पुणे : येथील स्टार्टअप कंपनी 'वेव मोबीलिटी' कडून ऑटो एक्सपोमध्ये भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार 'इवा' लाँच करण्यात आली आहे. वेव इवा ही एक छोटी कार आहे. ज्यामध्ये २ लोकं आणि एक लहान मूल बसू शकते. कंपनीचा दावा आहे की कार एका चार्जवर २५० किलोमीटरची रेंज देईल. ही ईवा ५ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रतितास वेग वाढवू शकते. इवाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹३.२५ लाख आहे, ज्यामध्ये सबस्क्रिप्शन प्लॅन म्हणून बॅटरीचा समावेश आहे.
त्याच वेळी, शुक्रवारी आयएक्स१ एलडब्लूबी लाँच केल्यानंतर, जर्मन लक्झरी ऑटोमेकर बीएमडब्ल्यू ने दुसऱ्या दिवशी ४ लाँच केले आहेत. यामध्ये मिनी कूपर एस जेएसडब्लू पॅक आणि नवीन बीएमडब्ल्यू एक्स३ या दोन कार लाँच करण्यात आल्या आहेत. याशिवाय एस १००० आरआर आणि आर १३०० जीएसए एडव्हेंचर या दोन बाईक्स सादर करण्यात आल्या. विनफास्टने भारतीय बाजारपेठेसाठी त्यांच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही व्हिएफ ६ आणि व्हिएफ ७ चे अनावरण केले आहे. दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये विमानाने प्रेरित डिझाईन आहे आणि त्यात केबिनसारखे कॉकपिट आहे. यात एज-टू-एज मूनरूफ देखील आहे.
याशिवाय, कंपनीने व्हिएफ ३, व्हिएफई३४, व्हिएफ८, व्हिएफ९ इलेक्ट्रिक एसयूव्ही, व्हिएफ वाईल्ड पिकअप ट्रक देखील प्रदर्शित केले आहेत. मात्र, या गाड्या भारतीय बाजारात दाखल होणार नाहीत. भारतासाठी सादर केलेल्या कार वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होऊ शकतात.
आज (१८ जानेवारी) इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चा दुसरा दिवस आहे. दिवसाची सुरुवात व्हिएतनामच्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी विनफास्टने केली. कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत आहे. व्हिएतनामी कंपनी सध्या तीन खंडांमधील १२ देशांमध्ये कार्यरत आहे. आज एक ६ सीटर फ्लाइंग टॅक्सी देखील दाखल होणार आहे, जी सरला एव्हिएशनने बनवली आहे. त्याचबरोबर पहिली सोलर कार इवा ही सादर करण्यात येणार आहे. याशिवाय ह्युंडाई मोटर इंडिया, बी वाय डी, बी एम डब्लू इंडिया, बजाज ऑटोसारखे ब्रँड त्यांच्या वाहनांचे प्रदर्शन करणार आहेत.
एक्स्पोच्या पहिल्या दिवशी, मारुती-सुझुकीने पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा सादर केली . त्याच वेळी, ह्युंडाई मोटर इंडियाने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार क्रेटा ईवी लाँच केली. यासह ऑटोमोबाईल कंपन्यांनी पहिल्या दिवशी ३० हून अधिक वाहने सादर केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा