डोंबिवली : निळजे येथील लोढाहेवन सोसायटी येथील पाण्याचा गंभीर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. त्याबाबत सोसायटी सदस्यांची तक्रार श्री गजानन पाटील (उप-तालुका प्रमुख) यांच्या कडे वारंवार येत होती याच समस्याची दाहकता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कल्याण लोकसभा संसदरत्न श्रीकांत शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून आज अखेर या पाठपुराव्याला यश आले आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कामाचा उदघाटन समारंभ लोढाहेवन येथील स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता.
नागरिकांनी आता पाण्याच्या टँकर पासून सुटका आणि टँकर कायमस्वरूपी बंद झाल्याने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नागरिकांनी केलेला भव्य दिव्य सत्कार समारंभाने मन अगदी भारावून गेले आणि नागरिकांनी दिलेल्या या प्रेमळ सत्काराचे मनापासून स्वीकार करत आमदार राजेश मोरे यांनी लोढाहेवन वासीयांचे आभार मानले.
या प्रसंगी शिवसेना पक्षाचे युवा सेनेचे जितेन पाटील, अर्जुन पाटील, बंडू पाटील तसेच विविध पदाधिकारी, महिला आघाडी आणि अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा