संदिप कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)
मुंबई | ११ एप्रिल २०२५ – शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनात उजळवलेली प्रेरणेची ठिणगी! आणि हीच ठिणगी तेवत ठेवणाऱ्या शिक्षकांमध्ये सेंट अर्नोल्ड हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या रोम्युला फिलिप पिंटोयांचे नाव आता गौरवाने घेतले जाते.
शैक्षणिक विभाग आयोजित "Quality Educational Video Competition" मध्ये त्यांच्या नावीन्यपूर्ण व्हिडीओने परीक्षकांची मने जिंकली आणि त्यांना तालुका स्तरावर प्रथम क्रमांक तर जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळवून दिला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना ११ एप्रिल रोजी, भायखळा येथील पेन्ग्विन ऑडिटोरियममध्ये मोठ्या सन्मानाने ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या समारंभात मुंबईभरातील २१८ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला होता, मात्र रोम्युला यांचा पराक्रम विशेष ठरला. पश्चिम उपनगर अधीक्षक दीपिका पाटील यांच्या हस्ते झालेला हा सन्मान, केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण शाळेसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा