BREAKING NEWS
latest
latest news लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
latest news लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंत्रालयात जायचंय? आधी ‘डिजीप्रवेश’ ॲपवर नोंदणी करा, नाहीतर प्रवेश बंद!


मुंबई, दि. २७ : मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून, आता प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲपचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे अभ्यागतांना आता पूर्वनियोजित वेळेनुसार आणि ठराविक विभागातच प्रवेश मिळणार आहे.

काय आहेत नवीन नियम?

  • अभ्यागतांना केवळ संबंधित विभागात आणि ठरलेल्या वेळेतच प्रवेश करता येणार.

  • अनधिकृत ठिकाणी फिरताना आढळल्यास कारवाई होणार.

  • मंत्रालयातील काम संपल्यावर निर्धारित वेळेत बाहेर पडणे बंधनकारक.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा

  • दुपारी १२ वाजता प्रवेश दिला जाणार.

  • स्वतंत्र रांगेची सुविधा उपलब्ध.

  • वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

सर्वसामान्य अभ्यागतांसाठी प्रवेश नियम

  • दुपारी २ नंतरच प्रवेश मिळेल.

  • ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे ऑनलाइन प्रवेश पास घ्यावा लागेल.

  • आधार कार्ड, वाहन परवाना किंवा पॅन कार्ड यांसारखे ओळखपत्र आवश्यक.

स्मार्टफोन नसलेल्या किंवा अशिक्षित व्यक्तींसाठी मदत केंद्र

  • गार्डन गेट येथे विशेष मदत केंद्र सुरू.

  • ऑनलाईन नोंदणी व मदतीसाठी एक खिडकी उपलब्ध.

‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे नोंदणी कशी करावी?

  1. Play Store किंवा Apple Store वरून ॲप डाऊनलोड करा.

  2. आधार क्रमांकाच्या आधारे छायाचित्र ओळख पटवून नोंदणी करा.

  3. संबंधित विभागासाठी स्लॉट बुक करून QR कोड प्राप्त करा.

  4. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर QR कोड दाखवून RFID कार्ड मिळवा.

  5. सुरक्षा तपासणी झाल्यावर प्रवेश मिळेल.

  6. बाहेर जाताना RFID कार्ड परत करणे बंधनकारक.

नवीन प्रणालीचे फायदे

  • प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता व वेग.

  • सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम.

  • रांगेशिवाय जलद प्रवेश.

‘डिजीप्रवेश’ ॲपमुळे मंत्रालयात प्रवेश अधिक सोपा आणि सुरक्षित होणार असून, नवीन प्रणालीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

जोगेश्वरीच्या समस्या सरकारच्या डोळ्यांसमोर, पण उपाय शून्य? आमदार बाळा नर यांचा सवाल!


संदिप कसालकर (वार्ताहर)

मुंबई: जोगेश्वरी (पूर्व) हा मुंबईतील सतत समस्यांनी ग्रस्त असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. येथे पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, आणि सामाजिक योजनांमधील त्रुटी यांसारख्या गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, सरकारकडून यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार अनंत (बाळा) नर यांनी २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यक्त केली.

पाणीटंचाईचा प्रश्न भीषण – जबाबदार कोण?

मुंबईत ४,६०० ते ४,८०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना फक्त ४,००० दशलक्ष लिटरच पाणी मिळत आहे. त्यातील ६०० ते ८०० दशलक्ष लिटर पाणी जोगेश्वरीसारख्या भागांपर्यंत पोहोचतच नाही! वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी नवीन जलाशयांची गरज असताना सरकार गप्प का? असा सवाल त्यांनी सभागृहात विचारला.

संजय गांधी निराधार योजनेत अन्याय – गरीब वंचित!

गरजू नागरिकांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील उत्पन्न मर्यादा आजही २५,००० रुपये इतकीच आहे. आजच्या काळात ही रक्कम एका लहान मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठीही अपुरी आहे. ही मर्यादा ६०,००० रुपये करण्याची गरज असताना सरकार निर्णय का घेत नाही? तसेच, २००५ नंतर गरिबीरेषेखालील नागरिकांची यादीच तयार करण्यात आलेली नाही, त्यामुळे अनेक गरीब कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

वाहतूक कोंडी आणि बेवारस गाड्या – प्रशासन झोपेत?

जोगेश्वरीत वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न बनला आहे. रस्त्यांच्या कडेला अनधिकृत पार्किंग आणि वर्षानुवर्षे पडून असलेल्या जुन्या गाड्यांमुळे वाहतूक ठप्प होते. या गाड्या उचलण्यासाठी आणि ठेवण्यासाठी ट्राफिक विभागाकडे कोणतीही व्यवस्था नाही, हे गंभीर वास्तव आमदार नर यांनी अधोरेखित केले.

जोगेश्वरीकरांसाठी सरकार कधी जागं होणार?

महत्त्वाचे निर्णय घेणारे सरकार आणि प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने जोगेश्वरीकर आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. पाणी, वाहतूक आणि सामाजिक योजनांतील त्रुटी यावर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार अनंत (बाळा) नर यांनी केली.

जोगेश्वरीचा विकास हा केवळ घोषणांपुरता राहणार की प्रत्यक्ष कृती होणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

अंधेरी एमआयडीसीला पुन्हा आगीचा धक्का! काय आहे वारंवार लागणाऱ्या आगीचं सत्य?


मुंबई: संदिप कसालकर 

अंधेरी एमआयडीसीत पुन्हा आगीचा हाहाकार! न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग, दोन अग्निशमन जवान जखमी (Fire Breaks Out in Andheri MIDC, Two Firefighters Injured)

मुंबई (Mumbai) – अंधेरी पूर्व एमआयडीसी (MIDC industrial area) पुन्हा एकदा आगीच्या संकटाने धोक्यात आला आहे! न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट (New Nand Industrial Estate Fire) परिसरातील एका कंपनीच्या इमारतीत शनिवारी सकाळी अचानक आग (fire) लागली आणि काही क्षणांतच संपूर्ण इमारत (building) जळून खाक झाली. या आगीत दोन अग्निशमन दलाचे जवान (firefighters) जखमी (injured) झाले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार (treatment) सुरू करण्यात आले आहेत.

कशी लागली ही आग? (Cause of Fire Incident in Andheri MIDC)

सकाळी अचानक कंपनीच्या G+2 मजल्यांच्या इमारतीत (G+2 building) काळ्या धुराचे लोट (black smoke) निघू लागले. काही मिनिटांतच रब्बर आणि प्लास्टिकचा साठा (rubber and plastic stock) असलेल्या या ठिकाणी आगीने प्रचंड स्वरूप धारण केले. इमारतीचा काही भाग कोसळला (building collapse in MIDC) असल्याने बचावकार्य (rescue operation) अधिक कठीण बनले.

अग्निशमन दलाची शर्थीची मेहनत (Mumbai Fire Brigade Action)

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (Mumbai Fire Brigade) तातडीने २० गाड्या (fire trucks) आणि पाण्याचे टँकर (water tankers) घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, बचाव मोहिमेदरम्यान (rescue operation) इमारतीचा काही भाग कोसळल्याने (partial building collapse) दोन जवान जखमी झाले. सुदैवाने, मोठा अनर्थ टळला (major disaster averted).

एमआयडीसीत वारंवार आगीच्या घटना (Frequent Fire Accidents in MIDC), जबाबदार कोण? (Who is Responsible?)

अंधेरी एमआयडीसी (Andheri MIDC) परिसरात गेल्या काही महिन्यांत आगीच्या घटना (fire incidents) सातत्याने घडत आहेत. फेब्रुवारी 2024 (February 2024) मध्ये एका गोडाऊनला भीषण आग (massive warehouse fire) लागली होती, त्यानंतर मार्च महिन्यात (March 2024) आणखी एका कंपनीत मोठा स्फोट (industrial explosion) झाला. आता पुन्हा न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट (New Nand Industrial Estate Fire) मधील ही दुर्घटना, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह (administration failure) उपस्थित झाले आहे.

प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाकडून उत्तरदायित्वाची टाळाटाळ? (Negligence by Authorities and Company Management)

या घटनेनंतरही कोणावर जबाबदारी निश्चित केली जाणार का? की नेहमीप्रमाणे तपास सुरू असल्याचे (investigation is ongoing) सांगून प्रकरण धुळीला मिळणार? एमआयडीसी भागातील (MIDC industrial area) कारखाने आणि गोडाऊनमध्ये सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष (safety violations) केल्याने अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

नागरिकांचा संताप – ‘आम्ही सुरक्षित आहोत का?’ (Public Anger - Are We Safe?)

वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये (local residents) भीतीचे वातावरण आहे. ‘कुठल्याही क्षणी आणखी एक आगीची दुर्घटना (fire accident) होऊ शकते, मग प्रशासन झोपले आहे का?’ असा सवाल नागरिक विचारत आहेत. संबंधित विभागाने (concerned authorities) जबाबदारी स्वीकारून योग्य ती पावले उचलली नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

अंधेरी गॅस गळती दुर्घटना: जळते शरीर, उद्ध्वस्त स्वप्नं आणि मदतीसाठी हंबरडा!


मुंबई: संदिप कसालकर

मुंबईतील अंधेरी पूर्व येथे ९ मार्चच्या रात्री झालेल्या भीषण गॅस गळतीमुळे २२ वर्षीय अरविंद कैथल याच्या आयुष्याला काळोखाने ग्रासले आहे. या दुर्घटनेत ८०% भाजलेल्या त्याच्या मित्राचा मृत्यू झाला, तर अरविंद ५५% भाजलेल्या अवस्थेत जीवासाठी झुंज देत आहे. पण त्याच्या कुटुंबासमोर आता जखमांइतकीच मोठी समस्या उभी राहिली आहे – उचलू न शकणाऱ्या रुग्णालयाच्या बिलांची!

आयुष्याचा संघर्ष आणि वाढते हॉस्पिटल बिल

अरविंदला राष्ट्रीय बर्न्स सेंटर, ऐरोली येथे दाखल करण्यात आले आहे. त्याचा रोजचा उपचार खर्च १ लाखांहून अधिक आहे. टाटा ट्रस्टने काही खर्च उचलला असला तरी औषधांसाठी अजूनही मोठी रक्कम भरावी लागते. त्याच्या वडिलांचा हातमजुरीवर संसार आहे, तर भावांची मिळकत फक्त कुटुंब चालवण्यापुरतीच आहे.

"आमची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. आम्ही भावाला वेदनेत तडफडताना पाहतोय, पण त्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च कोठून आणायचा?" अरविंदचा भाऊ अरुण कैथलने व्यथा मांडली. "नेत्यांनी मदतीचं आश्वासन दिलं, पण मिळालेलं काहीच नाही. फक्त औषधांसाठीच ६६,००० रुपये भरावे लागले आहेत, आणि अजून किती भरणार ते माहीत नाही!"

विजयाचा आनंद…आणि क्षणार्धात पेटलेल्या जखमा!

त्या रात्री भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामना पाहून अरविंद आणि त्याचा मित्र अमन सरोज दुचाकीवर घरी जात होते. शेर-ए-पंजाबजवळ अचानक गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला आणि काही क्षणांतच दोघे पेटलेल्या अवस्थेत जमिनीवर फेकले गेले!

"आम्ही दोघं आनंदात होतो. पण काही क्षणांत माझा मित्र जळून कोळसा झाला आणि मी मृत्यूशी झुंज देतोय," अरविंदच्या डोळ्यात अश्रू तरळले. अमनने अखेरचा श्वास १० मार्चला घेतला.

चुकीचं कोणाचं? जबाबदारी कोण घेणार?

या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, महानगर गॅस लिमिटेडच्या पाइपलाइनमध्ये गळती झाली होती. बीएमसीच्या एका ठेकेदाराने परवानगीशिवाय ड्रेनेजसाठी खोदकाम केलं होतं, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. पोलिसांनी संबंधित ठेकेदाराला अटक केली आहे, पण या निष्काळजीपणाची किंमत कोण देणार?

माझ्या भावाला वाचवा... आम्हाला मदतीची गरज आहे!

अरविंद आता आयसीयूमधून बाहेर आला असला तरी पुढील उपचारांसाठी मोठी रक्कम लागणार आहे. त्याच्या कुटुंबाने सरकार, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य जनतेला मदतीसाठी हाक मारली आहे.

"आमचा भाऊ जगण्यासाठी लढतोय, कृपया कोणी तरी मदत करा!" – भावनिक हाक देत त्याचे नातेवाईक आसवांनी डोळे भरून घेत आहेत.

साप्ताहिक राशिफल - 25 अगस्त से 31 अगस्त


मेष 
व्यवसाय: अटके कार्यो में गति आएगी एवं प्रसन्नता बनी रहेगी। धन की प्राप्ति होगी। कार्य की अधिकता बनी रहेगी, जिससे आपको नए प्रोजेक्ट्स पर काम करने का मौका मिलेगा।अनावश्यक खर्चे भी बढ़ सकते हैं।व्यापार में मेहनत अधिक रहेगी एवं नौकरी में संतुष्टि मिलेगी।
करियर और बिजनेस में लाभ मिलने के आसार नजर आ रहे हैं।अथॉरिटेटिव होकर निर्णय लें, सफलता मिलेगी.    
स्वास्थ्य: मुंह में छाले, कान दर्द एवं पैर के पंजों में दर्द होगा।
प्रेम: साथी से उलाहना मिल सकती है

वृषभ 
व्यवसाय: व्यापारी वर्ग के जातकों के लिए दिन बहुत ही शुभ रहने वाला है। नौकरीपेशा वर्ग के लोगों के लिए इस हफ्ते आय के अतिरिक्त स्रोत बनने वाले हैं।आपको करियर और बिजनेस से जुड़ा कोई बड़ा मौका मिल सकता है। साथ ही आपकी प्रतिष्ठित लोगों से जान पहचान बढ़ेगी।शत्रु परेशान करेंगे एवं आय की कमी के साथ, व्यय की अधिकता रहेगी। निकट के लोग धोखा दे सकते हैं।व्यापार में नए प्रस्ताव प्राप्त होंगे। नौकरी में बदलाव सही नहीं है।
स्वास्थ्य: कमर दर्द की समस्या हो सकती है।
प्रेम: जीवन में साथी का व्यवहार उचित नही रहेगा। वैवाहिक प्रस्ताव स्वीकार नहीं होंगे।

मिथुन 
व्यवसाय: आय वृद्धि के साथ, अटके धन की प्राप्ति होगी। ऋण संबंधी समस्याएं दूर होंगी। कार्य समय पर होंगे एवं दूसरों का सहयोग मिलेगा।अनावश्यक खर्च होंगे विश्वासघात भी हो सकता है।
व्यापार लाभ वृद्धि वाला होगा एवं नौकरी में जिम्मेदारी बढेगी । लोग नौकरी कर रहे हैं उन लोगों को मनचाहा प्रमोशन या ट्रांसफर मिल सकता है। सरकारी कामकाज की रुकावटें दूर होगी 
स्वास्थ्य: चेहरे पर चोट या जोडों के दर्द की समस्याएं हो सकती हैं।
प्रेम: साथी से दूरी हो सकती है। वैवाहिक जीवन में तनाव समाप्त होगा।

कर्क 
व्यवसाय: नौकरीपेशा जातकों के लिए समय बहुत ही लाभकारी साबित होगा क्योंकि, आपकी आय के अतिरिक्त स्रोत बनेंगे। जो लोग रंग, केमिकल और दवाइयों से जुड़े कामकाज करते हैं उन्हें मनचाहा लाभ प्राप्त होगा।कार्यस्थल पर आपको सीनियर और जूनियर का पूरा सहयोग मिलेगा। आपके सभी काम समय पर पूरे होते जाएंगे।सुख वृद्धि होगी एवं आय भी अच्छी बनी रहेगी। कार्य में देरी नहीं होगी।उधार देने से बचें और विवादों से दूर रहने की कोशिश करें।व्यापार उत्तम रहेगा एवं नौकरी में तरक्की के मौके प्राप्त होंगे।
स्वास्थ्य: पैर के नाखून में चोट लग सकती है। स्थायी रोगों में आराम रहेंगा।
प्रेम: प्रेम प्रस्ताव स्वीकृत होंगे एवं जीवन साथी मनोबल वृद्धि करेंगा।

सिंह 
व्यवसाय: आपके सुख में वृद्धि होगी एवं बेहतर ढंग से आगे बढ़ने के मौके प्राप्त होंगे। कार्य सफल होंगेआय वृद्धि होगी एवं संचित धन में भी वृद्धि होगी।अनावश्यक खर्चे भी बढ़ सकते हैं।व्यापार में खुशी नही रहेगी एवं नौकरी बदलने का विचार कर सकते है।आप काम में काफी व्यस्त हो सकते हैं।व्यापारिक स्थिति सुदृढ़ होगी। अपनों का साथ होगा। कोर्ट-कचहरी का साथ होगा। राजनीतिक लाभ होगा। अंत में आय की स्थिति बहुत सुदृढ़ होने वाली है। कार्यों की विघ्न-बाधा खत्म होगी।
स्वास्थ्य: गले में खराश, सर्दी, जुकाम होगा। पेट एवं कमर में दर्द रहेगा।
प्रेम: साथी से क्लेश होगा एवं जीवन साथी तनाव बढ़ सकता है।

कन्या 
व्यवसाय: व्यापार अच्छा है।व्यावसायिक सफलता मिलने के योग हैं।आपके कामकाज से जुड़ी जो भी समस्याएं आ रही थी वह सभी बाधाएं दूर हो जाएंगी।आपका व्यापार में लंबे समय से धन कहीं फंसा हुआ है तो वह पैसा इस हफ्ते आपको अचानक वापस मिल सकता है।बेकार के कार्यों में समय व्यतीत होगा। खिन्नता बनी रहेगी।आपकी आय में वृद्धि होने की संभावना है, और लंबे समय से चली आ रही उलझनें भी सुलझ सकती हैं।व्यापार में कार्य ज्यादा हो सकता है। नौकरी में तनाव रहेगा।
स्वास्थ्य: सीने में दर्द एवं आंखों में जलन के साथ तनाव रह सकता हैं।
प्रेम: प्रेम में निराशा मिल सकती है। वैवाहिक जीवन सुखमय रहेंगा।

तुला 
व्यवसाय: आय कमजोर होगी एवं व्यय की अधिकता होगी। कार्य में बाधा आएगी। धन की कमी हो सकती है।छोटी-छोटी सफलताएं भी प्राप्त होंगी।व्यापार में अड़चन आ सकती है। नौकरी में लक्ष्य साधने में बाधा आएंगी।नौकरी चाकरी की स्थिति अच्छी होगी।व्यापार की स्थिति लगभग ठीक चलेगी।कार्यों की विघ्न-बाधा खत्म होगी।निवेश सावधानी पूर्वक करें ।
स्वास्थ्य: दांत, कमर एवं पैर में चोट लग सकती है। दाईं आंख में तकलीफ होंगी।
प्रेम: साथी से विवाद थमेगा एवं वैवाहिक सुख बना रहेंगा।

वृश्चिक 
व्यवसाय: अधिक धन खर्च न करें ।नये अनुबंध और साझेदारी के कार्यों में लाभ होगा । धन और प्रतिष्ठा में वृद्धि होगी।कार्यों की विघ्न बाधा खत्म होगी। नौकरी चाकरी की स्थिति सुदृढ़ होगी।आप आवश्यक सभी काम अब कर पाएंगें। आय भी अच्छी होंगी एवं सहयोग भी प्राप्त होगा।व्यापार में रुकावट आएंगी एवं नौकरी में अधिकारी संतुष्ट रहेंगे।कुछ चुनौतीपूर्ण क्षणों के बावजूद सफलता के संकेत भी हैं।आप कार्य में बदलाव के लिए भी विचार कर सकते हैं।निवेश ना करें।
स्वास्थ्य: रक्तचाप, हर्निया, पाइल्स वालों को दिक्कत बढ़ सकती है।
प्रेम: साथी से दूरी एवं जीवनसाथी से सहयोग प्राप्त होंगा।

धनु 
व्यवसाय: आपकी आय उत्तम बनी रहेगी।आर्थिक समस्याएं दूर होंगी। स्थायी धन-संपत्ति में वृद्धि के संकेत हैं, जो आपकी वित्तीय स्थिति को मजबूत करने में सहायक हो सकते हैं। न्यायालयीन मामलों में भी आपको सफलता प्राप्त होने के आसार हैं, जो आपकी कानूनी परेशानियों को सुलझाने में मदद हालांकि सब कुछ अच्छा रहेगा। लेकिन आपकी चिंता और परेशानियों का समाधान ढूंढना आवश्यक होगा।आपके प्रयासों का अच्छा फल देखने को मिलेगा और आपकी वित्तीय स्थिति में सुधार होगा। आपकी योजनाएं और कार्यकुशलता आपको सफलता की ओर ले जाएंगे।व्यापार में तेजी आएंगी। नौकरी में प्रमोशन का योग है। पुराने निवेश से धन लाभ भी हो सकता है.
स्वास्थ्य: हड्डी में चोट एवं ज्वर आ सकता है।
प्रेम: साथी से वैचारिक मतभेद एवं वैवाहिक जीवन सुखमय रहेगा।

मकर 
व्यवसाय: जमीन-जायदाद या पैतृक संपत्ति से जुड़े मामले सुलझेंगे। कोर्ट-कचहरी के मामलों में भी आपके पक्ष में संकेत मिल रहे हैं। चुनाव से जुड़ा कोई फैसला लेना चाहें तो भी मौका अनुकूल है।नौकरी में भी बदलाव मिलेगा।पिछले रूके हुए काम होंगे तथा नुकसान की भरपाई होने से मन प्रसन्न रहेगा । नये कार्य की योजना बनेगी ।सामाजिक जीवन का दायरा बढ़ेगा ।कार्यस्थल पर सुगमता बनी रहेगी। योग्यता के अनुसार कार्य प्राप्त होंगे।व्यापार सामान्य से अच्छा रहेगा एवं नौकरी में अधीनस्थ सहयोग करेंगे।सरकारी कार्यों में भी सफलता मिलेगी।कार्यक्षेत्र में सफलता की प्राप्ति होगी।
स्वास्थ्य: आंख, बाएं कान एवं हड्डी एवं त्वचा में समस्याएं हो सकती है।
प्रेम: साथी से सहयोग मिलेगा एवं वैवाहिक प्रस्तावों की प्राप्ति होंगी।

कुम्भ 
व्यवसाय: सरकारी कार्य में बाधा समाप्त होंगी। विरोधी पस्त होंगे।ऋण संबंधी मामले उलझेंगे।आपकी सोची हुई योजनाएं पूरी करने में आप सफल होंगे, हालांकि आपकी आय में रुकावट बनी रह सकती है।-व्यापार में समय अच्छा रहेगा एवं नौकरी में अधिकारी सहयो करेंगे।व्यापारिक स्थिति पहले से बेहतर होगी।आपके भाग्य का सितारा चमकेगा।आर्थिक स्थिति मजबूत होगी।व्यापार ठीक-ठाक चलेगा।पिछले रूके हुए काम होंगे तथा नुकसान की भरपाई होने से मन प्रसन्न रहेगा
स्वास्थ्य: बांई कलाई पर चोट लग सकती है। दांत में दर्द रहेंगा।आपको नसों की समस्या हो सकती है।
प्रेम: साथी से तनाव समाप्त होंगा। वैवाहिक जीवन संतोषमय रहेंगा।

मीन 
व्यवसाय: आपके रुके हुए कामों को पूरा होने से अच्छा वातावरण बनेगा।निवेश में लाभ होगा । पद प्रतिष्ठा में वृद्धि होगी ।अधिक निवेश और धन खर्च में सावधान रहने की आवश्यकता है।भावुकता में कोई निर्णय नहीं लें ।आर्थिक स्थिति सुदृढ़ होगी। व्यापारियों के लिए लाभ के योग हैं।कार्य में सफलता की प्राप्ति होगी। नए प्रयोग सफल होंगे।सफलता की प्राप्ति होगी। भाग्य भी साथ देगा।व्यापार उल्लेखनीय नहीं रहेगा।आय में वृद्धि और कार्य में उन्नति देखने को मिलेगी।
स्वास्थ्य: वाहन, विद्युत, जल एवं ऊंचाई से बचकर रहें। पेट में तकलीफ हो सकती है।
प्रेम: साथी से विवाद होगा एवं वैवाहिक जीवन में उच्चाटन होगा।

जिजाऊ ज्ञान मंदीरचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

जिजाऊ ज्ञान मंदीरचे स्नेहसंमेलन उत्साहात !
(इस्लामपूर)
        जिजाऊ ज्ञान मंदीर प्रि- प्रायमरी स्कूल बहे, इस्लामपूर यांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला. यावेळी शिवमती सुवर्णा दिलीप पाटील यांना राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श समाज घडविण्यासाठी चांगल्या पुरोगामी विचारांची गरज आहे असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष साम्यवादी विचारवंत काॕम्रेड धनाजी गुरव यांनी प्रतिपादन केले.इतिहास अभ्यासक प्रा. सचिन गरुड म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांचे शिक्षण घेण्याचा अधिकार काढून घेतले आहेत आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र यावे लागेल.यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे चंद्रशेखर क्षिरसागर, दिलीप पाटील ,कापूसखेड गावचे सरपंच निवृर्ती माळी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले. दिपप्रज्वलन व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या माता-पालक तसेच आजी-आजोबा यांच्या वेशभूषा, चिञकला, संगीत खुर्ची , उखाणा या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. अनुष्का चव्हाण, तनुष नलवडे, संस्कार शेळके या आदर्श विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जिजाऊ वंदना, स्वागत गीत , नृत्य , अंधश्रद्धा व विज्ञान तसेच अभंगगाथेचे महत्त्व यासारख्या विषयांवर नाटक, शिक्षण काळाची गरज तसेच पाण्याचे महत्त्व यासारख्या सामाजिक विषयांवर भाषणे, मोबाईल की पुस्तक यावर एकांकिका इत्यादी सादर केले. 
     यावेळी स्वागत परिचय व प्रास्तविक संस्थेचे संस्थापक उमेश शेवाळे , कार्यक्रमाचा आढावा सौ. आशा खाडे , सुञसंचलन तेजस्विनी शेवाळे व कु. संस्कार शेळके, आभार सौ. मेघा लाड यांनी केले. रोहित तोरस्कर, दत्ताञय नलवडे, अमोल चव्हाण, कापूसखेडचे सरपंच निवृत्ती माळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष अजित हवलदार, उपाध्यक्ष विशाल धस,रोहिणी आरबुने, प्रियंका शिंदे, पुजा थोरात, वैशाली यादव , ऋतुजा पोवार, आदि शिक्षक , विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.

सुवर्णमयी दातृत्व

एखाद्याला आयुष्याची भेट देणे किंवा इतरांना जगण्यासाठी मदत करणे म्हणजे दान होय. दान हे नेहमी सत्पात्री व गरज असणा-या व्यक्तींना दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सामर्थ्यानुसार दान केले पाहिजे. प्रामाणिकपणे शुध्द अंतःकरणाने दिलेले दान उपयुक्त ठरते. अशा विचाराने दिव्यांग,तृतीयपंथी, महिला ,युवक सक्षमीकरणा करीता कार्यरत असलेल्या समाजसेविका सुरक्षा शशांक घोसाळकर यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला आर्मी ऑफीसर म्हणून देशाच्या स्वाधीन केलेलेच आहे. स्वतःच्या 50 व्या वाढदिवसाला पतीकडून अनोखी भेट म्हणून आपल्या अवयवदानाचे संमतीपत्र मिळवून मरणोपश्चात सर्व अवयव दान केल्याचे इच्छापत्र दाखल करुन प्रत्यक्ष कृतीतून समाजाला अवयव दाना करीता आवाहन केले आहे. वय,जात,रंग किंवा धर्म यातील समानतेचे दान म्हणजेच अवयवदान. देहदान करणे ही आधुनिक चळवळ सुरू होणे आवश्यक आहे. अन्नदाना प्रमाणे देहदान करणे याविषयी अधिकाधिक प्रचार,प्रसार करणे आणि जनतेने त्यासाठी सकारात्मक होणे ही आधुनिक भारताची ओळख निर्माण होणे अत्यावश्यक आहे.
आपली नम्र,
सुरक्षा घोसाळकर

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात २५००० महिलांसाठी भव्य-दिव्य हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन!

 

संदिप कसालकर

२५००० महिलांसाठी भव्य दिव्य अश्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात करण्यात आले आहे. भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्र नाथ ठाकूर तसेच समाजसेविका ममता ठाकुर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी परिसरात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.


दरम्यान या प्रसंगी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली. सलग १२ वर्षांपासून आपण अश्या प्रकारचे उपक्रम जोगेश्वरी पूर्वेतील वार्ड क्रमांक ७७ मध्ये राबवत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. अश्या उपक्रमांच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यास मदत होत असून घराघरात हि पोहोचता येते. आशीर्वादही मिळत असतो असे धर्मेंद्र नाथ ठाकूर यांचे मत आहे.


दरम्यान सदर उपक्रम न फक्त वार्ड क्रमांक ७७ मध्ये राबविण्यात येणार असून संपूर्ण जोगेश्वरी विधानसभेतील ३० वेगवेगळ्या ठिकाणी २५,००० महिलांसाठी सलग १७ दिवस हळदीकुंकू कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे ठाकूर आणि सांगितले आहे.







जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर आयोजित शेवगाव येथे मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची सुरवात.

जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर आयोजित शेवगाव येथे मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची सुरवात

संतोष औताडे- नेवासा दिनांक -10/01/2024 
    सविस्तर माहिती- जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर पुरस्कृत व महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्र आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शेवगाव येथील शितीज सोशल फाउंडेशन सिद्धिविनायक कॉलनी शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. आज दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या प्रशिक्षणासाठी  शितिज सोशल फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची सुवर्ण संधी जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर व  महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्राने दिली आहे.या संधीचा लाभ घेऊन महिलांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी तसेच परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन तात्यासाहेब जिवडे प्रकल्प अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर यांनी केले आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व जिल्हा उद्योग केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण ट्रेनर म्हणून तपाडीया मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रशिक्षामुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक होण्याची संधी मिळेल. केवळ प्रशिक्षण न देता महिलांना बाजार पेठ, मार्केटिंग,याचा सर्व्हे करून आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी हे प्रशिक्षण महिलांना नक्कीच लाभदायी ठरनार आहे. या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी परिसरातील महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रशिक्षण कार्यक्रम शिबिरासाठी संतोष औताडे (पञकार) कार्यक्रम समन्वयक जिल्हा उद्योग केंद्र MCED अहमदनगर हे काम बघत आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फसवणूक केल्याप्रकरणी अटक...

पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फसवणूक केल्याप्रकरणी अटक...

रोहन दसवडकर

पंजाब नॅशनल बँकेच्या कुलाबा येथील शाखा व्यवस्थापकाला ट्रस्टच्या कर्मचाऱ्याशी संगनमत करून १.२२ कोटी रुपयांच्या डुप्लिकेट मुदत ठेवी (एफडी) बनवल्याप्रकरणी आणि पैसे पळवल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
सक्सेनासह अटक करण्यात आलेल्या आरोपींसह कफ परेड पोलिसांनी शुक्रवारी रवीकुमार सक्सेनाला अटक केली.सोहनसिंग राजपुरोहित याने जैन श्वेतांबर तेरापंथ समिती ऐरोलीचे 1.22 कोटी रुपये लुटले.

TOI ने त्याच्या बुधवारच्या आवृत्तीच्या शीर्षकात अहवाल दिला होता "1.2 कोटी रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केल्याप्रकरणी ट्रस्टच्या कर्मचाऱ्याला अटक. पोलिसांनी सांगितले की, निलंबित करण्यात आलेले बँक मॅनेजर सक्सेना यांनी शाखेत एफडीच्या बोगस पावत्या सादर केल्या होत्या आणि दुसऱ्या व्यक्तीला कर्ज मिळवून दिले होते.

कर्जदाराने डिफॉल्ट केले आणि बँकेने एफडी गोठवल्या होत्या. तपासादरम्यान असे दिसून आले की शाखा व्यवस्थापक सक्सेना आणि एका वाँटेड बँक कर्मचाऱ्याने बँकेत बोगस एफडी पावत्या सादर केल्या आणि पैसे पळवले," राजेंद्र रणमाळे, वरिष्ठ निरीक्षक म्हणाले. कफ परेड. सरकारी वकील कविता नगरकर यांनी फिर्यादी पक्षातर्फे युक्तिवाद केला की सक्सेनाला जास्तीत जास्त पोलिस कोठडीत ठेवायला हवे कारण पोलिसांना त्याची कोठडीत चौकशी करून पैशाचा ओघ आणि आरोपींनी पुस्तकांमध्ये कशी फेरफार केली हे समजावे असे सांगितले.

या प्रकरणी तक्रार हेमंत जैन यांनी केली आहे, जे 1997 पासून स्थापन झालेल्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि विविध सामाजिक समस्यांमध्ये गुंतले आहेत. ट्रस्टचे ऐरोली येथील अभ्युदय सहकारी बँकेत खाते असून त्यात सुमारे १.२२ कोटी रुपये एफडी म्हणून ठेवले होते. 2018 मध्ये अशी अफवा पसरली होती की बँकेत काही समस्या आहे आणि म्हणून ट्रस्टींनी त्यांची Fds दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.


मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर घडला मोठा अपघात. इनोव्हाने अनेक गाड्यांना दिली धडक. ६जण जखमी, तिघांचा मृत्यू.

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर घडला मोठा अपघात. इनोव्हाने अनेक गाड्यांना दिली धडक. ६जण जखमी, तिघांचा मृत्यू 

रोहन दसवडक

वांद्रे-वरळी सी-लिंकवर शुक्रवारी एका वेगवान टोयोटा इनोव्हाने अनेक वाहनांना धडक दिली, यात तीन जण ठार आणि सहा जण जखमी झाले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 10.15 च्या सुमारास, टोल बूथच्या अगदी 100 मीटर आधी वांद्र्याच्या दिशेने जाणारी टोयोटा इनोव्हा एका मर्सिडीजला धडकली. पळून जाण्याच्या प्रयत्नात, कार टोलच्या रांगेत असलेल्या इतर असंख्य वाहनांना धडकली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपायुक्त (डीसीपी) - झोन 9 यांच्या मते, सी लिंकच्या वांद्रे टोकावरील टोल बूथच्या जवळपास 100 मीटर अंतरावर उत्तरेकडील लेनवर इनोव्हा प्रथम मर्सिडीज बेंझ कारला धडकली.

इनोव्हा चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वाहन टोल बूथवर पोहोचताच अनेक गाड्यांना धडकले, त्यात नऊ जण जखमी झाले. नंतर त्यातील तिघांना मृत घोषित करण्यात आले, असे डीसीपीने सांगितले.

इनोव्हाच्या चालकासह सहा जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. सी लिंकवर इनोव्हा वगळता आणखी पाच वाहनांचा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.
अपघाताच्या वेळी चालकासह सात जण इनोव्हा गाडीतून प्रवास करत होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

प्राथमिक माहितीच्या आधारे इनोव्हा कारच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. टोयोटा इनोव्हाच्या चालकालाही किरकोळ दुखापत झाली असून त्याला अटक करण्यात आली असून त्याची कार जप्त करण्यात आली आहे. पश्चिम मुंबईतील वांद्रे आणि दक्षिण मुंबईतील वरळीला जोडणाऱ्या 5.6 किलोमीटर लांबीच्या, आठ लेनच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर अलीकडच्या काही महिन्यांत अनेक कार अपघात घडले आहेत.


ललित पाटीलसह आणखी १२ जणांवर मोक्का कारवाई.

ललित पाटीलसह आणखी १२ जणांवर मोक्का कारवाई. 

रोहन दसवडकर

ससून रुग्णालयातून ड्रग्स रैकेट चालवणाऱ्या टोळीप्रमुख ललित पाटील आणि अरविंदकुमार लोहरे यांच्यासह टोळीतील १२ जणांवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली ( मोक्का ) कारवाई केली आहे . 
ललितच्या घरातून ५ किलो सोने जप्त ललितने ससूनमधून पलायन केल्यानंतर त्याच्या शोधार्थ पुणे पोलिसांचे पथक ललितच्या नाशिक येथील घरी गेले होते. यावेळी घराच्या झडतीमध्ये पोलिसांनी तब्बल तीन किलो सोने जप्त केले होते . सध्या ललित पाटील पुणे पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे . करून ड्रग्स  रॅकेट चालविण्याचे आढळून आले . गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण काययाखाली ( मोक्का ) कारवाई मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता . प्रस्तावाला पोकळे यांनी मान्यता दिली . अमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललितने हे सोने विकत घेतले होते . त्यातील यापूर्वी तीन किलो सोने जप्त केले असताना आता आणखी ५ किलो सोने जप्त करण्यात आल्याने ललितने अजून किती माया साठवून ठेवली आहे .

आणखी १२ गुन्हेगार कोण?

ललित अनिल पाटील ( वय ३७ , रा . नाशिक ) , अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे ( ३ ९ , उत्तर प्रदेश ) , अमित जानकी सहा ऊर्फ सुभाष जानकी मंडल ( २ ९ , रा . देहूरोड ) , रौफ रहिम शेख ( १ ९ , रा . ताडीवाला रोड ) , भूषण अनिल पाटील ( ३४ , नाशिक ) , अभिषेक विलास बलकवडे ( ३१ , रा . नाशिक ) , रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान अहमद अन्सारी ( २६. धारावी , मुंबई ) , प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे ( ३ ९ , नाशिक ) , जिशान इकबाल शेख ( 33 . रा . नाशिक ) , शिवाजी अंबादास शिंदे ( ४० , रा . कसारा , नाशिक ) , राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार चौधरी ऊर्फ अमितकुमार ( ३० , रा . विरार ) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत .

रस्ते स्वच्छ करण्यासाठी पाणी शिंपडण्यासाठी मुंबई नागरी संस्था १२१ टँकर तैनात करणार...

रस्ते स्वच्छ करण्यासाठी पाणी शिंपडण्यासाठी मुंबई नागरी संस्था १२१ टँकर तैनात करणार आहे.

रोहन दसवडकर

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असताना महानगरातील रस्ते स्वच्छ आणि धुण्यासाठी 121 पाण्याचे टँकर आणि अतिरिक्त कर्मचारी तैनात करेल, असे नागरी संस्थेच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.  माध्यमांशी बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, शहरातील 650 किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे स्वच्छ आणि धुण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर केला जाईल.

ते पुढे म्हणाले की हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी अँटी स्मॉग गन आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) टोल प्लाझा स्वच्छ करण्याबाबतही कळवले जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले. नागरी संस्थेचा घनकचरा विभाग देखील दररोज रस्ते आणि पदपथांची विशेष स्वच्छता करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. 
नागरी संस्थेच्या योजनांबद्दल बोलताना उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव म्हणाल्या, "ज्या रस्त्यांवर स्वच्छता करणे आवश्यक आहे ते रस्ते आणि पदपथांची निवड विभागानेच केली आहे. वाहतूक कोंडीसह रस्ते आणि पदपथांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. ."

 "रस्ते स्वच्छ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि झाडे इत्यादींचा तपशीलवार आराखडा तयार केला जात आहे. त्यात पाण्याच्या टँकरची संख्या, प्रत्येक टँकरच्या फेरीची वारंवारता आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या पाणीपुरवठ्याचा जवळचा स्रोत यांचा समावेश आहे."
 चंदा जाधव पुढे म्हणाल्या की, लोकांची गैरसोय कमी करण्यासाठी, विशेषत: सकाळी 3 ते पहाटे 6 या वेळेत स्वच्छता कामे केली जातील.BMC च्या P (उत्तर प्रभाग) मध्ये, अधिकार्‍यांनी खाजगी आणि सरकारी प्रकल्प राबवण्यात गुंतलेल्या 97 कंत्राटदार आणि रिअल इस्टेट कंपन्यांना नोटिसा पाठवल्या आहेत, त्यांना धूळ कमी करण्याच्या नियमांचे पालन करण्यास किंवा कारवाईला सामोरे जाण्यास सांगितले आहे.
.
.
.
.
#news #airpollution #latestnews #mumbai


मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक... फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज मध्ये घडली पेपर लीकची घटना

मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक... फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज मध्ये घडली पेपर लीकची घटना

रोहन दसवडकर

फोर्ट मधील सिद्धार्थ कॉलेज मध्ये तृतीय वर्षाचा मुंबई विद्यापिठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉम याचा कॉमर्स -५ या विषयाचा पेपर एका विद्यार्थ्याच्या व्हॉट्सॲप वर लीक झाला आहे. परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिका व्हॉट्सॲपवर आल्याचा प्रकार सिद्धार्थ कॉलेजमध्ये समोर आला आहे . याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे . विद्यापीठाची हिवाळी सत्राची परीक्षा सुरू आहे . 
फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्सच्या सहाय्यक प्राध्यापक सुमेध जगन्नाथ माने यांच्या तक्रारीनुसार फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे . कॉलेज प्रशासनातर्फे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार , सिद्धार्थ विद्यापीठाकडे तक्रार कॉलेजमध्ये टी.वाय.बी.कॉम.ची ( सत्र ५ ) परीक्षा सुरू आहे . ३१ ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या सुमारास कॉमर्स -५ या विषयाचा पेपर होता . त्यासाठी परीक्षा केंद्राचा वॉटरमार्क क्रमांक ठरलेला होता . परीक्षा हॉलमध्ये माने कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून जबाबादारी पार पाडत असताना एका विद्यार्थ्याच्या मोबाइलवर व्हॉट्सॲपमध्ये कॉमर्स -५ या विषयाची प्रश्नपत्रिका आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे असल्याचे दिसून आले. माने यांनी मोबाइल ताब्यात घेतला . 
प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्क क्रमांक त्यांच्या परीक्षा आरोपी गिरगाव येथील भवन्स कॉलेजचा विद्यार्थी आहे . त्याला त्याचा मित्र व गुन्ह्यातील सहआरोपी सूरज याने सकाळी ९ .३७ वाजता व्हॉट्सॲपद्वारे ही प्रश्नपत्रिका पाठविली होती . याबाबत तत्काळ कॉलेज प्रशासनातर्फे मुंबई विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली .या केंद्राचा नसून अन्य परीक्षा केंद्राचा Q असल्याचे स्पष्ट झाले .
विद्यपीठाकडे तक्रार आली आहे . पण पेपर फुटलेला नाही . एकाच मुलाच्या व्हॉट्सॲपवर पेपर आल्याचे आढळून आले आहे. असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले .

मुंबई लोकल ट्रेन अपडेट: खार आणि गोरेगाव दरम्यान काही सेवा प्रभावित होतील.

मुंबई लोकल ट्रेन अपडेट: खार आणि गोरेगाव दरम्यान काही सेवा प्रभावित होतील.

रोहन दसवडकर 

मुंबई लोकल ट्रेन अद्यतने: पश्चिम रेल्वेने गुरुवारी सांगितले की खार आणि गोरेगाव स्थानकांदरम्यानच्या काही रेल्वे सेवांवर 6 व्या मार्गाचे काम सुरू असल्यामुळे पट्रेन रद्द होतील. एका निवेदनात, पश्चिम रेल्वेने म्हटले आहे की, पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात खार आणि गोरेगाव दरम्यान 6 व्या मार्गिकेच्या बांधकामाच्या संदर्भात, मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द झाल्या, अल्पावधीत/अल्प ओरिजिनेशनसह अंशतः रद्द झाल्या. पूर्वी सूचित केले गेले आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आणखी काही गाड्या रद्द केल्या जात आहेत/ शॉर्ट टर्मिनेटेड/ शॉर्ट ओरिजिनेटेड. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 

1. ट्रेन क्रमांक 09144 वापी - 4 नोव्हेंबर 2023 रोजी विरार.

 2. ट्रेन क्रमांक 09159 वांद्रे टर्मिनस - 5 नोव्हेंबर 2023 ची वापी एक्सप्रेस.

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशन

 1. ट्रेन क्रमांक 12908 H. निजामुद्दीन - वांद्रे टर्मिनस संपर्क क्रांती एक्स्प्रेस 2 नोव्हेंबर, 2023 रोजी सुरू होणारी प्रवास वापी येथे कमी होईल आणि वापी - वांद्रे टर्मिनस दरम्यान अंशतः रद्द होईल.

 2. ट्रेन क्रमांक 19204 वेरावळ - 3 नोव्हेंबर, 2023 रोजी सुरू होणारी वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस वापी येथे थांबेल आणि वापी - वांद्रे टर्मिनस दरम्यान अंशतः रद्द होईल.

 3. ट्रेन क्रमांक 19203 वांद्रे टर्मिनस - 4 नोव्हेंबर, 2023 रोजी सुरू होणारी वेरावळ एक्स्प्रेस वापी येथून थोड्या वेळाने निघेल आणि वांद्रे टर्मिनस - वापी दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.

4. ट्रेन क्रमांक 20944 भगत की कोठी - वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस 3 नोव्हेंबर, 2023 रोजी सुरू होणारी प्रवास डहाणू रोड येथे कमी होईल आणि डहाणू रोड - वांद्रे टर्मिनस दरम्यान अंशतः रद्द होईल.

दरम्यान, पश्चिम रेल्वेने आणखी एका निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम रेल्वे मुंबई उपनगरीय विभागावरील खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यानच्या 6व्या मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या मोहिमेवर आहे. या संदर्भात काही उपनगरीय लोकल यापूर्वी जाहीर केल्यानुसार रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी, पश्चिम रेल्वे रद्द करण्यात आलेल्या काही लोकल गाड्या पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. दिलासा देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी, 3 नोव्हेंबर रोजी, 168 गाड्या पूर्ववत केल्या जातील, म्हणजे अधिसूचित केल्याप्रमाणे 316 विरुद्ध फक्त 148 गाड्या रद्द केल्या जातील.



मराठा आरक्षणाच्या आश्‍वासनानंतर कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपले...

मराठा आरक्षणाच्या आश्‍वासनानंतर कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपले...

रोहन दसवडकर

राठा आरक्षण आंदोलन कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी गुरुवारी महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर आपले बेमुदत उपोषण संपवण्याचे मान्य केले आहे. मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी आपले 9 दिवसांचे उपोषण संपवले आणि सरकारला दोन महिन्यांत प्रश्न सोडवण्याची मागणी केली. 

जरांगे यांनी सरबत प्राशन करून आपले उपोषण संपवले, परंतु दोन महिन्यांत निर्णय न घेतल्यास मुंबईवर मोठा मोर्चा काढू, असा इशारा दिला . जालना जिल्ह्यातील त्यांच्या गावातील उपोषणस्थळी त्यांची घोषणा 4 राज्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन अनिश्चित काळासाठीचे उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर आली.

“सर्व मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत माझ्या घरी जाणार नाही,” असे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्र्यांनी उपोषण मागे घेण्यास सांगितल्यानंतर सांगितले आहे.
वृत्तानुसार, जरांगे यांनी सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा करताना संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यांनी "फुलप्रूफ आरक्षण" ची मागणी केली आणि राज्य सरकारला त्याचे आश्वासन देण्यास सांगितले. 

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, एम.जी.गायकवाड आदी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली, जे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २५ ऑक्टोबरपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या गावात बेमुदत उपोषणाला बसले आहेत .
8 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळात मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन एका मंत्र्यांनी मनोज जरांगे यांना दिले.

महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण... प्रफुल पटेल यांची महिती

महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण....

रोहन दसवडकर

हाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी दिली.
पटेल, जे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या गटाचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी 64 वर्षीय पवार यांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी एक्स (X) वर ही महिती ट्विट केली.
  "अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या सट्टेबाज मीडिया रिपोर्ट्सच्या विरोधात, मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालपासून त्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे," ते म्हणाले. "अजित पवार त्यांच्या सार्वजनिक सेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी वचनबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर, ते त्यांची समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील," असे पटेल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.


मुंबईत मराठा आरक्षण आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड केली...

मुंबईत मराठा आरक्षण आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड केली...

रोहन दसवडकर 

मुंबईत मराठा आरक्षण आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड केली. सकाळी 7.30 च्या सुमारास दक्षिण मुंबईतील आकाशवाणी आमदार वसतिगृहाजवळ उभ्या असलेल्या मंत्र्यांच्या एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) वर लाकडी काठ्यांनी सज्ज असलेल्या दोन मराठा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.आंदोलक ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत होते.
  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान हे लोक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. नुकसान झालेले वाहन या घटनेच्या पुढील तपासासाठी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
  मुंबईतील परळ परिसरात २६ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाचे जोरदार विरोधक असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांनी आधी सांगितले की, वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांना नंतर अटक करण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्याच्या विविध भागात झालेल्या हिंसक घटनांनंतर मुंबई पोलिसांनी कॅबिनेट मंत्री, अन्य राजकीय नेते, राजकीय पक्षांची कार्यालये आणि महानगरातील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवली आहे.

कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता


      कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता

न्याय रणभूमी प्रतिनिधी - रोहन दसवडकर

कोकण संस्था गेली १२ वर्षे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, अनाथ मुलांसाठी वसतिगृह आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी काम करत आहे. कोकण कला व शिक्षण विकास ही एक संस्था आहे जी शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांद्वारे समाजाला चांगले जीवन जगण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करते.  ही संस्था वंचित मुलांना मदत करते आणि शिक्षण, गावाचा विकास, अनाथाश्रमांना मदत, आपत्ती निवारण मदत आणि गंभीर आजार असलेल्या मुलांसाठी वैद्यकीय मदत यांना प्रोत्साहन देते.  
    २९ ऑक्टोबर २०२३ रोजी या संस्थेची यशाची आणि इतरांच्या मदतीची यशस्वी १२ वर्षे पुर्ण झाली. भव्य दिव्य अशी सजावट या निमित्ताने करण्यात आली. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील भागधारकांनी मंगळागौर या सांस्कृतिक नृत्य सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
     संस्थेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्ताने हिंदी व मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलेला व  'बाईपण भारी देवा' या सुपरहिट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री  सौ. दीपा परब - चौधरी यांनी देखील स्वतःची उपस्थिती दर्शवली. त्यांना कार्यक्रमात राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
 दीपा परब यांनी सन्मान स्वीकारल्यावर माल्वणींतून आपल्या संबोधनाला सुरुवात केली व म्हणाल्या की माझे वडील असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता. कारण एका सामाजिक संस्थेने माझा आज गौरव केला आहे. आम्ही कलाकार आहोत आम्हाला कामाचे मानधन मिळते पण गरजूंसाठी अविरत मोफत काम करणाऱ्या कोकण संस्थेचे मला खूप कौतुक वाटते, हे काम कठीण तर आहेच पण कोकण संस्था समाजासाठी करत असलेले काम खरोखर खूप प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे.
   याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.अमेय देसाई यांनाही राज्यस्तरीय कोकण रत्न यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
दादर येथे आज पार पडलेल्या या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रीलस्टारना रील टू रिअल या पुरस्काराने सौ. दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यात सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश कदम, अमित कुबडे, निखिल सकपाळ, अनमोल यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ अमेय देसाई यांच्या हस्ते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये पुणे मावळ विभागातील ग्रामसेविका सौ. प्रतिभा विठ्ठल कुंभार,तर ठाणे ग्रामीण आणि आदिवासी विभाग शहापूरच्या सौ तारा सांगळे आणि श्रीमती पूजा कंठे, तर पालघर वाडाच्या सौ. रोशना निलेश पाटील आणि मानसी मनोज पानवे भिवंडी यांचा समावेश होता.
काशिनाथ धुरू हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. गीताली पवार, श्रीमती अमृता माने, संदीप सिंग, विशाल महांगरे, संस्था व्यवस्थापक साक्षी पोटे, प्रीती पांगे, सुरज कदम सह शेकडो सांस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍक्टर अक्षय ओवळे तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले.