डोंबिवली : दिनांक ०१ जानेवारी रोजी नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना एका कुटुंबीयांचे २२ तोळे सोन्याचे दागिने व कपडे असलेली बॅग रिक्षात गहाळ झाल्याची तक्रार रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली होती.
मिळालेल्या माहिती नुसार अश्विनी अजय कृपेकर (वय: ४४ वर्षे), राहणार डोंबिवली (पूर्व) एमआयडीसी मानपाडा ते डोंबिवली रेल्वे स्टेशन रिक्षातून प्रवास करीत असताना त्यांच्या बॅगेतील २२ तोळे सोन्याचे दागिने असलेले ज्याची किंमत एकूण रुपये १८,५०,०००/- (अठरा लाख पन्नास हजार) तसेच कपडे असलेली बॅग रिक्षामध्ये विसरल्या असल्याबाबतची तक्रार रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाणे मध्ये देण्यात आली होती.
याप्रसंगी रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे, पोहवा. मंगेश वीर यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे तांत्रिक पद्धतीने त्या रिक्षा नंबरचा शोध घेऊन व रिक्षा चालकाचा पत्ता शोधून काढत तक्रारदाराचे २२ तोळे सोन्याचे दागिने व कपड्याची बॅग वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांनी त्यांना परत मिळवून दिली. तक्रारदारांनी डोंबिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा