डोंबिवली : जगात ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिवस' म्हणून साजरा केला जातो. या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरपीएफ पोलीस स्टेशन डोंबिवली येथे तैनात असलेल्या महिला पोलीस दलातील कर्मचारी सदस्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर डोंबिवली रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला व महिलांच्या सुरक्षेबाबत 'स्मार्ट सहेली' अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षितता पाळण्याबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्या. महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त करत आरपीएफ पोलिसांचे आभार मानल्याची माहिती डोंबिवलीतील आरपीएफचे निरीक्षक गजेंद्र राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा