BREAKING NEWS
latest
latest updates लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
latest updates लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'जाता पंढरीसी , सुख वाटे जीवा' कार्तिक यात्रेनिम्मित लाखोंमध्ये भाविकांची संख्या

'जाता पंढरीसी , सुख वाटे जीवा' कार्तिक यात्रेनिम्मित लाखोंमध्ये भाविकांची संख्या

रोहन दसवडकर

  ' जाता पंढरीसी , सुख वाटे जीवा ' अशा भावनेने कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यातील सुख अनुभवण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनाने तृप्त होण्याकरिता सुमारे चार लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत . भाविकांमुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज ११ तास लागत होते . शहरातील सर्व लॉज , मठ आणि धर्मशाळा वारकऱ्यांच्या गर्दीमुळे हाऊसफुल झाल्या असल्या तरी यंदा यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे जाणवत आहे . 


  कार्तिकी यात्रेसाठी विविध भागांतून निघालेल्या पायी दिंड्या पंढरपुरात पोचल्या असून जिकडे पाहावे तिकडे हाती भगवी पताका , कपाळी गंध आणि मुखी ' ज्ञानोबा - तुकोबां'चा जयघोष करत निघालेले वारकरी दिसत आहेत . प्रत्येकाला सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे . वारकऱ्यांच्या गर्दीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्ग , चंद्रभागेचे वाळवंट आणि नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर परिसर भक्तिमय झाला आहे , परंतु कार्तिकी यात्रेत दरवर्षीइतकी गर्दी यंदा दिसत नाही . राज्याच्या काही भागांतील दुष्काळी स्थिती आणि आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम यात्रेवर झाला आहे . 

राज्यामध्ये आत्ता NAAC नंतर टेक कोर्सेससाठी NBA मान्यता

राज्यामध्ये आत्ता NAAC नंतर टेक कोर्सेससाठी NBA मान्यता
 
रोहन दसवडकर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (BATU) चे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्याचे कार्यक्षेत्र आणि राज्यभरातील तंत्रज्ञान महाविद्यालये आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेला सरकारी ठराव (GR) समित्यांच्या स्थापनेची घोषणा करतो.  सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी नॅशनल असेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिल (NAAC) ग्रेडचा आग्रह धरल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने आता नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशन (NBA) द्वारे मूल्यांकनाकडे लक्ष केंद्रित केले आहे जे विशेषतः अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांसारख्या तांत्रिक कार्यक्रमांना मान्यता देते. उच्च शिक्षण संस्था आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील अभ्यासक्रमांची NAAC किंवा NBA मान्यता सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील अनेक विभागातील सह-संचालक आता स्थानिक समित्यांचे प्रमुख असतील.

   BATU अंतर्गत ही समिती आव्हाने ओळखून आणि ठरावांची शिफारस करण्यासोबतच, राज्यभरातील तांत्रिक अभ्यासक्रमांच्या NBA मान्यताला प्रोत्साहन देण्यासाठी एक रोडमॅप तयार करेल. सर्व सह-संचालक या पॅनेलचा भाग असतील जे त्यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महाविद्यालयांसाठी समान कृती आराखड्यावर काम करतील.
प्रा.डॉ. काळे यांनी स्पष्ट केले, “बाटूचे संपूर्ण महाराष्ट्रातील संलग्न तंत्रज्ञान संस्थांचे कार्यक्षेत्र आहे. तथापि, सध्या अशी महाविद्यालये आहेत जी BATU शी संलग्न नाहीत. विभागीय स्तरावरील सह-संचालकांच्या नेतृत्वाखालील पॅनेल त्यांच्या संबंधित क्षेत्रातील अशा महाविद्यालयांमध्ये ऑफर केलेल्या तांत्रिक अभ्यासक्रमांची NBA मान्यता सुनिश्चित करतील.”
   
तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी एनबीए मान्यताप्राप्तीचे महत्त्व लक्षात घेऊन, महाराष्ट्राच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने उच्च शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या समितीमध्ये तीन सदस्यांचा समावेश केला आहे.
  

'क्राय' सर्वेक्षणातील मोठा निष्कर्ष - मुलींकडून इंटरनेटचा सर्वाधिक वापर

'क्राय' सर्वेक्षणातील मोठा निष्कर्ष - मुलींकडून इंटरनेटचा सर्वाधिक वापर

राज्यात सहा ते १४ वर्षे वयोगटातील शालेय शिक्षण घेणाऱ्या मुली मोबाईल इंटरनेट सर्फिंगमध्ये दररोज तब्बल साडेचार तासांचा वेळ घालवतात . देशातील इतर राज्यांतील मुलंपिक्षा महाराष्ट्रातील मुलींचे हे प्रमाण सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष ' क्राय ' संस्थेने एका सर्वेक्षणातून काढला आहे . विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे ' क्राय'ने आपल्या अभियानात राज्यातील अनेक शाळांना भेटी देऊन पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता निर्माण केली . 
यात फिशिंग , सायबर छळ , ओळखचौर्य , खोट्या जाहिराती , सायबर ग्रूमिंग , सायबर ट्रॅफिकिंग आणि ऑनलाइन गेमिंग आदी बाबींचे शिक्षण मुलांना देण्यात आले . ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षित व दक्ष राहण्याच्या वेगवेगळ्या मार्गांबाबत माहिती दिली जाते . ऑनलाइन व फोनचे पासवर्ड्स सुरक्षित कसे ठेवावे , स्मार्ट फोन्सचे संरक्षण कसे करावे , समाज माध्यम खात्यांवर खासगी माहिती शेअर करताना कोणती काळजी घ्यावी आदी विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

    बालहक्क स्वयंसेवी संस्था ' क्राय'ने लहान मुलांमध्ये सायबर सुरक्षितता जागरूकता निर्माण करण्यासाठी १२ राज्यांतील २३ शहरांमध्ये एक अभियान राबवले होते . त्यात शालेय मुलांना आभासी , सायबर विश्वात माहितीच्या सुरक्षित व जबाबदार वापरास उत्तेजन देण्याचे तसेच त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते . त्यात अनेक ठिकाणी संस्थेने कार्यशाळाही घेतल्या , त्यात २० हजारांहून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता . त्याच अंतर्गत क्रायने ' पॉक्सो अँड बियॉण्ड : अंडरस्टॅण्डिंग ऑनलाईन सेफ्टी ड्युरिंग कोविड ' नावाने सर्वेक्षण शिक्षणासाठी केले . सर्वेक्षणातील अभ्यासानुसार महाराष्ट्रात सर्व वयोगटांमधील इंटरनेट वापराचे सरासरी प्रमाण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे . त्याखालोखाल पश्चिम बंगाल , मध्यप्रदेश आणि कर्नाटकाचा क्रमांक लागतो . त्यात राज्यात १४०१ / वर्षे वयोगटातील 8 १ सरासरी वेळ कमीच क्रायने नोंदवलेल्या निष्कर्षानुसार राज्यातील मुले दररोज सरासरी दोन तास शिक्षणासाठी खर्च करतात.   

  

सहाराविरोधातील कारवाई सुरूच राहणार: सेबी प्रमुख

सहाराविरोधातील कारवाई सुरूच राहणार: सेबी प्रमुख

रोहन दसवडकर

सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी गुरुवारी सांगितले की, समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या निधनानंतरही सहारा प्रकरण भांडवली बाजार नियामकासाठी सुरूच राहील .  रॉय यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दीर्घ आजाराने मंगळवारी मुंबईत निधन झाले. फिक्कीच्या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना बुच म्हणाले की सेबीसाठी सहारा प्रकरण एखाद्या संस्थेच्या वर्तनाबद्दल आहे आणि ते पुढे म्हणाले की एखादी व्यक्ती आहे की नाही याची पर्वा न करता ते चालूच राहील.

   परतावा खूप कमी का झाला असे विचारले असता, बुच म्हणाले की गुंतवणूकदारांनी केलेल्या दाव्यांच्या पुराव्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीद्वारे पैसे परत केले गेले.  सहारा समूहाला पुढील परताव्यासाठी सेबीकडे 24,000 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले असतानाही गुंतवणूकदारांना केवळ 138 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आल्याचे वृत्त आहे. सहारा समूहावर पॉन्झी योजना चालवल्याच्या आरोपांसह अनेक आरोप आहेत. रॉय यांच्यासाठी अडचणी नोव्हेंबर 2010 मध्ये सुरू झाल्या जेव्हा सेबीने सहारा समूहाच्या दोन संस्थांना इक्विटी मार्केटमधून निधी जमा करू नये किंवा जनतेला कोणतीही सुरक्षा प्रदान करू नये, तर रॉय यांना पैसे उभारण्यासाठी जनतेशी संपर्क साधण्यापासून रोखले.

सहाराविरोधातील कारवाई सुरूच राहणार: सेबी प्रमुख सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे अध्यक्ष, माधबी पुरी बुच यांनी म्हटले आहे की समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे निधन झाले तरीही सहारा प्रकरण नियामकासाठी सुरूच राहील. बुच यांनी यावर जोर दिला की हा मुद्दा घटकाच्या वर्तनाचा आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीची पर्वा न करता पुढे जाईल. सहारा समुहाला पुढील परताव्यासाठी सेबीकडे 24,000 कोटींहून अधिक रक्कम जमा करण्याचे आदेश दिले असतानाही, गुंतवणूकदारांना केवळ 138 कोटी रुपये परत करून परतावा अत्यल्प आहे. सहारा समूहावर पॉन्झी योजना चालवल्याचा आरोप आहे.


एक दिवा अवयव दानाचा ! अवयव दान म्हणजे एखाद्याला नवा जन्म देणे होय.

एक दिवा अवयव दानाचा

एखाद्याला आयुष्याची भेट देणे किंवा इतरांना जगण्यासाठी मदत करण म्हणजे दान होय. दान हे नेहमी सत्पात्री व गरज असणा-या व्यक्तिंना दिले पाहिजे. कर्णाने दिलेले कवच कुंडलाचे दान, शिबि राजाने कबुतराचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या अंगावरचे मांस काढून दिले. धर्म ग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या सामर्थ्यानुसार दान केले पाहिजे. प्रामाणिकपणे, शुध्द अंतःकरणाने दिलेले दान उपयुक्त ठरते.
वय,जात,रंग किंवा धर्म यातील समानतेचे दान म्हणजेच अवयवदान. ज्या रूग्णांचे अवयव कायम स्वरूपी निकामी झालेले असतात. अशा अनेक रूग्णांसाठी अवयवदान नवसंजीवनी देऊ शकते.

  डोळे,यकृत,हृदय,फुफ्फुस, स्वादुपिंड, आतडे,मूत्रपिंड, रक्तवाहिन्या,त्वचा,हाडे,हृदयाच्या झडपा,नसा, काॅर्निया,कानाचे ड्रम या अवयवांचे 6 ते 72 तासात पुनरोपण होते.एक दाता निरोगी अवयवाने आठ जणांचे जीव वाचवू शकतो.
भारतात प्रत्येक वर्षी 3 आँगष्ट रोजी शासकीय आणि निमसरकारी संस्था मध्ये अवयवदान दिन साजरा केला जातो.तामिळनाडू,महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ,दिल्ली, पंजाब ही देशातील सर्वाधिक अवयवदान देणारी राज्य आहेत. एखादा रस्ता अपघात झाल्यास केवळ इस्पितळात मृत्यू पावलेल्यांच्या शरीराचे अवयव दान करता येते. कर्करोग,एड्स, संसर्ग किंवा कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त लोक अवयव देऊ शकत नाहीत. अवयवदान ही प्रक्रिया एखादी व्यक्ती जिवंत असताना किंवा तिच्या उत्तराधिका-यांच्या संमतीने ती मृत्यू पावल्यावर केली जाते. भारतात अवयवदान प्रक्रिया केंद्र सरकारच्या कायद्यानुसार पार पडते. अवयवदानासाठी केंद्र सरकारची नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही संस्था काम करते. या संस्थेच्या www.notto.nic.in या सर्वोच्च संकेतस्थळावर स्वेच्छेने अवयवदाता म्हणून नोंद करता येते. 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकते. अवयवदान करताना पैसे घेणे कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी 1 ते 2 वर्षाची शिक्षा तर 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
जिवंत असताना आपण एक किडनी,स्वादुपिंडाचा तुकडा आणि यकृताचा एक छोटा भाग दान करू शकतो. याला स्वॅप ट्रान्सप्लांट म्हटले जाते म्हणजेच दोन विविध कुटुंबातील व्यक्तींमध्ये करण्यात आलेले अवयवदान. ट्रान्सप्लांट ऑफ ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 नुसार स्वॅप ट्रान्सप्लांटला कायदेशीर मान्यता आहे. अवयव प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी रक्त आणि ऊती जुळाव्या लागतात.

  विविध आघात,अपघात ,युध्द, आगी विविध कारणांमुळे अवयवदानाची आवश्यकता भासते. त्वचादान करण्यासाठी भारतात पहिली त्वचापेढी मुंबईच्या लोकमान्य टिळक रूग्णालयात 2000 साली सुरू झाली. घरी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सहा तासांपर्यंत डोळे व त्वचा यांचे दान करता येते. गरजू रुग्णाचे वय,रक्तगट, त्याच्या आजाराची तीव्रता,प्रतिक्षा यादीनुसार सर्वाधिक गरजू रुग्णाला अवयव दान केला जातो. परस्परांचे नाव व पत्ता गोपनीय ठेवला जातो.
देहदान केल्यास मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयोगात येतो. मृतव्यक्तित हृदयक्रिया बंद पडल्याने नेत्र आणि त्वचा वगळता इतर अवयवांना रक्त पुरवठा थांबल्याने हे अवयव प्रतिरोपणासाठी बाद ठरतात.
अपघाताने डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर एखादया व्यक्तिची चेतना व श्वासोच्छ्वास कायमस्वरूपी बंद झाल्यास त्या व्यक्तिचा मस्तिष्क स्तंभ (ब्रेन डेड) झाल्याने त्या व्यक्तिचे नेत्र,यकृत,हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, आतडे,मूत्रपिंड, त्वचा,हृदयाच्या झडपा,कानाचे ड्रम या अवयवांचे दान होऊ शकते. भारतामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान या गोष्टींना मान्यता दिली आहे. अवयव काढल्यानंतर त्याचे शरीर सन्मानपूर्वक नातेवाईकांना अंतिमविधिकरीता परत केले जाते. 
   अवयवदानाला संमती दिल्यानंतर त्यासाठी करण्यात येणा-या चाचण्यांचा तसेच इतर वैद्यकीय खर्च मृताच्या नातेवाईकांना करावा लागत नाही. व्यक्ति मृत झाली तरी त्याचे डोळे दोन ते सहा दृष्टीहीनांना नवजीवन देण्याचे महानकार्य करतात. आपल्या अवयवदानाची माहिती जवळच्या नातेवाईकांना देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या संमतीनेच अवयवदानाचे महानकार्य पूर्णत्वास जाऊ शकते. प्रत्येकाने संकल्पपूर्वक कटिबद्ध होऊन अवयवदानरुपी दिव्याने गरजू रूग्णांच्या आयुष्याला तेजोमय करूया.


 जय हिंद!
आपली नम्र,
सुरक्षा घोसाळकर 
पवई,मुंबई.

जलते दिए 🪔

जलते दिए 🪔

रोहन दसवडकर

हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्व आहे. धनत्रयोदशीपासून ही दिवाळी सुरू होऊन अगदी तुळशी विवाह समारंभापर्यंत दिवाळीचा झगमगाट, फराळाच्या सुगंधाचा घमघमाट, फटाक्यांचा कडकडाट, आणि आपल्या माणसांचा स्नेह हे सारे काही टिकून राहते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान करून घरच्या कुलदेवतेची, इष्ट देवतेची, गणेशाची, माता सरस्वती यांची पूजा केली जाते. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची आराधना केली जाते. दिवाळीच्या या सणांमध्ये घराबाहेर सर्वत्र मातीचे दिवे प्रज्वलित केले जातात. माती पासून अगदी वेगवेगळ्या आकारांमध्ये बनवलेले हे दिवे दिवाळीमध्ये जणू प्रकाशाचे रंग भरतात. 

हिंदू धर्मातला हा सण दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. लोक घराबाहेर, तुळशी समोर मातीचे दिवे लावतात. रामायणात असे सांगितले आहे की, लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम,पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक गावात दिवे लावले गेले. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. 14 वर्षाचा वनवास संपवून श्रीराम या दिवशी अयोध्येला परतले होते. त्यावेळेस अयोध्यवासीयांनी रांगोळी आणि दिव्यांनी संपूर्ण अयोध्या सजवली होती. आणि तेव्हापासूनच दिवाळी हा सण साजरा होऊ लागला. 

    मात्र दिवाळीत हे मातीचेच दिवे का लावले जातात? असा प्रश्न कधी ना कधी आपल्याला पडलाच असेल त्याचं कारण आपण जाणून घेऊया. दिवाळी मध्ये मातीचा दिवा प्रज्वलित करण्याला फार महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा माती आणि जमीनीचा कारक मानला जातो. मोहरीचे तेल शनि ग्रहाशी संबंधित आहे. यामुळेच माती आणि मोहरीच्या तेलाचे दिवे लावून मंगळ आणि शनि दोन्ही बलवान होतात. ज्यामुळे शुभ फल मिळते. जर एखाद्या व्यक्तीचे मंगळ आणि शनि बलवान असतील तर त्याला धन, संपत्ती, सुख आणि वैवाहिक जीवनात सर्व सुख प्राप्त होते. असे ज्योतिष शास्त्र सांगते. 

मातीचे दिवे लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते जी जीवनात आनंद टिकवून ठेवते. मातीचा दिवा हा पंच तत्वांचा निरूपण मानला जातो. खरे तर सर्व काही मातीच्या दिव्यात सापडते. दिवे हे माती आणि पाण्यापासून बनवले जातात. ते जाळण्यासाठी अग्नि लागते आणि हवेमुळे आग लागते. त्यामुळेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर फक्त मातीचे दिवे लावले जातात. अंधकारावर प्रकाशाने मात करावी आणि दाही दिशा उजळून निघाव्यात अगदी मातीच्या दिव्याने तसाच दिवाळी मध्ये अंधकार दूर होतो. आणि ही दिवाळी सर्वांसाठीच सुखद आणि प्रकाशमय होते.

60 व्या वर्षी, खुर्शीद मिस्त्री स्प्रिंट आणि अंतर धावणे या दोन्हींमध्ये झाले मास्टर.

60 व्या वर्षी, खुर्शीद मिस्त्री स्प्रिंट आणि अंतर धावणे या दोन्हींमध्ये झाले मास्टर.

रोहन दसवडकर

ॲथलेटिक्स ही एक शिस्त मानली जाते ज्यामध्ये वय तुम्हाला नैसर्गिकरित्या एक धार प्रदान करते-- तुम्ही जितके लहान आहात तितके तुम्ही फिटर, वेगवान आणि मजबूत आहात. मात्र, 60 वर्षीय खुर्शीद मिस्त्री हे वेगळ्या धाटणीचे आहेत.

एका अद्भूत कामगिरीत,खुर्शीद मिस्त्रीने 27-29 ऑक्टोबर दरम्यान दुबईतील अल WASL स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या ओपन इंटरनॅशनल मास्टर्स 2023 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर रिलेमध्ये तीन सुवर्णपदके आणि 4x100 मीटर रिलेमध्ये एक रौप्यपदक जिंकले.

याच इव्हेंटमध्ये अभिनेता अंगद बेदीनेही सुवर्णपदक जिंकले होते. नुकतेच कालबाह्य झालेले वडील, दिग्गज डावखुरा फिरकीपटू आणि भारताचे माजी क्रिकेट कर्णधार बिशनसिंग बेदी यांना आपला पराक्रम समर्पित करणार्‍या अंगदवर प्रसारमाध्यमांचे लक्ष ठामपणे असताना, खुर्शीदच्या अनोख्या पराक्रमाबद्दल अनेकांना माहिती नाही.

तिच्या दुबई कारनाम्याच्या दोन आठवड्यांपूर्वी, नुकतेच UTI म्युच्युअल फंडातून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवृत्त झालेल्या खुर्शीद यांनी वेदांत दिल्ली मॅरेथॉनमध्ये पोडियम फिनिशची नोंद केली होती.
"मी माझ्या कामगिरीवर खूप खूश आहे. मी पहिल्यांदाच धावणे आणि लांब पल्ल्याचे प्रशिक्षण एकाच वेळी केले, जे खूप कठीण आहे कारण दोन्ही शाखांमध्ये पूर्णपणे भिन्न कौशल्य आणि मानसिकता आवश्यक आहे. आठवड्यातून तीन दिवस, मी स्प्रिंट ट्रेनिंग करायचो आणि दोन दिवस मी लांब पल्ल्याच्या ट्रेनिंग करायचो.

हे सोपे नव्हते आणि मला दुखापत होण्याची शक्यता खूप जास्त होती, परंतु मी दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला होता,” खुर्शीदने मुंबई मिररला सांगितले.
"आंतरराष्ट्रीय स्पर्धा हा नेहमीच एक चांगला अनुभव असतो जिथे आपण वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंना भेटतो आणि त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची आणि शिकण्याची संधी मिळते. दुबई येथे होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आव्हानात्मक आणि समाधानकारक होती,"  यांच्याबद्दल दुर्मिळ आणि प्रशंसनीय गोष्ट म्हणजे ती धावणे आणि लांब पल्ल्याच्या धावणे या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. आणि अवघ्या साठाव्या वर्षात मास्टर झाले.



प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्याने मुंबई मेट्रो-३ च्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश.

प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्याने मुंबई मेट्रो-३ च्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश.

रोहन दसवडकर

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी जारी करण्यात आलेली नियमावली न पाळणाऱ्या कंत्राटदारांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि मनपानं दणका दिला आहे. शहरातील कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्पांशी संबंधित विविध पायाभूत सुविधांची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस बजावल्या आहेत. मनपाने जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला काम थांबवण्याची नोटीसा बजावली आहे, तर प्रदूषण नियंत्रण महामंडळानं १४ रेडी मिक्स काँक्रिट प्लांट्सना (RMC) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात लार्सन अँड टुब्रो लिमिटेडद्वारे चालवल्या जाणार्‍या चार प्लांट्सचाही समावेश आहे. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस मिळालेल्या इतर RMC प्लांट्समध्ये अविघ्न कॉन्ट्रॅक्टर्स, सेंच्युरी इस्टेट्स, स्वयं रिअल्टर्स अँड ट्रेडर्स, नागार्जुना कंस्ट्रक्शन कंपनी, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टर्स, ॲप्को इन्फ्राटेक आणि आयटीडी सिमेन्टेंशन इंडिया लिमिटेड यांच्या मालकीच्या युनिट्सचा समावेश आहे. 

जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला मनपाने काम थांबवण्याची नोटीस दिल्याची पुष्टी सहाय्यक महापालिका आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी केली आहे. “आम्ही बीकेसी परिसरात पायाभूत सुविधांची कामे करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना धूळ कमी करण्याच्या उपायांचे पालन करण्यास सांगितले होते. तरीही उपाय-योजनांचा कंत्राटदाराने (जे कुमार इन्फ्रा) पाठपुरावा केला नसल्याने त्यांना ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात आली”, असं क्षीरसागर यांनी सांगितलं. 
जे कुमार इन्फ्रा कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो कॉरिडॉरचे बांधकाम करत आहे आणि या प्रकल्पाचा टर्मिनल विभाग BKC मधील आयकर कार्यालय (ITO) जंक्शनवर आहे.

“आम्ही बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संबंधितांना सूचना पत्र जारी केलं आहे आणि त्यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यांनी आश्वासन दिले आहे की ते पुढील २ ते ३ दिवसांत उपाययोजनांचं पालन करतील”, असंही क्षीरसागर यांनी सांगितलं. गेल्या एका आठवड्यात, एकट्या बीकेसीमध्ये कार्यरत असलेल्या ९ कंत्राटदारांना काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

खासगी ट्रॅव्हल्स ची प्रवाशांकडून बेधुंद लूट...

खासगी ट्रॅव्हल्स ची प्रवाशांकडून बेधुंद लूट...

रोहन दसवडकर 

यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्सचे दरपत्रक प्रसिद्ध करूनही अनेक खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना लुटत असल्याचे चित्र आहे . पुणे यवतमाळ खासगी बसचे भाडे तब्बल पाच हजार रुपयापर्यंत आकारण्यात येत आहे . एवढ्या तिकिटात विमान प्रवास शक्य आहे . तक्रारीसाठी शासनाने सुरू केलेला हेल्पलाइन क्रमांकही अवैध दाखवत असल्याने दाद कोणाकडे मागावी , असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे . खाजगी ट्रॅव्हल्स बसेसने आकारावयाचे महत्तम भाडे दरपत्रक येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जाहीर केले. 

शासन निर्णयानुसार खाजगी ट्रॅव्हल्स बसेस व्यावसायिकांना एसटी महामंडळाच्या समकक्ष बसेसच्या दीडपट भाडे आकारणी करता येते . प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याचे दिसून आल्यास बसच्या चालक व मालकाविरुध्द कारवाई करण्यात येईल , असे पत्रक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काढले आहे . बसच्या तपासणी दरम्यान प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात आल्याचे आढळल्यास बसच्या चालक व मालकाविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येणार करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.

27 नोव्हेंबरपर्यंत 10 टक्के अतिरिक्त भाडे आकरण्याची मुभा एसटी महामंडळाचे प्रवास भाडे दर 8 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के अधिक आहेत . त्यामुळे खाजगी प्रवासी भाडे दरापेक्षा 10 टक्के अधिक भाडे आकारण्याची खाजगी बस वाहतूक दारांना मुभा देण्यात आली आहे . ही मुभा आजपासून 27 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे . मात्र सर्व खाजगी बस वाहनसेवा पुरवठादारांनी परिवहन विभागाने ठरवलेले भाडे दरपत्रक तिकीट बुकिंग कार्यालयात तसेच बसमध्ये प्रर्दशित करण्याच्या सूचनाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत . मात्र बहुतांश खासगी ट्रॅव्हल्सने या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे चित्र बघायला मिळते .

दिवाळीनंतर रस्त्यावर पुन्हा उतरू: ओबीसी समाजाची आंदोलनाची हाक...

दिवाळीनंतर रस्त्यावर पुन्हा उतरू: ओबीसी समाजाची आंदोलनाची हाक...

रोहन दसवडकर 

मराठा आरक्षणावरून सत्ताधारी महायुतीतील मंत्र्यांमध्ये वादंग सुरू असताना आता ओबीसी समाजाच्या नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध करीत ओबीसी नेत्यांनी दिवाळीनंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा मंगळवारी दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरू केल्यानंतर राज्य सरकारने पूर्वजांची मराठा-कुणबी नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याबाबतचे पुरावे आणि कार्यपद्धती ठरविण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली. पुरावे सादर करणाऱ्यांना तातडीने कुणबी दाखले देण्याचे आदेश विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास भुजबळ यांनी तीव्र विरोध केला असून, जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आणि न्या. सुनील शुक्रे यांनी शिष्टाई केल्याबद्दलही आक्षेप घेतला आहे. भुजबळ यांच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आश्चर्य व्यक्त केले.

 मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊनही सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी भूमिका भुजबळ कशी घेतात, असा सवाल करीत याबाबत मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळ यांना भडक वक्तव्ये करण्याची सवय असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यामुळे महायुती सरकारमध्येच आरक्षणावरून दुहीचे चित्र दिसले. या पार्श्वभूमीवर कोणीही ओबीसी किंवा इतरांमध्ये संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत, अशा कानपिचक्या देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले