मुंबई, १९ फेब्रुवारी २०२५: महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष आणि "बांबू मॅन" म्हणून ओळखले जाणारे पाशा पटेल यांनी आज Kya News मुंबई मुख्यालयाला सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी Kya News चे CEO देवेश गुप्ता, संपादक संदिप कसालकर, संचालक गौरव शेट्ये तसेच संपूर्ण Kya News टीम उपस्थित होती. पाशा पटेल यांनी कृषी, पर्यावरण आणि शाश्वत विकासासंबंधी विस्तृत चर्चा करतानाच माध्यमांची भूमिका, डिजिटल युगातील पत्रकारिता आणि स्थानिक पातळीवरील समस्यांवरील उपाययोजना याबद्दल आपले विचार मांडले.
Kya News तर्फे त्यांचे शाल आणि विशेष भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना माहिती मिळणे किती महत्त्वाचे आहे, तसेच शाश्वत कृषी धोरणांचा प्रभावी अंमल कसा होऊ शकतो, यावर त्यांनी भर दिला.
त्यांनी Kya News च्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सांगितले की, "हाइपर लोकल न्यूज माध्यमे ही समाजातील समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी प्रभावी ठरत आहेत आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा