डोंबिवली : जगात आठ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 'स्त्री' या शब्दाचाच अर्थ असा आहे की 'स' म्हणजे सशक्त आणि 'त्री' म्हणजे त्रिभुवनात जिची सत्ता आहे ती म्हणजे स्त्री. दिनांक ८ मार्च रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पुरुष शिक्षकांपेक्षा स्त्री शिक्षकांची संख्या जास्त असल्याकारणाने स्त्री शक्ती आणि विचारांचा सन्मान केला गेला. शाळा, महाविद्यालय मधील सर्व पुरुष शिक्षक व ऑफिस कर्मचाऱ्यांनी उत्तमरित्या महिला दिनाचे आयोजन व्यवस्थापन करून सर्व महिला शिक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. सर्व पुरुष शिक्षकांनी संपूर्ण मधुबन वातानुकुलीत दालन फुलांनी सजवले होते, सर्व महिलांचे आगमन होताच त्यांच्या कपाळाला केशरी गंध लावून त्यांचे औक्षण केले गेले.
संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सर्व महिला शिक्षकांना व्यासपीठावर स्थानापन्न होऊन त्यांचा सत्कार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि त्यांचे सहकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. वेद पुराणापासून स्त्री ला अनादी शक्तीचे रूप मानले गेले आहे आणि त्याचा उल्लेख देखील वेदांता मध्ये आहे. ब्रह्म देवाने ब्रह्मांड निर्माण केले परंतु प्रथम स्त्री ला म्हणजेच सरस्वतीला जन्मास घातले. केवळ मातृत्व प्राप्त झाले आहे म्हणून ती स्त्री नाही तर दोनच हात असून सुद्धा अष्टभुजा निर्माण करून सर्व गोष्टी बिनचूक पणे पुढे तारून नेते म्हणून ती सशक्त, प्रेमळ, वेळ प्रसंगी कणखर होते ती स्त्री. असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी वक्तव्य केले तर केवळ आजच्या एकाच दिवशी स्त्री ला सन्मान न मिळता ती ३६५ दिवसांची सन्माननीय देवी आहे असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
केवळ वडिलांचे नाव देऊन मुलांची ओळख पूर्ण होत नाही तर मातृत्वाच्या सोसलेल्या कळा, जिजाऊंसारखी दिलेली शिकवण, सावित्री बाईंनी दिलेला शिक्षणाचा वसा आणि वारसा यामुळे स्त्री ही कर्तृत्वाची जननी आहे म्हणून देवाधिकांना आजही त्यांच्या आईच्याच नावाने ओळखले जाते, त्यामधे गंगापुत्र भीष्म, देवकी नंदन कृष्ण, कौसल्या सूत श्रीराम, कुंती पुत्र अर्जुन अशा अनेक नामावली आहेत जिथे स्त्रीचा अलौकिक महिमा ऐकायला मिळतो आहे असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
सर्व पुरुष शिक्षकांनी सकाळ पासूनच स्वतः भेळ बनविण्यासाठी सर्व पूर्व तयारी चे नियोजन केले होते. सर्वजण एकजुटीने कार्यरत होऊन स्वादिष्ट अशी सर्वांना आवडणारी चटपटीत भेळ बनवली व सर्व उपस्थित महिला वर्गाला हातात आणून दिली. उखाणे घेणे, फॅशन शो, शाब्दिक कोडी, अशा अनेक प्रकारचे खेळ रंगले होते. प्राध्यापक एकनाथ चौधरी, प्राचार्य आमोद वैद्य, उप प्राचार्य अलपेश खोब्रागडे, शिक्षक योगेश शिरसाठ, तेजस पाटील, संकेत कुपटे, करण कोटा, वैभव सर, घनश्याम दादा, सोमेश भांगे, अमन, मोहीत आणि बाकीचे सर्व सहकारी शिक्षक वर्ग या सर्वांनी मिळून उत्तम आयोजन करून महिला दीन साजरा केला व सर्व महिला वर्गाला आनंद दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा