BREAKING NEWS
latest

Ghibli स्टाईल AI इमेजेसमुळे पर्यावरण धोक्यात? सत्य वाचून धक्का बसेल!

संदिप कसालकर 

सध्या सोशल मीडियावर Studio Ghibli स्टाईलमध्ये AI द्वारे तयार केलेल्या इमेजेसची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे पर्यावरणीय धोके वाढत असल्याचा गंभीर इशारा AI तज्ज्ञांनी दिला आहे.

AI एक्सपर्ट हर्षित खंडेलवाल यांनी आपल्या LinkedIn पोस्टमध्ये म्हटले आहे की, अशा इमेजेस तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात डेटा प्रोसेसिंग होते, ज्यामुळे डेटा सेंटर्सचे ऊर्जा आणि पाणी वापरण्याचे प्रमाण वाढते. परिणामी, पर्यावरणीय संकट अधिक तीव्र होत आहे.

यासोबतच, Studio Ghibliचे सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांनी AI द्वारे कला निर्माण करण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. “ही जीवनाचा अपमान करणारी गोष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, अशा AI निर्मित इमेजेसमुळे मूळ कलाकारांच्या श्रमाचे आणि हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार अनेक तज्ज्ञ करत आहेत. काहींच्या मते, AI क्रिएशन्समुळे पारंपरिक हाताने तयार होणाऱ्या कलांचे महत्त्व कमी होत चालले आहे.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत