BREAKING NEWS
latest

गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे ३५ दिवसांचा मोठा वाहतूक ब्लाॅक घेतला जाणार आहे. २७-२८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ५-६ ऑक्टोबरपर्यंत हा ब्लाॅक सुरू राहील. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे.

गोरेगाव - कांदिवली विभाग हा वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली दरम्यानच्या पाचव्या/सहाव्या मार्गाचा भाग आहे. वांद्रे टर्मिनस - बोरिवली दरम्यान पाचवी मार्गिका आणि खार रोड - गोरेगाव दरम्यान सहावी मार्गिका सुरू झाली आहे. तर आता गोरेगाव - कांदिवली स्थानकांदरम्यान सुमारे ४.५ किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम सुरू होणार आहे.

३५ दिवसांच्या ब्लाॅकमध्ये गणेशोत्सवातील ७ ते १७ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत प्रस्तावित कोणतेही काम केले जाणार नाही. त्यामुळे लोकल सेवा नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येईल. तर, ब्लाॅक कालावधीतच्या ५ व्या, १२ व्या, १६ व्या, २३ व्या आणि ३० व्या दिवशी पाच महत्त्वाचे १० तासांचे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लाॅक कालावधीत सुमारे १०० ते १४० लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत, तर, ४० लोकल सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. या ३५ दिवसांच्या मोठ्या ब्लाॅक कालावधीत कमीत कमी लोकल फेऱ्या रद्द करणे अपेक्षित आहे. तसेच आठवड्यातील शेवटच्या दिवशी ५ ते ६ दिवसांच्या ब्लाॅकमध्ये सुमारे ८० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, ७० लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर कांदिवली - बोरिवली विभागात सहाव्या मार्गाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

भविष्यात प्रवाशांना मिळणारे फायदे

सध्या सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पामुळे खार रोड - गोरेगाव दरम्यान सहावा रेल्वेमार्ग कांदिवली पर्यंत वाढविण्यात येईल. डिसेंबर अखेरपर्यंत त्याचा बोरिवली पर्यंत विस्तार करण्याचे नियोजन आहे. या कामामुळे लोकलचा वक्तशीरपणा सुधारेल. वांद्रे टर्मिनस धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी नवीन विस्तारित मार्गिका तयार होईल. अंधेरी - बोरिवली - विरार दरम्यानच्या प्रवाशांना हा मार्ग खूप फायदेशीर होईल. अतिरिक्त लोकल चालवण्यासाठी अतिरिक्त मार्गाचा उपयोग होईल. बोरिवली - खार रोड दरम्यानच्या सध्याच्या जलद मार्गावरील रेल्वे सेवाचा भार कमी होईल.

मुख्यमंत्र्यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, रवींद्र पाटील, विभागीय आयुक्त पी.वेलरासू, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री.घोटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, रूपाली पाटील, प्रांताधिकारी राहुल मुंडके, प्रवीण पवार, ज्ञानेश्वर खुटवळ, इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पनवेल पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम ६० आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम ६० पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम ६० या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे.
ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे, हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू आहे. जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.
या तब्बल १५५ किलोमीटर रस्त्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी पळस्पे, गडब, कोलाड, माणगाव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी केली. शेवटी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले.

राज्यातील कर्मचाऱ्यांनाही आता केंद्रानुसार सुधारित पेन्शन योजना..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे समितीच्या शिफारशीतले तत्व मान्य करुन राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५०% इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तिवेतनाच्या ६०% इतके कुटुंब निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल. वरीलप्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना १ मार्च, २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या आणि १ मार्च, २०२४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्तीपश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते २९ फेब्रुवारी, २०२४ पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकी (एन्यूइटी) मधीलच लाभ लागू राहतील व १ मार्च, २०२४ पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्तिवेतनधारकास या योजनेंतर्गत निवृत्तिवेतन देण्यात येईल.

या योजनेतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी (वर्गणीशी) निगडीत असेल. ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल. सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी वा नंतर काढलेली रक्कम १०% व्याजासह भरणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्तिवेतन त्या प्रमाणात अनुज्ञेय ठरेल.

यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यावर तसेच ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसमवेत अन्य कर्मचाऱ्यांसंदर्भाने सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमधून १ मार्च २०२४ पूर्वी आणि नंतर सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल. मात्र या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमधील त्यांचे अंशदान अद्यावत भरणा केलेली असणे आवश्यक राहील.

त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या ६०% परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर एन्यूइटी सर्व्हिस प्रोवायडर कडून प्राप्त होणारे ४०% वार्षिकीमधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या योजनेंतर्गत निवृत्तिवेतन अनुज्ञेय ठरेल. त्यासंदर्भाने या योजनेच्या अटी व शर्ती विहित करुन त्यासंदर्भातील कार्यपध्दती पीएफआरडीए च्या मान्यतेच्या अधिन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. मान्यता आणि अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासद आहेत तसेच उपरोक्तप्रमाणे अटींची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील. तसेच हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील.

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून मंगळवारी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळविण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकात भाजपतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर बांधण्यात येतात. या कालावधीत रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून मंगळवारी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळविण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकात भाजपतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. सर्वाधिक वर्दळीचा फडके रस्ता आणि रेल्वे स्थानक भागाशी निगडित हा चौक आहे. या चौकात मंगळवारी वाहन कोंडी होऊ नये म्हणून फडके रोड  रस्त्याने बाजीप्रूभ चौक भागात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फडके रस्त्यावरील महावितरण कार्यालय आणि कुळकर्णी ब्रदर्स येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने फडके रस्त्यावरून डावे वळण घेऊन अंबिका हॉटेल, के. बी. विरा शाळेवरून पी. पी. चेंबर्स मॉल किंवा पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावरून इच्छित स्थळी जातील.

मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता पाटणकर चौक येथे फडके वॉच दुकानाच्या बाजुला मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने जोधपूर स्वीट ते गिरनार चौक भागातून चार रस्ता भागात येणाऱ्या वाहनांना अडथळा होणार आहे. त्यामुळे टंडन रस्त्याने, दत्तनगर भागातून राजेंद्र प्रसाद रस्त्याने चार रस्ता पाटणकर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गिरनार चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने लेवा भवन सभागृह येथील छेद रस्त्याने किंवा दत्तनगर चौकातील टिपटॉप कॉर्नर म्हाळगी चौकातून दत्तनगर चौकातून, संगीतावाडी, प्रगती महाविद्यालय दिशेने इच्छित स्थळी जातील.

मानपाडा रस्ता, टिळक चौकाकडून चार रस्त्यावरून दत्तनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पाटणकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने संत नामदेव पथ, मानपाडा रस्ता, ग्रीन चौक, चिपळूणकर मार्गे इच्छित स्थळी जातील.

डोंबिवली पश्चिमेत माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाकडून दिनदयाळ रस्त्याने सम्राट चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दिनदयाळ रस्त्यावरील गणपती मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गणपती मंदिराजवळ डावे वळण घेऊन जी. एन. गॅरेज, एलोरा सोसायटीकडून सम्राट हॉटेल चौकाकडून रेतीबंदर, माणकोली पूल दिशेने जातील. रेतीबंदर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा भागातून सम्राट चौकाकडे येणाऱ्या वाहनांना सम्राट चौक व्यंकटेश सोसायटी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सम्राट चौकात डावे वळण घेऊन नाना शंकरशेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता किंवा महात्मा फुले रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील.

अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या प्रवेश बंदीमधून मुक्तता आहे. माणकोली पूल दिशेने जाणारी वाहने दिनदयाळ रस्त्यावरून धावतात. त्यामुळे रेतीबंदर चौक, गुप्ते रस्ता, सम्राट चौक भागात अभूतपूर्व वाहन कोंडी होण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या तिन्ही ठिकाणी पुरेसा वाहतूक पोलीस, पोलीस बंदोबस्त ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे.

साप्ताहिक राशिफल - 25 अगस्त से 31 अगस्त


मेष 
व्यवसाय: अटके कार्यो में गति आएगी एवं प्रसन्नता बनी रहेगी। धन की प्राप्ति होगी। कार्य की अधिकता बनी रहेगी, जिससे आपको नए प्रोजेक्ट्स पर काम करने का मौका मिलेगा।अनावश्यक खर्चे भी बढ़ सकते हैं।व्यापार में मेहनत अधिक रहेगी एवं नौकरी में संतुष्टि मिलेगी।
करियर और बिजनेस में लाभ मिलने के आसार नजर आ रहे हैं।अथॉरिटेटिव होकर निर्णय लें, सफलता मिलेगी.    
स्वास्थ्य: मुंह में छाले, कान दर्द एवं पैर के पंजों में दर्द होगा।
प्रेम: साथी से उलाहना मिल सकती है

वृषभ 
व्यवसाय: व्यापारी वर्ग के जातकों के लिए दिन बहुत ही शुभ रहने वाला है। नौकरीपेशा वर्ग के लोगों के लिए इस हफ्ते आय के अतिरिक्त स्रोत बनने वाले हैं।आपको करियर और बिजनेस से जुड़ा कोई बड़ा मौका मिल सकता है। साथ ही आपकी प्रतिष्ठित लोगों से जान पहचान बढ़ेगी।शत्रु परेशान करेंगे एवं आय की कमी के साथ, व्यय की अधिकता रहेगी। निकट के लोग धोखा दे सकते हैं।व्यापार में नए प्रस्ताव प्राप्त होंगे। नौकरी में बदलाव सही नहीं है।
स्वास्थ्य: कमर दर्द की समस्या हो सकती है।
प्रेम: जीवन में साथी का व्यवहार उचित नही रहेगा। वैवाहिक प्रस्ताव स्वीकार नहीं होंगे।

मिथुन 
व्यवसाय: आय वृद्धि के साथ, अटके धन की प्राप्ति होगी। ऋण संबंधी समस्याएं दूर होंगी। कार्य समय पर होंगे एवं दूसरों का सहयोग मिलेगा।अनावश्यक खर्च होंगे विश्वासघात भी हो सकता है।
व्यापार लाभ वृद्धि वाला होगा एवं नौकरी में जिम्मेदारी बढेगी । लोग नौकरी कर रहे हैं उन लोगों को मनचाहा प्रमोशन या ट्रांसफर मिल सकता है। सरकारी कामकाज की रुकावटें दूर होगी 
स्वास्थ्य: चेहरे पर चोट या जोडों के दर्द की समस्याएं हो सकती हैं।
प्रेम: साथी से दूरी हो सकती है। वैवाहिक जीवन में तनाव समाप्त होगा।

कर्क 
व्यवसाय: नौकरीपेशा जातकों के लिए समय बहुत ही लाभकारी साबित होगा क्योंकि, आपकी आय के अतिरिक्त स्रोत बनेंगे। जो लोग रंग, केमिकल और दवाइयों से जुड़े कामकाज करते हैं उन्हें मनचाहा लाभ प्राप्त होगा।कार्यस्थल पर आपको सीनियर और जूनियर का पूरा सहयोग मिलेगा। आपके सभी काम समय पर पूरे होते जाएंगे।सुख वृद्धि होगी एवं आय भी अच्छी बनी रहेगी। कार्य में देरी नहीं होगी।उधार देने से बचें और विवादों से दूर रहने की कोशिश करें।व्यापार उत्तम रहेगा एवं नौकरी में तरक्की के मौके प्राप्त होंगे।
स्वास्थ्य: पैर के नाखून में चोट लग सकती है। स्थायी रोगों में आराम रहेंगा।
प्रेम: प्रेम प्रस्ताव स्वीकृत होंगे एवं जीवन साथी मनोबल वृद्धि करेंगा।

सिंह 
व्यवसाय: आपके सुख में वृद्धि होगी एवं बेहतर ढंग से आगे बढ़ने के मौके प्राप्त होंगे। कार्य सफल होंगेआय वृद्धि होगी एवं संचित धन में भी वृद्धि होगी।अनावश्यक खर्चे भी बढ़ सकते हैं।व्यापार में खुशी नही रहेगी एवं नौकरी बदलने का विचार कर सकते है।आप काम में काफी व्यस्त हो सकते हैं।व्यापारिक स्थिति सुदृढ़ होगी। अपनों का साथ होगा। कोर्ट-कचहरी का साथ होगा। राजनीतिक लाभ होगा। अंत में आय की स्थिति बहुत सुदृढ़ होने वाली है। कार्यों की विघ्न-बाधा खत्म होगी।
स्वास्थ्य: गले में खराश, सर्दी, जुकाम होगा। पेट एवं कमर में दर्द रहेगा।
प्रेम: साथी से क्लेश होगा एवं जीवन साथी तनाव बढ़ सकता है।

कन्या 
व्यवसाय: व्यापार अच्छा है।व्यावसायिक सफलता मिलने के योग हैं।आपके कामकाज से जुड़ी जो भी समस्याएं आ रही थी वह सभी बाधाएं दूर हो जाएंगी।आपका व्यापार में लंबे समय से धन कहीं फंसा हुआ है तो वह पैसा इस हफ्ते आपको अचानक वापस मिल सकता है।बेकार के कार्यों में समय व्यतीत होगा। खिन्नता बनी रहेगी।आपकी आय में वृद्धि होने की संभावना है, और लंबे समय से चली आ रही उलझनें भी सुलझ सकती हैं।व्यापार में कार्य ज्यादा हो सकता है। नौकरी में तनाव रहेगा।
स्वास्थ्य: सीने में दर्द एवं आंखों में जलन के साथ तनाव रह सकता हैं।
प्रेम: प्रेम में निराशा मिल सकती है। वैवाहिक जीवन सुखमय रहेंगा।

तुला 
व्यवसाय: आय कमजोर होगी एवं व्यय की अधिकता होगी। कार्य में बाधा आएगी। धन की कमी हो सकती है।छोटी-छोटी सफलताएं भी प्राप्त होंगी।व्यापार में अड़चन आ सकती है। नौकरी में लक्ष्य साधने में बाधा आएंगी।नौकरी चाकरी की स्थिति अच्छी होगी।व्यापार की स्थिति लगभग ठीक चलेगी।कार्यों की विघ्न-बाधा खत्म होगी।निवेश सावधानी पूर्वक करें ।
स्वास्थ्य: दांत, कमर एवं पैर में चोट लग सकती है। दाईं आंख में तकलीफ होंगी।
प्रेम: साथी से विवाद थमेगा एवं वैवाहिक सुख बना रहेंगा।

वृश्चिक 
व्यवसाय: अधिक धन खर्च न करें ।नये अनुबंध और साझेदारी के कार्यों में लाभ होगा । धन और प्रतिष्ठा में वृद्धि होगी।कार्यों की विघ्न बाधा खत्म होगी। नौकरी चाकरी की स्थिति सुदृढ़ होगी।आप आवश्यक सभी काम अब कर पाएंगें। आय भी अच्छी होंगी एवं सहयोग भी प्राप्त होगा।व्यापार में रुकावट आएंगी एवं नौकरी में अधिकारी संतुष्ट रहेंगे।कुछ चुनौतीपूर्ण क्षणों के बावजूद सफलता के संकेत भी हैं।आप कार्य में बदलाव के लिए भी विचार कर सकते हैं।निवेश ना करें।
स्वास्थ्य: रक्तचाप, हर्निया, पाइल्स वालों को दिक्कत बढ़ सकती है।
प्रेम: साथी से दूरी एवं जीवनसाथी से सहयोग प्राप्त होंगा।

धनु 
व्यवसाय: आपकी आय उत्तम बनी रहेगी।आर्थिक समस्याएं दूर होंगी। स्थायी धन-संपत्ति में वृद्धि के संकेत हैं, जो आपकी वित्तीय स्थिति को मजबूत करने में सहायक हो सकते हैं। न्यायालयीन मामलों में भी आपको सफलता प्राप्त होने के आसार हैं, जो आपकी कानूनी परेशानियों को सुलझाने में मदद हालांकि सब कुछ अच्छा रहेगा। लेकिन आपकी चिंता और परेशानियों का समाधान ढूंढना आवश्यक होगा।आपके प्रयासों का अच्छा फल देखने को मिलेगा और आपकी वित्तीय स्थिति में सुधार होगा। आपकी योजनाएं और कार्यकुशलता आपको सफलता की ओर ले जाएंगे।व्यापार में तेजी आएंगी। नौकरी में प्रमोशन का योग है। पुराने निवेश से धन लाभ भी हो सकता है.
स्वास्थ्य: हड्डी में चोट एवं ज्वर आ सकता है।
प्रेम: साथी से वैचारिक मतभेद एवं वैवाहिक जीवन सुखमय रहेगा।

मकर 
व्यवसाय: जमीन-जायदाद या पैतृक संपत्ति से जुड़े मामले सुलझेंगे। कोर्ट-कचहरी के मामलों में भी आपके पक्ष में संकेत मिल रहे हैं। चुनाव से जुड़ा कोई फैसला लेना चाहें तो भी मौका अनुकूल है।नौकरी में भी बदलाव मिलेगा।पिछले रूके हुए काम होंगे तथा नुकसान की भरपाई होने से मन प्रसन्न रहेगा । नये कार्य की योजना बनेगी ।सामाजिक जीवन का दायरा बढ़ेगा ।कार्यस्थल पर सुगमता बनी रहेगी। योग्यता के अनुसार कार्य प्राप्त होंगे।व्यापार सामान्य से अच्छा रहेगा एवं नौकरी में अधीनस्थ सहयोग करेंगे।सरकारी कार्यों में भी सफलता मिलेगी।कार्यक्षेत्र में सफलता की प्राप्ति होगी।
स्वास्थ्य: आंख, बाएं कान एवं हड्डी एवं त्वचा में समस्याएं हो सकती है।
प्रेम: साथी से सहयोग मिलेगा एवं वैवाहिक प्रस्तावों की प्राप्ति होंगी।

कुम्भ 
व्यवसाय: सरकारी कार्य में बाधा समाप्त होंगी। विरोधी पस्त होंगे।ऋण संबंधी मामले उलझेंगे।आपकी सोची हुई योजनाएं पूरी करने में आप सफल होंगे, हालांकि आपकी आय में रुकावट बनी रह सकती है।-व्यापार में समय अच्छा रहेगा एवं नौकरी में अधिकारी सहयो करेंगे।व्यापारिक स्थिति पहले से बेहतर होगी।आपके भाग्य का सितारा चमकेगा।आर्थिक स्थिति मजबूत होगी।व्यापार ठीक-ठाक चलेगा।पिछले रूके हुए काम होंगे तथा नुकसान की भरपाई होने से मन प्रसन्न रहेगा
स्वास्थ्य: बांई कलाई पर चोट लग सकती है। दांत में दर्द रहेंगा।आपको नसों की समस्या हो सकती है।
प्रेम: साथी से तनाव समाप्त होंगा। वैवाहिक जीवन संतोषमय रहेंगा।

मीन 
व्यवसाय: आपके रुके हुए कामों को पूरा होने से अच्छा वातावरण बनेगा।निवेश में लाभ होगा । पद प्रतिष्ठा में वृद्धि होगी ।अधिक निवेश और धन खर्च में सावधान रहने की आवश्यकता है।भावुकता में कोई निर्णय नहीं लें ।आर्थिक स्थिति सुदृढ़ होगी। व्यापारियों के लिए लाभ के योग हैं।कार्य में सफलता की प्राप्ति होगी। नए प्रयोग सफल होंगे।सफलता की प्राप्ति होगी। भाग्य भी साथ देगा।व्यापार उल्लेखनीय नहीं रहेगा।आय में वृद्धि और कार्य में उन्नति देखने को मिलेगी।
स्वास्थ्य: वाहन, विद्युत, जल एवं ऊंचाई से बचकर रहें। पेट में तकलीफ हो सकती है।
प्रेम: साथी से विवाद होगा एवं वैवाहिक जीवन में उच्चाटन होगा।

'राज्यस्तरीय कृषि महोत्सव’चे दिमाखदार उद्घाटन.. आता राज्यात लाडका शेतकरी अभियान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

बीड : लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी  अभियान राज्यात सुरु करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई-पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषि महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली.
परळी येथील स्व.पंडीत अण्णा मुंडे सभामंडप कृषि उत्पन्न बाजार समिती येथे एका दिमाखदार सोहळ्यात पाच दिवसीय कृषि महोत्सव २०२४ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच विधानपरिषद सदस्या आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. तसेच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यासोबतच परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
पाच दिवसीय चालणाऱ्या या कृषि महोत्सवात कृषि साहित्य प्रदर्शनासोबतच पशुप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसात विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होणार आहे. तसेच याठिकाणी धान्य महोत्सव, रानभाजी महोत्सव होणार आहे. प्रदर्शनात महिला बचतगटांसाठी साहित्य विक्रीची दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कृषि अवजारांचा स्वतंत्र विभाग देखील याठिकाणी आहे. या पाच दिवसीय महोत्सवाला किमान पाच लाख शेतकरी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गतवर्षी सोयाबीन, कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी आवश्यक ई-पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता ई-पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल,असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच लाडक्या भावांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. याची सुरुवात आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे त्यांनी सांगीतले. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी’ हेच शासनाचे धोरण असून राज्यातील कांदा, सोयाबीन, कापूस आणि दुधाला योग्य मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच कृषि क्षेत्रातील नवीन बदलांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी, आधुनिक शेतीला चालना मिळून राज्यातील कृषि क्षेत्राचा विकास होण्यासाठी कृषि महोत्सव उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि त्यांना सन्मान मिळवून देणारी असल्याचे नमूद करून ही योजना सुरु केल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले. राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रात न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगून ते म्हणाले की, केवळ १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे कृषिमंत्री शिवराजसिंह  चौहान म्हणाले.
मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची योजना अंतिम टप्प्यात असून बीड जिल्ह्यातील आष्टीपर्यंत लवकरच हे पाणी येईल. यासाठी मराठवाड्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सुमारे ११ हजार कोटींची कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना हाती घेण्यात आली आहे. ११ सिंचन प्रकल्पांसाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी ५३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून माजलगाव कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष दूर होवून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी गती देणारी ठरेल असे त्यांनी सांगितले. 
सर्वसामान्य गरीब नागरिक हा केंद्रबिंदू मानून राज्य शासन विविध योजनाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे.  त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून जवळपास सव्वाकोटी माता-माउलींच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच गरीब कुटुंबातील मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे ५२ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच अवर्षणप्रवण भाग असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषि महोत्सवात शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून त्यांचे उत्पन्न वाढीसाठी हा महोत्सव उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रात होत असलेल्या क्रांतीची, नवीन बदलांची माहिती मिळावी, यासाठी कृषि विभागाने राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च करून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे. ड्रोनद्वारे फवारणी, नॅनो युरिया, नॅनो डीएपी वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च जवळपास ३० टक्केने कमी होवून उत्पन्नात २० टक्के वाढ होईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये कृषि आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी राज्यस्तरीय कृषि महोत्सवाबाबत माहिती दिली. पाच दिवसीय कृषि महोत्सवात शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगांची माहिती देण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून ४०० पेक्षा अधिक दालनांतून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, प्रयोगांची माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी महिला आणि शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांचा एकत्रित हार घालून सत्कार करण्यात आला. तसेच बैलबंडी भेट देण्यात आली. या कार्यक्रमास व्यासपीठावर आमदार विक्रम काळे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार टी.आर. जिजा पाटील, माजी आमदार सुरेश धस, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी आभार मानले.

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम मार्गी लावण्यात येईल ! - महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम मार्गी लावण्यात  येईल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली. यासाठी सुमारे रु.२२ कोटींची तरतुद करण्यात आली असून,१५ एजन्सींची नेमणूक या कामासाठी करण्यात आली आहे. कालावधी कमी असल्यामुळे काही ठिकाणी यासाठी पेव्हरब्लॉकचा वापर केला जाणार आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त नागरीकांना शाडूची श्रीगणेश मूर्ती घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि महापालिका परिक्षेत्रातील मूर्तीकारांनी शाडूच्याच मूर्ती बनविणे, यासाठी एनजीओंची मदत घेवून नियोजन करण्यात येईल, अशीही माहिती डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिली.

महापालिका क्षेत्रात  श्रीगणेशोत्सवातील विविध परवानग्यासाठी दि २३ ऑगस्टपासून प्रभागनिहाय एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे  त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे 'राईट टू पी' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याासाठी बीओटी तत्वावर शौचालये बनविण्याचा प्रस्ताव असून, महिलांसाठी 'प्री फॅब्रिकेटीड टॉयलेट्स' बनविण्याची योजना प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिली. तसेच महापालिका शाळा, उद्याने व रुग्णालये याठिकाणी सीसीटीव्ही लावणेबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.