डोंबिवली: जाह्नवीज मल्टी फाउंडेशनच्या 'वंदे मातरम डिग्री कॉलेज' येथे काल दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी विज्ञानशाखा, वाणिज्यशाखा व मानव्यविद्याशाखा यांच्या सहयोगातून 'शाश्वत विकास' या विषयावरती एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आंतरविद्याशाखीय ज्ञानाचा शाश्वत विकास व्हावा हा उद्देश त्यामागे आहे असे मत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मांडले. 'वंदे मातरम डिग्री कॉलेज' डोंबिवली (प) येथे ही दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली, सकाळी आंतरराष्ट्रीय परिषदेची सुरुवात परिषदेचे प्रमुख अतिथी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी इतिहास प्रमुख डॉ. यादव गुजर सर आणि 'जाह्णवीज मल्टी फाउंडेशन' चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे सर यांच्या शुभहस्ते झाली.
सदरील आंतरराष्ट्रीय परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात आयोजित करण्यात आली होती, या आंतरराष्ट्रीय परिषदेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिक मुक्त परिषदेची रुपरेषा मांडण्यात आली परिषदेसाठी उपस्थित मान्यवरांना विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टाकाऊ गवतापासून कागद व पेन या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या इको फ्रेंडली उपक्रमाबाबत मान्यवरांनी खूप कौतुक केले .या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. परिन सोमानी (चेअरमन, एलओएसडी) इंग्लंड, डॉ. टेकेहिरो नाकामुरा (फोरम शिन एडुज) जपान, यांनी ऑनलाइन परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या तर डॉ. हरी कृष्ण मारम (अध्यक्ष इम्पेरियल कॉलेज बेंगळुरू), डॉ.मोजेस कोलेट (बांदोडकर कॉलेज ठाणे), डॉ.सुशीला विजयकुमार (प्राचार्य मंजुनाथ कॉलेज डोंबिवली), श्री. जयेश खाडे ( आयआयटी मुंबई), श्री. सुशील कुमार शर्मा, डॉ.विनायक राजे प्राचार्य के.बी.कॉलेज ठाणे. तसेच जाह्नवीज मल्टी फाउंडेशनच्या सेक्रेटरी डॉ. प्रेरणा कोल्हे मॅडम व खजिनदार जान्हवी कोल्हे मॅडम यांची विशेष उपस्थिती होती तर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आर एन.नाडार, उपप्राचार्या वनिता लोखंडे, मुख्य समन्वयक मंजुळा धावळे, ज्युनिअर कॉलेज प्राचार्य अल्पेश खोब्रागडे, आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समन्वयक विजयालक्ष्मी मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले तर परिषदेचे सूत्रसंचालन सुनिता पाटील, शरवरी, डॅा. रागिनी यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा