधी मंजूर करतानाच ही सर्व कामे मे अखेर पर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून दिलेल्या मुदतीत कोणत्याही परिस्थितीत ही कामे पूर्ण करत नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्याचे निर्देशच आमदार राजेश मोरे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळेच नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेत त्याची तातडीने अंमलबजावणी केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉकटर श्रीकांत शिंदे यांचे आमदार राजेश मोरे आणि या २७ गावातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा