डोंबिवली : 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी २५ वर्षापूर्वी 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' ची कल्पना साकारली व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या डोंबिवली त्यासोबत नागपूर सारख्या शहरामध्ये 'जे एम एफ' शिक्षण संस्थेची स्थापना झाली. अथक परिश्रम, अनिश्चितता, प्रयास या सर्व गोष्टींवर मात करून 'जे एम एफ' संस्था ही शिक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड ठरला. दिनांक २१ मार्च हा दिवस म्हणजे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांचा वर्धापन दिवस. ह्याच अनुषंगाने दरवर्षी 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'गुरुकुल दिवस' म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

यावर्षी देखील जन गण मन इंग्लिश माध्यमिक शाळा तसेच विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात सकाळी साडे आठ ते साडे दहाच्या वेळेमध्ये गुरुकुल दिवस साजरा करण्यात आला. सर्व मुले शुभ्र पोशाख परिधान करून आली होती तर काही मुले देवी देवतांचे वेशात आले होते. पंचविसाव्या रजत महोत्सवी व डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या वर्धापन दिनी डॉ. राजकुमार कोल्हे यांचे लेझिम, देव देवतांच्या पुष्प वर्षावाने स्वागत करण्यात आले, त्याच बरोबर डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, नागपूर येथे शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक श्री.परशुराम भांगे, सौ.पुष्पा भांगे, व इतर सर्व पदाधिकारी व अतिथी गण यांचेही स्वागत करण्यात आले. बाल वयातील देवी देवता बनून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे 'जे एम एफ' संस्थेच्या प्रांगणात जणू स्वर्गच अवतरला होता. सर्व पाहुणे मंडळींचे व्यासपीठावर आगमन झाले, सरस्वती पूजन करून व मान्यवरांना पुष्प गुच्छ देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

'गुरुकुल दिवस' असल्या कारणानें जन गण मन विद्यामंदिर मधील इयत्ता पाचवी, सहावी च्या विद्यार्थ्यांनी गुरू गीत गायन केले, तसेच गुरु शिष्य वर आधारीत 'द्रोणाचार्य - एकलव्य ' ची नाटिका सादर केली. नाट्य विभागाचे शिक्षक नितेश मेस्त्री यांच्या दिग्दर्शन व मार्गदर्नाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या भूमिका निभावल्या. नृत्य देखील सादर केले गेले. गुरुविण कोण दाखवी वाट..आयुष्याची शिदोरी म्हणजे 'ज्ञान'. गुरु शिष्यचं नातं हे अलगद पडणाऱ्या आळवा वरच्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे असते, हळुवार पणे टिपून घेऊन ज्ञान आत्मसात करणे म्हणूनच आज माझ्या षष्ठीपूर्ती समारंभात गुरुकुल दिवस साजरा होत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे आणि हीच अमूल्य ज्ञानरुपी भेटवस्तू सर्व गुरु शिष्यांकडून मला आज मिळाली आणि ती आयुष्यभर मिळतच राहणार असे उद्गार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले. 'जे एम एफ' संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे त्या कारणाने संपूर्ण 'जे एम एफ' ची आठ मजली इमारत ही शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षकांनी फुलांनी सजवली होती. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले.

नुकताच भव्य दिव्य असा प्रति 'महा कुंभमेळा' जे एम एफ ब्रह्मा रंगतालया मध्ये साजरा केला गेला होता, त्या प्रति कुंभमेळ्याची नोंद घेत 'ग्लोबल बुक्स ऑफ एक्सेलन्स' च्या सौजन्याने अध्यक्ष डॉ. मनीष कुमार जी यांच्या हस्ते डॉ. राजकुमार कोल्हे व डॉ प्रेरणा कोल्हे यांना
'ग्लोबल बुक ऑफ एक्सेलन्स वर्ल्ड रेकॉर्ड इंग्लंड' जागतिक नोंदीचा सन्मानीय पुरस्कार देण्यात आला. पंचवीस वर्षातील ही एक ऐतिहासिक घटना च म्हणावी लागेल. त्याच बरोबर रजत महोत्सव निमित्ताने सर्व विद्यार्थी, पालक शिक्षक वर्ग यांना 'सुवर्ण नाणे' भेट देण्यात आले.

संध्याकाळच्या सत्रामध्ये षष्ठीपूर्ती दायी या आलिशान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे फुलांनी सजवलेल्या आरास मधून सर्व शिक्षकांनी फुलाच्या पाकळ्या वर्षावून स्वागत करण्यात आले. काल्पनिक गोष्टीमध्ये 'राजकुमार' सगळेच बघत असतात परंतु प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने 'राजकुमार' चा प्रवेश झाला आणि माझ्या जीवनाचे सार्थक झाले, असे सांगून सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी डॉ. राजकुमार कोल्हे यांच्यावर लिहिलेली स्वरचित कविता उपस्थितांना वाचून दाखवली व षष्ठीपूर्तीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
माझ्यासाठी माझे वडील म्हणजे 'आयुष्य घडवणारा शिल्पकार' आहे. लहानपणापासून मी त्यांना कधीही आराम करताना बघितले नाही, सतत नवनवीन गोष्टी शोधून त्यात कसे आपले योगदान देता येईल असे कार्यरत असलेले माझे वडील आज साठाव्या वर्षी देखील तेवढ्याच उस्फुर्ततेने अजूनही नाविन्याचा शोध घेत कार्यरत आहेत यासाठी मला त्यांचा खूप अभिमान वाटतो, असे उद्गार डॉ. राजकुमार कोल्हे यांची कन्या खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी काढले व वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा दिल्या. अनेकांनी डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. गौरव कळंबे यांनी मामा बद्दलची आदरयुक्त भीती, प्रेम आणि बालपणीच्या गंमती जंमती सांगून आठवणींना उजाळा दिला. नृत्य शिक्षक अभिषेक देसाई आणि दीपाली सोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शालेय व महाविद्यालयीन शिक्षकांनी डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या आवडीची निवडक अशी साठ गाणी घेऊन नृत्य सादर केले, त्यामधे स्वतः डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील छोटेखानी नृत्य सादर केले तर नितेश मेस्त्री व संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी नाट्यगीत सादर केले.
'गुरुकुल दिन उत्सव' - परंपरा आणि गौरवशाली यशाचा सोहळा
यावर्षीचा 'गुरुकुल दिन' उत्सव अतिशय भव्य आणि ऐतिहासिक ठरला. हा दिवस आदरणीय अध्यक्ष महोदयांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त आणि विश्वस्त संस्थेच्या रौप्य जयंतीनिमित्त विशेष महत्त्वाचा होता. हा सोहळा परंपरा, संस्कृती आणि नवनवीन विक्रमांनी सजलेला होता, जो उपस्थित प्रत्येकाच्या मनात कायम कोरला जाईल.
'फुलांचा अनोखा सन्मान' - श्रद्धा आणि सन्मानाचे प्रतीक
या प्रसंगी वार्षिक फुलांचा भव्य स्टँड उभारण्यात आला, जो अध्यक्ष महोदयांच्या योगदानाचा आणि संस्थेच्या २५ वर्षांच्या प्रवासाचा साक्षीदार ठरला. विविध रंगीबेरंगी फुलांनी सजलेला हा वर्षा गणिक गोल राजकुमार सर यांच्या जीवनाचा व संस्थेच्या प्रगतीचा आणि संस्कृतीचा परिचय देत होता. जसे हे फूल सुगंध दरवळवतात, तसेच 'जन गण मन शाळा' आणि 'वंदे मातरम डिग्री कॉलेज' ने समाजात ज्ञानाचा सुगंध पसरवला आहे.
'सांस्कृतिक कार्यक्रम' - प्रतिभेचा व परंपरेचा अनोखा संगम
गुरुकुल दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुंदर नृत्य, भावपूर्ण गायन, आणि मनाला भावणारे एकलव्याच्या जिवणी नाट्यप्रयोग सादर केले. भारतीय संस्कृतीतील विविध कलांची सुंदर प्रस्तुती पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. या कार्यक्रमांनी जन गण मन शाळा आणि वंदे मातरम डिग्री कॉलेज च्या शिस्त, समर्पण आणि निष्ठेचा ठसठशीत ठसा उमटवला.
'विशेष जागतिक विक्रम' - ऐतिहासिक सोहळा
या कार्यक्रमात एक अभिमानास्पद क्षण म्हणजे 'ग्लोबल बुक ऑफ एक्सेलन्स वर्ल्ड रेकॉर्ड' स्थापन करण्याची ऐतिहासिक कामगिरी! हा विक्रम संस्थेच्या सामूहिक एकजुटीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक ठरला. हा विक्रम कुंभमेळ्याच्या प्रतिकृती साठी देण्यात आला. शिक्षण, कला किंवा सामाजिक कार्य यातील कुठल्याही क्षेत्रात असो, तो जन गण मन शाळा आणि वंदे मातरम डिग्री कॉलेज च्या उज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी टप्पा ठरेल.
अध्यक्ष महोदयांचे हृदयस्पर्शी भाषण आणि विशेष नृत्य सादरीकरण
कार्यक्रमाचा सर्वांत भावनिक क्षण म्हणजे अध्यक्ष महोदयांचे भाषण. त्यांनी जन गण मन शाळा आणि वंदे मातरम डिग्री कॉलेजच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या प्रवासाच्या आठवणींनी भरलेले अनुभव सांगितले. त्यांच्या शब्दांतून संघर्ष, यश, मूल्ये आणि संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेली शाळा व कॉलेज साठी असलेली त्यांची निष्ठा स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
त्यानंतर अध्यक्ष महोदयांनी "जीना यहाँ, मरना यहाँ इसके सिवा जाना कहा.." या गाण्यावर एक खास नृत्य सहकार्यांसोबत सादर केले. त्यांच्या सहज, भावनिक आणि अप्रतिम सादरीकरणाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले. हे नृत्यप्रदर्शन केवळ एक परफॉर्मन्स नव्हता, तर संस्थेच्या ध्येय आणि समर्पणाचा जिवंत संदेश होता.
'चिरंतन आठवण' : नाव कोरलेले रौप्य नाणे
या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मरणार्थ विशेष रौप्य नाणी तयार करण्यात आली, ज्यावर सहभागी मान्यवरांची व्यक्तिगत नावे कोरली गेली. ही नाणी 'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' च्या जन गण मन शाळा आणि वंदे मातरम डिग्री कॉलेजच्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीची साक्ष देत होती. या स्मृतीचिन्हाने प्रत्येकाला या ऐतिहासिक क्षणाचा अभिमान वाटला.
अष्टप्रधान मंडळ आणि नवरत्न दरबार पुढील पिढीवर सोपविण्याचे महत्त्व
इतिहासात अनेक महान राजे व सम्राटांनी आपल्या राज्यव्यवस्थेस अधिक सक्षम आणि प्रभावी बनवण्यासाठी कुशल सल्लागार व विद्वानांची निवड केली. मराठा साम्राज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले अष्टप्रधान मंडळ आणि मुघल सम्राट अकबराने निर्माण केलेला नवरत्न दरबार हे त्याचे प्रमुख उदाहरणे आहेत. या व्यवस्थांमुळे प्रशासन अधिक कार्यक्षम बनले आणि राज्यविस्तार शक्य झाला. परंतु या संस्थांचा पुढच्या पिढीकडे योग्यरीत्या हस्तांतरण होणे हे अत्यंत महत्त्वाचे होते.
अष्टप्रधान मंडळाचे पुढील पिढीकडे हस्तांतरण कु. जाह्नवी, अल्पेश व मयुरी, सोमेश्, विठ्ठल, तेजावती, वनिता, ज्योती, महेश, मयुरा याच्यावर 'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' ची धुरा सोपविण्यात आली. या प्रसंगी नागपूर वरून देखील बरीच गणमान्य उपस्थित होते.

उपसंहार -
गुरुकुल दिन हा केवळ एक उत्सव नव्हता, तर तो एक संस्कृती, परंपरा आणि यशाचा सोहळा होता. अध्यक्ष महोदयांचा ६०वा वाढदिवस आणि विश्वस्त संस्थेची रौप्य जयंती या दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांनी 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' च्या उज्ज्वल प्रवासाला नवा आयाम दिला. हा सोहळा उपस्थित प्रत्येकाच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला आणि 'जाह्नवीज मल्टी फाउंडेशन' च्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन प्रेरणा देऊन गेला.
जन गण मन कान्वेंट स्कूल दावसा येथे देखिल डॉ. राजकुमार कोल्हे सर यांच्या षष्ठीपूर्ति व संस्थेला २५ वर्ष सुरू झाल्या निमित्त गुरूकूल दिवस व ईतर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला व त्याचा आनंद आम्ही आनलाईन घेतला. मुलांना व कर्मचारीवर्ग ला केक, चाकलेट देखील वाटण्यात आला. कर्मचारीवर्गाला ल रौप्य नाणे भेट म्हणून देण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी षष्ठी पूर्ती आणि रौप्य महोत्सव निमित्ताने सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 'चांदीचे नाणे' परतीची भेटवस्तू म्हणून स्वतःच्या कर कमलाने प्रदान केले. 'जे एम एफ' संस्थेमध्ये 'न भूतो न भविष्यती' असा आगळा वेगळा षष्ठी पूर्ती आणि रौप्य महोत्सव सोहळा धुमधडाक्यात पार पडला.