BREAKING NEWS
latest

अयोध्येनंतर थेट शिवतीर्थावर सनईचे सूर – ३० मार्चला ऐकायला विसरू नका!

राममंदिराच्या उद्घाटनावेळी अयोध्येत सनईच्या सुरांनी वातावरण भारावून टाकणारे पंडित कल्पेश शंकर साळुके आता थेट शिवतीर्थावर सनई वाजवणार! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुळशी जोशी यांच्या विनंतीला मान ठेवून, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ३० मार्च रोजी मनसेच्या मेळाव्यापूर्वी साळुके यांचे सनईवादन होणार आहे. हिंदू संस्कृतीतील मंगल ध्वनी पुन्हा एकदा शिवतीर्थावर घुमणार असून, हा सोहळा विशेष ठरणार आहे.

याशिवाय, गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थ परिसरात हत्तीवरून साखर वाटण्याचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत