कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरातील डोंबिवली शहरात राहणारे शूरवीर शाहिद कॅप्टन. विनयकुमार सचान यांना मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना २४ मार्च २००३ रोजी वीरमरण आले. त्यामुळे २४ मार्च या दिवशी कॅप्टन. विनयकुमार सचान यांचे स्मृतीप्रित्यर्थ महापालिकेतर्फे डोंबिवली येथील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येते.
आज कॅप्टन विनयकुमार सचान यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांचे पिता राजाबेटा सचान यांनी कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्याचप्रमाणे मा.आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़, परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, डोंबिवलीतील पद्मश्री पुरस्कार विजेते गजानन माने, माजी पालिका सदस्य तात्या माने, रेखा चौधरी त्याचप्रमाणे हुतात्मा प्रतिष्ठानच्या वतीने निवृत्त लेफ्टनंट कमांडर सुनिल कांबळे तसेच इतर मान्यवरांनी देखील कॅ.विनयकुमार सचान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
सदर स्थळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत प्रदर्शित करण्यात आलेल्या युध्द नौका आय.एन.एस.विक्रमादित्य, आय.एन.एस. मोरमुगोआ, आय.एन.एस.करमुक या शीप मॉडेलची तसेच फायटर प्लेन सुखोई, राफेल, जग्वार, तेजस, मीग इत्यादींच्या प्रतिकृतींची मान्यवरांनी पाहणी करुन, विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.
या समयी महापालिका उपायुक्त रमेश मिसाळ, संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, संजयकुमार कुमावत व इतर अधिकारी वर्ग यांनी देखील कॅ.विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली.
हुतात्मा प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी यांनी देखील कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, इतर मान्यवर तसेच नागरीक बहुससंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा