BREAKING NEWS
latest
latest updates लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
latest updates लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जोगेश्वरीच्या समस्या सरकारच्या डोळ्यांसमोर, पण उपाय शून्य? आमदार बाळा नर यांचा सवाल!


संदिप कसालकर (वार्ताहर)

मुंबई: जोगेश्वरी (पूर्व) हा मुंबईतील सतत समस्यांनी ग्रस्त असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. येथे पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, आणि सामाजिक योजनांमधील त्रुटी यांसारख्या गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, सरकारकडून यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार अनंत (बाळा) नर यांनी २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यक्त केली.

पाणीटंचाईचा प्रश्न भीषण – जबाबदार कोण?

मुंबईत ४,६०० ते ४,८०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना फक्त ४,००० दशलक्ष लिटरच पाणी मिळत आहे. त्यातील ६०० ते ८०० दशलक्ष लिटर पाणी जोगेश्वरीसारख्या भागांपर्यंत पोहोचतच नाही! वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी नवीन जलाशयांची गरज असताना सरकार गप्प का? असा सवाल त्यांनी सभागृहात विचारला.

संजय गांधी निराधार योजनेत अन्याय – गरीब वंचित!

गरजू नागरिकांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील उत्पन्न मर्यादा आजही २५,००० रुपये इतकीच आहे. आजच्या काळात ही रक्कम एका लहान मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठीही अपुरी आहे. ही मर्यादा ६०,००० रुपये करण्याची गरज असताना सरकार निर्णय का घेत नाही? तसेच, २००५ नंतर गरिबीरेषेखालील नागरिकांची यादीच तयार करण्यात आलेली नाही, त्यामुळे अनेक गरीब कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

वाहतूक कोंडी आणि बेवारस गाड्या – प्रशासन झोपेत?

जोगेश्वरीत वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न बनला आहे. रस्त्यांच्या कडेला अनधिकृत पार्किंग आणि वर्षानुवर्षे पडून असलेल्या जुन्या गाड्यांमुळे वाहतूक ठप्प होते. या गाड्या उचलण्यासाठी आणि ठेवण्यासाठी ट्राफिक विभागाकडे कोणतीही व्यवस्था नाही, हे गंभीर वास्तव आमदार नर यांनी अधोरेखित केले.

जोगेश्वरीकरांसाठी सरकार कधी जागं होणार?

महत्त्वाचे निर्णय घेणारे सरकार आणि प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने जोगेश्वरीकर आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. पाणी, वाहतूक आणि सामाजिक योजनांतील त्रुटी यावर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार अनंत (बाळा) नर यांनी केली.

जोगेश्वरीचा विकास हा केवळ घोषणांपुरता राहणार की प्रत्यक्ष कृती होणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

अंधेरी गॅस गळती दुर्घटना: जळते शरीर, उद्ध्वस्त स्वप्नं आणि मदतीसाठी हंबरडा!


मुंबई: संदिप कसालकर

मुंबईतील अंधेरी पूर्व येथे ९ मार्चच्या रात्री झालेल्या भीषण गॅस गळतीमुळे २२ वर्षीय अरविंद कैथल याच्या आयुष्याला काळोखाने ग्रासले आहे. या दुर्घटनेत ८०% भाजलेल्या त्याच्या मित्राचा मृत्यू झाला, तर अरविंद ५५% भाजलेल्या अवस्थेत जीवासाठी झुंज देत आहे. पण त्याच्या कुटुंबासमोर आता जखमांइतकीच मोठी समस्या उभी राहिली आहे – उचलू न शकणाऱ्या रुग्णालयाच्या बिलांची!

आयुष्याचा संघर्ष आणि वाढते हॉस्पिटल बिल

अरविंदला राष्ट्रीय बर्न्स सेंटर, ऐरोली येथे दाखल करण्यात आले आहे. त्याचा रोजचा उपचार खर्च १ लाखांहून अधिक आहे. टाटा ट्रस्टने काही खर्च उचलला असला तरी औषधांसाठी अजूनही मोठी रक्कम भरावी लागते. त्याच्या वडिलांचा हातमजुरीवर संसार आहे, तर भावांची मिळकत फक्त कुटुंब चालवण्यापुरतीच आहे.

"आमची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. आम्ही भावाला वेदनेत तडफडताना पाहतोय, पण त्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च कोठून आणायचा?" अरविंदचा भाऊ अरुण कैथलने व्यथा मांडली. "नेत्यांनी मदतीचं आश्वासन दिलं, पण मिळालेलं काहीच नाही. फक्त औषधांसाठीच ६६,००० रुपये भरावे लागले आहेत, आणि अजून किती भरणार ते माहीत नाही!"

विजयाचा आनंद…आणि क्षणार्धात पेटलेल्या जखमा!

त्या रात्री भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामना पाहून अरविंद आणि त्याचा मित्र अमन सरोज दुचाकीवर घरी जात होते. शेर-ए-पंजाबजवळ अचानक गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला आणि काही क्षणांतच दोघे पेटलेल्या अवस्थेत जमिनीवर फेकले गेले!

"आम्ही दोघं आनंदात होतो. पण काही क्षणांत माझा मित्र जळून कोळसा झाला आणि मी मृत्यूशी झुंज देतोय," अरविंदच्या डोळ्यात अश्रू तरळले. अमनने अखेरचा श्वास १० मार्चला घेतला.

चुकीचं कोणाचं? जबाबदारी कोण घेणार?

या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, महानगर गॅस लिमिटेडच्या पाइपलाइनमध्ये गळती झाली होती. बीएमसीच्या एका ठेकेदाराने परवानगीशिवाय ड्रेनेजसाठी खोदकाम केलं होतं, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. पोलिसांनी संबंधित ठेकेदाराला अटक केली आहे, पण या निष्काळजीपणाची किंमत कोण देणार?

माझ्या भावाला वाचवा... आम्हाला मदतीची गरज आहे!

अरविंद आता आयसीयूमधून बाहेर आला असला तरी पुढील उपचारांसाठी मोठी रक्कम लागणार आहे. त्याच्या कुटुंबाने सरकार, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य जनतेला मदतीसाठी हाक मारली आहे.

"आमचा भाऊ जगण्यासाठी लढतोय, कृपया कोणी तरी मदत करा!" – भावनिक हाक देत त्याचे नातेवाईक आसवांनी डोळे भरून घेत आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेत खळबळ! मनसेने ३ फुटांचं पत्र ठेवलं आयुक्तांच्या टेबलावर!


संदिप कसालकर (वार्ताहर)

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्याने मोठा वाद उफाळून आला आहे. अग्निशमन विभागातील कर्मचारी आणि वैद्यकीय आरोग्य विभागातील लिपिक यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला असून, शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली थेट महापालिका आयुक्तांना ३ फूट लांबीचं पत्र देऊन या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे.


मनसेचा अनोखा पद्धतीने निषेध!

सामान्यतः महापालिकेला निवेदने आणि पत्रे दिली जातात, पण यावेळी मनसेने वेगळा मार्ग अवलंबला. "A4 साईजच्या कागदाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, म्हणून थेट ३ फूट लांबीचे पत्र देऊन प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला," असे संदीप राणे यांनी स्पष्ट केले. या पत्रात कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार!

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाले नाही तर त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळते. असे असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने कर्मचारी अस्वस्थ आहेत. यापूर्वीही अशा प्रकारचे प्रकार समोर आले असून, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

संदीप राणे यांचा थेट सवाल – "आयुक्त साहेब, उत्तर द्या!"

"महापालिकेत नव्या आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, स्थिती जैसे थे आहे. आता तरी कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत वेतन मिळेल का? की हा बेजबाबदार कारभार असाच सुरू राहणार?" असा थेट सवाल मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी केला आहे.

मनसेचा इशारा – अन्यथा तीव्र आंदोलन!

जर लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिले गेले नाही, तर मनसे आणखी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिका प्रशासन हादरले असून, आता आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने तातडीने यावर निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा, मनसेच्या आंदोलनामुळे हा विषय अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही!

पालिकेच्या पी-दक्षिण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे लहान मुलगी गंभीर जखमी!

संदिप कसालकर

एक लहान मुलगी तुटलेल्या अवस्थेत असणाऱ्या गटारात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेत नुकतीच घडली आहे.

गोरेगाव पूर्व येथील संकप्ल सिद्धी सोसायटी कुटीनो कॉलनी या सोसायटी शेजारीच वाहणाऱ्या मुख्य नाल्याशेजारीच असणाऱ्या परिसरात पालिकेच्या पी-दक्षिण विभागातर्फे बसविण्यात आलेल्या लाद्या तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. दरम्यान एक लहान मुली येथून जात असताना तुटलेल्या अवस्थेत असणाऱ्या लाद्यांच्या फटींमध्ये तिचा पाय कडून तिला गंभीर दुखापत झाली आहे.

सदर घटना कळताच या परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख अजित भोगले यांनी धोकादायक परिस्थितीत असणाऱ्या लाद्या तात्काळ बदलून घेतले आहेत. सदर घटना पाहता पालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभे राहिल्याचे दिसून येत आहे. 



"महानगर पालिकेला विनंती आहे की, लोकांनी मागणी केली नसताना व नको तिकडे किंवा गरज नसलेल्या ठिकाणी कामे करण्या पेक्षा अशा ठिकाणी काम करावे जेणे करून असे प्रकार होणार नाहीत." - अजित भोगले (शाखा प्रमुख, शिवसेना शाखा ५४, शिवसेना ठाकरे गट)

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात २५००० महिलांसाठी भव्य-दिव्य हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन!

 

संदिप कसालकर

२५००० महिलांसाठी भव्य दिव्य अश्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात करण्यात आले आहे. भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्र नाथ ठाकूर तसेच समाजसेविका ममता ठाकुर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी परिसरात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.


दरम्यान या प्रसंगी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली. सलग १२ वर्षांपासून आपण अश्या प्रकारचे उपक्रम जोगेश्वरी पूर्वेतील वार्ड क्रमांक ७७ मध्ये राबवत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. अश्या उपक्रमांच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यास मदत होत असून घराघरात हि पोहोचता येते. आशीर्वादही मिळत असतो असे धर्मेंद्र नाथ ठाकूर यांचे मत आहे.


दरम्यान सदर उपक्रम न फक्त वार्ड क्रमांक ७७ मध्ये राबविण्यात येणार असून संपूर्ण जोगेश्वरी विधानसभेतील ३० वेगवेगळ्या ठिकाणी २५,००० महिलांसाठी सलग १७ दिवस हळदीकुंकू कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे ठाकूर आणि सांगितले आहे.







"मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण"

मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या पालकांसाठी *मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम उपस्थित पालकांचे स्वागत करून आपल्या मुलांना मराठी माध्यमातून प्रवेश घेऊन त्यांनी घेतलेला निर्णय किती अचूक योग्य आहे. याचे महत्त्व सांगण्यात आले. 

  जपान, फ्रान्स जर्मनी या तीन देशातील मुले जगावर राज्य करतात. कारण या देशातील पालक आपल्या मुलांना मातृभाषेतून शिकवितात. हाच मुद्दा अधोरेखित करून उपस्थित पालकांनी घेतलेला मराठी माध्यमाचा निर्णय हा अत्यंत बरोबर व मुलांच्या मानसिकतेला धरून आहे याबाबत संकल्प संस्थेचे अध्यक्ष विष्णू बाळ धुरी सरांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी बोलण्याचा आणि बुद्धिमत्तेचा काडीचाही संबंध नाही हे याच शाळेतील अनेक माजी विद्यार्थी जे आज डॉक्टर, इंजिनिअर, सीए होऊन देशा परदेशात स्थायिक झाले आहेत त्यांची माहिती देण्यात आली. जी भाषा घरात बोलली जाते त्याच भाषेतून जर मुलांना शिकविले गेले तर मुलांचा केवळ बौद्धिक विकास नव्हे तर आत्मिक विकास सुद्धा होतो हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. "टिकवायचं जर असेल मुलांचं बालपण...तर मुलांना द्यायलाच हवे मातृभाषेतून शिक्षण," ही गोष्ट समस्त पालकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. घराबाहेर पडल्यावर भेटणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी पालकांनी सुरुवात मराठीतूनच करावी अस वचन उपस्थित पालकांकडून घेण्यात आले.


संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी मातृभाषेचे महत्त्व व त्यासोबतच विद्यार्थी, महिलांनी सुरक्षिततेच्याबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत अचूक मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मुख्याध्यापिका सुविधा शिर्के यांच्या मार्गदर्शनाने शिक्षिका स्मिता मोरे व
स्नेहल गावडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. उपक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

क्रूरतेची हद्दपार ! मुंबईत नवजात बाळाला फेकल्याप्रकरणी २२ वर्षीय महिलेला अटक

क्रूरतेची हद्दपार ! मुंबईत नवजात बाळाला फेकल्याप्रकरणी २२ वर्षीय महिलेला अटक.

रोहन दसवडकर 

गेल्या आठवड्यात मुंबईतील सायन हॉस्पिटलबाहेरील एका 22 वर्षीय महिलेला तिच्या नवजात बाळाला कचरापेटीत टाकून दिल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे . अर्भक मृतावस्थेत आढळून आले.

आईपीसी कलम 317 अन्वये अटक करण्यात आली आहे, पालक किंवा पालकाने 12 वर्षांखालील मुलाचे प्रदर्शन आणि त्याग करण्याशी संबंधित. याव्यतिरिक्त, कलम 315, एखाद्या मुलाला जिवंत जन्माला येण्यापासून किंवा जन्मानंतर त्याचा मृत्यू होऊ नये या हेतूने केलेल्या कायद्याशी संबंधित आहे, लागू केले आहे.

तिने कबूल केले आहे की मुलाचा विवाह विवाहातून झाला होता, ज्यामुळे दुसऱ्या मजल्यावरून बाळाची विल्हेवाट लावण्यापूर्वी तिला हॉस्पिटलच्या शौचालयात जन्म दिला. डोक्याला मार लागल्याने बाळाचा मृत्यू झाला . या महिलेला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


मालिकेतील छेडछाड करणाऱ्याला यूपीतून अटक. १४ दिवसानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात.

मालिकेतील छेडछाड करणाऱ्याला यूपीतून अटक. १४ दिवसानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात.

रोहन दसवडकर 

  14 दिवसांपासून फरार असलेल्या 23 वर्षीय सीरियल मॉलेस्टरला मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांच्या युनिट 3 ने रविवारी उत्तर प्रदेशमधून अटक केली.विशाल कनोजिया (२३) हा आरोपी तुळींज पोलिसांत विनयभंगाच्या गुन्ह्यात हवा होता. गेल्या आठवड्यात, पोलिसांनी छेडछाड करणार्‍याचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आणि नागरिकांना छेडछाड करणार्‍याला ओळखण्यास मदत करण्यास सांगितले, जो दोन आठवड्यांपासून फरार होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनोजियाने नालासोपारा पूर्वेतील एका सहा वर्षीय मुलीला घराबाहेर खेळत असताना फूस लावून तिचा लैंगिक छळ केल्याची घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली. कनोजियाविरोधात परिसरातील इतर पालकांकडून पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

“दोन विनयभंग करणाऱ्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि या घटनांमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते,” असे पोलीस अधिकारी म्हणाले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जारी केल्यानंतर यूपी एसटीएफ अधिकाऱ्यांनी मिर्झापूरमध्ये कनोजियाला अटक करणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली.

आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (विनयभंग) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या (POCSO) कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.





26/11 च्या दहशतवादी हल्ला पुन्हा होणार असा फसवा कॉल करणाऱ्या व्यक्तीला अटक: पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

26/11 च्या दहशतवादी हल्ला पुन्हा होणार असा फसवा कॉल करणाऱ्या व्यक्तीला अटक: पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न.

रोहन दसवडकर 

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या 15 व्या
स्मरणदिनानिमित्त रविवारी पोलीस नियंत्रण कक्षाला फसव्या कॉल केल्याबद्दल आणि अशाच हल्ल्यासाठी काही दहशतवादी शहरात घुसल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली.

रविवारी 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 दहशतवाद्यांनी शहरातील अनेक ठिकाणी हल्ले करून 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अगदी दोन दिसांपूर्वीच त्याचा स्मरण दिन साजरा केला गेला.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कॉलरने दोन किंवा तीन दहशतवादी मुंबईत घुसल्याचा दावा केला आहे आणि मानखुर्दमधील एकता नगर येथे आले.
दहशतवादी कारवाईची योजना आखत असल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी आरोपीचे नाव लक्ष्मण ननावरे असून तो मूळचा अहमदनगरचा आहे. त्याने दिलेली माहिती खोटी असल्याची खात्री केल्यानंतर मानखुर्द येथून त्याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की त्याने त्यांना सांगितले की त्याने स्थानिक बारमधून दारू प्यायली होती आणि घरी जात असताना एका व्यक्तीने त्याला कॉल करण्यासाठी फोन देण्यास सांगितले.

ननावरे म्हणाले की, कॉल केल्यानंतर फोन करणार्‍याने त्यांना फोन दिला आणि ते तेथून निघून गेले. अशा व्यक्तीने ननावरे यांच्याशी संपर्क साधला आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ननावरे यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंडाच्या कलम 182 (खोटी माहिती) आणि 505 (1) (ब) [जनतेला किंवा जनतेला भीती किंवा भीती निर्माण करण्याच्या हेतूने] गुन्हा दाखल केला.




पावसानंतर शहराचा निर्देशांक उत्तम श्रेणीत दाखल. जाणून घ्या आढावा

पावसानंतर शहराचा AQI उत्तम श्रेणीत दाखल. जाणून घ्या आढावा.

रोहन दसवडकर 

काही काळापासून अत्यंत खराब हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) अनुभवत असलेल्या या शहराला सोमवारी मोसमी पावसामुळे आकाश निरभ्र आणि जवळपास पूर्ण दृश्यमानता दिसली. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) च्या नऊ मॉनिटरिंग स्टेशन्सनुसार, एकूण AQI 47 वर 'चांगला' होता - मान्सूनच्या सुरुवातीच्या समाप्तीनंतर दिसला नाही. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) 30 हवाई निरीक्षण केंद्रांपैकी 23 ने एकूण 24 तासांचा AQI 59 वर 'समाधानकारक' श्रेणीत ठेवला आहे. PM2.5, कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड हे प्राथमिक प्रदूषक आहेत.

सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत पाऊस कमी झाल्याने कुलाबा येथे 6 मिमी आणि सांताक्रूझमध्ये 2 मिमी पाऊस पडला तरीही ही परिस्थिती कायम आहे.

CPBC च्या मते, वरळी हे ठिकाण 23 व्या क्रमांकावर होते, ज्यात कार्बन मोनोऑक्साइड हे प्रमुख प्रदूषक होते. त्याखालोखाल बीएमसीची घाटकोपर आणि शिवडी येथे ३२ स्थानके होती. माझगाव ३४ वाजता, भायखळा ३९, मुलुंड पश्चिम आणि विलेपार्ले पश्चिम ४०, कुलाबा ४२, चेंबूर ४६ आणि मालाड पश्चिम ४८.

स्टेशन्स हिरव्यागार रंगात असल्याने, मध्यम 'पिवळ्या' श्रेणीतील हवेच्या गुणवत्तेसह स्पॉट्स स्टँडआउट होते. CPCB च्या म्हणण्यानुसार, BKC 106 वर होता, PM2.5 सह.

हवामानामुळे देखील सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान होते, कुलाबा येथे कमाल 29.2 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 30.3 अंश सेल्सिअस तापमान होते. कुलाबा येथे किमान तापमान 23.5 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझमध्ये 22 अंश सेल्सिअसवर पोहोचले.

“पाऊस आणि वाऱ्याचा वेग आता कमी होईल, मंगळवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे,” असे शास्त्रज्ञ आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), मुंबईचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले. थंडीच्या टोकाला असलेले तापमान मंगळवारपर्यंत राहील, 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल आणि नंतर या आठवड्यात पुन्हा 34 आणि 35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.