भिवंडी : निजामपुरा पोलीस ठाणे, भिवंडी येथील गुन्हा रजि.नं. ५७९/२०२४, भा.द.वि. कलम ४२०,३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असताना, त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत इसम नामे जब्बार अजीज जाफरी (वय: ५८ वर्षे), व्यवसाय: ऑप्टीक्स, राहणार. वाशिंद पूर्व, ता.शहापूर, जि.ठाणे यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले होते. त्याचेकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने वरील नमुद सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीकडुन एकुण ९,२८,०००/- रूपये किंमतीचे ११६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असुन सदर आरोपीने यापूर्वी निजामपुरा, नारपोली, भोईवाडा, भिवंडी शहर, विठ्ठलवाडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीत फसवणुकीचे ६ गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी श्री.अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शोध-१ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-२ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोउनि. रविंद्र बी. पाटील, पोहवा. शशिकांत यादव, किशोर थोरात, पोशि. उमेश ठाकुर, नितीन बैसाणे, मपोहवा. माया डोंगरे व श्रेया खताळ यांनी यशस्वीपणे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा