डोंबिवली : पाेलीस स्थापना दिनानिमित्त ठाणे पाेलीस आयुक्तालयाकडून दिनांक २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२५ या आठवड्यात सायबर गुन्हे जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येताे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून जन गण मन विद्यामंदिर आणि ज्युनियर काॅलेज येथे 'सायबर गुन्हे जागृकता दिवस' साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात जे एम एफ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.राजकुमार काेल्हे, सचिव डाॅ.प्रेरणा काेल्हे, विष्णूनगर पाेलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री.दाभाडे, श्री.ओम देसाई (सायबर अवेअरनेस टिम), श्री. युवराज तायडे (विष्णु नगर पाेलीस स्टेशन), मुख्याध्यापक श्री.अमाेद वैद्य (राज्य मंडळ), उप-मुख्याध्यापिका तेजावती कोटीयन आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डाॅ. राजकुमार काेल्हे व डाॅ. प्रेरणा काेल्हे यांनी पाेलीस बांधवांना पाेलीस स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पाेलीस निरीक्षक श्री.दाभाडे यांनी सायबर गुन्हेगारीवर कशा प्रकारे मात करावी या विषयावर विद्यार्थ्यांना माेलाचे मार्गदर्शन केले. श्री.ओम देसाई (सायबर अवेअरनेस टिम) यांनी सध्या 'सायबर क्राईम' काेराेना काळातील काेविडच्या विषाणू सारखा पसरत आहे असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून कसा बचाव करता येईल या विषयी माेलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमाेद वैद्य यांनी केले व आभार प्रदर्शन डाॅ. तेजावती काेटीयन यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा