भिवंडी : गुन्हे शाखा घटक-२ चे पोलीस पथक हे परिमंडळ ०२ भिवंडी मध्ये गस्त घालीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शशिकांत यादव यांना बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार हे चोरी केलेल्या तांबा मालाची विक्री करण्यासाठी 'क्विक बाईट हॉटेल'च्या समोर कल्याण कडुन भिंवडी कडे जाणाऱ्या रोडच्या कडेला एका टेम्पोसह उभे आहेत. सदर गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी १) लतीफ अरिफ खान (वय: ३१ वर्षे), राहणार. मुळगांव कंम्बोगी ता. बबलेसुर, जिल्हा-विजयपुर, राज्य-कर्नाटक २) संगप्पा नंदप्पा सिरमकोल (वय: ४४ वर्षे), राहणार. चोरापुर, पेंड हदकीगल्ली, जिल्हा-विजयपुर, राज्य-कर्नाटक यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी त्यांचे साथीदार पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी अमन खान व इतर यांचे मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपिंना विश्वासात घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी नारपोली पोलीस ठाणे हद्दीत ०३ व पडघा पोलीस ठाणे हद्दीत ०२ ठिकाणी घरफोडी व चोरीचे गुन्हे केले असून सदर ठिकाणी गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपी कडुन एकुण २१,४५,०००/- रूपये कींमतीचे तांब्याचे पाईप हस्तगत करण्यात करण्यात आले असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक-२, भिवंडीचे अधिकारी करीत आहेत.
सदरची कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे ठाणे शहर, शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शोध-१, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-२ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि. श्रीराज माळी, धनराज केदार, पोउपनिरी. रविंद्र पाटील, सपोउनिरी. सुधाकर चौधरी, पोहवा. शशिकांत यादव, वामन भोईर, सचिन जाधव, सुनिल सांळुखे, प्रकाश पाटील, साबिर शेख, पोशि. उमेश ठाकूर, अमोल इंगळे, विजय कुंभार, नितीन बैसाणे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा