संदिप कसालकर (वार्ताहर)
मुंबईतील जोगेश्वरी शिवदर्शन एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित), डि वार्ड, जोगेश्वरी (पूर्व) या संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली असून, संस्थेतील पारदर्शक आणि न्याय व्यवस्थेसाठी योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य उमेदवार निवडा!
संस्थेच्या सध्याच्या व्यवस्थेतील अनियमितता आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी या निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. योग्य आणि पारदर्शी प्रशासनासाठी जबाबदार उमेदवार निवडण्याचा निर्धार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांची अधिकृत यादी:
प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत एकूण १६ उमेदवारांचे नाव आहे. यामध्ये भोगवेकर समीर माधवकर, चौहान अनिल भगवानदास, धोळम राजेंद्र मुकुंद, गुरव वसंत काशीराम, जाधव संतोष कृष्णा, मोटा जसुमती मुलचंद, पालव दीपक महादेव, परब उषा भीमसेन, पाटील सचिन पांडुरंग, पाटील उमेश पांडुरंग, राजपूत सुनीता महेंद्र, सावळा भरत ठकर्षी, मांडवकर छाया विष्णू, पडळेकर महेश अनंत, काडेचार बसवराज फकीरप्पा आणि गलांडे दादासाहेब आर या नावांचा समावेश आहे. या उमेदवारांनी संस्थेच्या पारदर्शक कारभारासाठी निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थेच्या आधीच्या कामगिरीचा आढावा:
- संस्थेने आणि विकासकाने येथील झोपडीधारकांना विश्वासात न घेऊन केलेल्या कामात आपल्या संघाने शासन दरबारी अनेक तक्रारी आणि त्याचा पाठपुरावा केला आहे.
- प्रकल्प ज्या मूळ दलालांमुळे लांबणीवर आला त्या मधुकर गोमणे बाबत शासन दरबारी तक्रार केली.
- २००८ साली शिवालिक व्हेंचर्स ह्या विकासकामार्फत प्रकल्पामध्ये दिरंगाई झाल्याने त्याचा पाठपुरावा केला.
- ओमकार व्हेंचर्स मार्फत करण्यात येणारा आपला प्रकल्प २०१८ पासून बंद आहे त्याचा आपल्या संघाने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.
- थकीत घरभाडे न दिल्यामुळे विकासकाच्या विक्री घटकांवर स्थगिती आणली.
- विक्री घटकांवर स्थगिती आणल्यामुळे आपल्या १०७ रहिवाश्यांना आपल हक्काचे घर मिळाले तसेच काही रहिवाश्यांना धकीत घरभाडे मिळवून दिले.
- १०७ रहिवाश्यांना धकीत घरभाडे मिळणे बाबत पाठपुरावा करत आहोत.
- तात्पुरत्या निवासस्थानी राहणाऱ्या रहिवाश्यांच्या वतीने न्यायालयात धाव घेतली.
- थकीत घरभाडे आणि हक्काचे घर लवकरात लवकर मिळावे यासाठी काही रहिवाश्यांच्या वतीने न्यायालयात धाव घेतली.
- कार्यक्षम नसलेल्या विकासकावर १३/२ मार्फत कारवाही करून नविन विकासकाची नेमणूक केली.
- कार्यक्षम नसलेल्या जुन्या कमिटिला बरखास्त केले जे आपल्या प्रत्येक तक्रारिवर विकासकाला सुरक्षित करण्यासाठी त्याच्या बाजूने एसआरएला नाहरकत पत्र देत होते.
- आपल्या प्रकल्पासाठी बिनकामाचा आणि परिसरातील लोकांना घातक असा RMC प्लांट नष्ट केला.
- अनेक रहिवाशांचे वारसपत्र बनवून दिले.
- स्थानिक लोकप्रतिनिधिंकडे वारंवार आपल्या प्रकल्पाचा आढावा घेतला.
स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता!
ही निवडणूक संस्थेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अनेक सभासदांनी या निवडणुकीत पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे मुद्दे प्राधान्याने पाहण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाची माहिती:
📅 मतदान दिनांक: २३ मार्च २०२५
⏰ वेळ: सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत
संस्थेच्या पुनर्विकासासाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी कोण निवडून येणार? कोणता गट विजय मिळवणार? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा