BREAKING NEWS
latest

गांधी जयंती निमित्त 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'स्वच्छ्ता अभियान' राबविण्याचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय लाल बहादूर शास्त्री जी यांची जयंती 'जे एम एफ' मधुबन वातानुकुलीत दालनांत साजरी करण्यात आली. प्रतिमेची पूजा करून गांधीजींचे 'वैष्णव जन तो तेने काहिये जी..' हे भजन लावून गांधीजींच्या प्रती भावना व्यक्त केल्या गेल्या. स्वच्छ भारत, सुंदर भारत ह्या अंतर्गत महात्मा गांधीजींच्या विचाराच्या सरणीचा प्रभाव सर्व भारतीयांवर आहे. 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन शाळा, महाविद्यालय, वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या सर्व विध्यार्थ्यांनी शाळेमध्ये स्वच्छ्ता अभियान राबविले.  भारताचे सुजाण नागरिक म्हणून जबाबदारीने सर्व विद्यार्थ्यांनी शाळा ते कोपर स्टेशन पर्यंत रस्त्यावर जाऊन साफ सफाई केली.
आपण भारताचे सुजाण नागरिक आहोत, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांच्या सारख्या आदर्श विचारवंतांचे विचार नेहमीच सर्वांना उस्फुर्त करतात.'जय जवान, जय किसान' चा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला. गांधीजी  आपापली कामे स्वतः करत असत असे आदर्श नेते आपल्या भारताला लाभले, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले व स्वतः हातात झाडू घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ केला. सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी देखील डॉ. राजकुमार कोल्हे यांच्याबरोबर श्रमदान केले. सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारीतून भारताचा विकास होण्यास मदत होते असे सांगून डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांबरोबर स्वच्छ्ता अभियानात आपला सहभाग दर्शवला.

व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याकरीता आलेल्या तीन इसमांना गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण पोलीसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  गुन्हे शाखा घटक - ३ कल्याण चे सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दि. २७/०९/२०२४ रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या सुमारास काही इसम मारुती सुझुकी कंपनीच्या राखाडी रंगाची वॅगनआर गाडी क्रमांक एमएच४६ - बीई ५४२६ मधुन व्हेल माशाची उलटी अनधिकृत रित्या जवळ बाळगून विक्रीसाठी डोंबिवली पूर्वेकडील बदलापुर पाईपलाईन रोड, मानपाडा येथे मोरया धाब्याच्या बाजूला येणार आहेत.

सदर मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचत तीन संशयीत इसमांना व्हेल माशाची उलटी अनधिकृत रित्या जवळ बाळगून ती विक्री करण्याकरीता घेवुन आलेले असताना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

सदर सशंयीत इसमांकडे अधिक चौकशी करता त्यांची नावे १) अनिल राधाकृष्ण भोसले (वय: ५५ वर्ष) राहणार दत्त कृपा सोसायटी चाळ नं. ए/४४, रुम नं. १८, न्यु पनवेल, सेक्टर ६, जि. रायगड, २) अंकुश शंकर माळी (वय: ४५ वर्षे), राहणार कासव, मु.पो. आपटा रसायनी, पनवेल, गांव, जि. रायगड, ३) लक्ष्मण शंकर पाटील (वय: ६३ वर्षे) राहणार मु.पो. वांवजे गाव, मोहोदर, ता. पनवेल, एमआयडीसी, तलोजा, नवी मुंबई अशी असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर तीन इसमांची व त्यांच्या ताब्यात असलेल्या वॅगनआर गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ५ किलो ६४२ ग्रॅम वजनाची रुपये ६,२०,००,०००/- (सहा करोड वीस लाख रूपये) किंमतीची सफेद रंगाच्या पिशवीमध्ये सेलो टेप लावुन गुंडाळलेली व्हेल माशाची उलटी सापडली.

वरील नमुद तीन्ही इसमांच्या ताब्यातुन व्हेल माशाची उलटी, एक मारूती सुझुकी कपंनीची वॅगनआर गाडी, तसेच विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण ६,२२,१५,०००/- रूपये किमतीची मुदद्दे‌माल जप्त करण्यात आहे. सदर तिन्ही इसमांनी आपसात संगनमत करुन व्हेल माशाची उलटी बेकायदेशीर रित्या जवळ बाळगून त्याची वाहतुक करुन विक्री करण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्यांच्याविरुध्द मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. १०८५/२०२४ वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४,४८,४९(सी), ५१,५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण कडुन करण्यात येत आहे. 
सदरची यशस्वी कामगिरी मा.पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा.शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध - १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि. संतोष उगलमुगले, संदिप चव्हाण, सपोउनि. दत्ताराम भोसले, पोहवा. विश्वास माने, विलास कडु, पोकॉ. गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे यांनी केलेली आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा गुन्हाच - सुप्रीम कोर्ट

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली: चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे व डाऊनलोड करणे हा पोक्सो कायदा व माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हाच आहे, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. चाईल्ड पोर्नोग्राफी याऐवजी बालकांवर लैंगिक अत्याचार व शोषण करणारी सामग्री हा शब्दप्रयोग व्हावा, यासाठी संसदेने कायद्यात दुरुस्ती करावी, अशी सूचना न्यायालयाने केली. न्यायालयांनी चाईल्ड पोर्नोग्राफी शब्दाचा वापर करू नये, असाही आदेश दिला आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफी पाहणे, डाऊनलोड करणे हा पोक्सो व आयटी कायद्यान्वये गुन्हा नाही, हा मद्रास उच्च न्यायालयाने याआधी दिलेला निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील व न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने रद्दबातल ठरवला.

चाईल्ड पोर्नोग्राफीच्या व्हिडीओ फिती व अन्य सामग्री मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्याचा आरोप असलेल्या एका २८ वर्षीय व्यक्तीवरील फौजदारी कारवाई मद्रास उच्च न्यायालयाने ११ जानेवारी रोजी रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती कायम ठेवली व सत्र न्यायालयापुढे नव्याने हा खटला चालविला जाईल, असे म्हटले. मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात फरिदाबाद येथील 'जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन्स अलायन्स' आणि दिल्ली येथील 'बचपन बचाओ आंदोलन' या दोन स्वयंसेवी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

'जाह्नवीज मल्टी फाऊंडेशन' च्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : ज्या सत्कार्यासाठी दैवी नियोजनाने जन्मास येणे म्हणजे वाढदिवस. 'जे एम एफ' शिक्षण संस्थेच्या संस्थापिका, सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे यांचा वाढदिवस दिनांक २३ सप्टेंबर रोजी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग यांनी मिळून 'जे एम एफ' च्या प्रांगणात मोठ्या धामधुमीत साजरा केला. कायमच चेहऱ्यावर स्मित हास्य असलेला सोज्वळ आणि आनंदी चेहरा, डोळ्यामध्ये दिसणारा प्रेमाचा ओलावा, जिभेवर कायमच साखर ठेऊन बोलला जाणारा गोड मृदू आवाज, सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच अन्नपूर्णा म्हणून ख्याती असणाऱ्या आणि रोजच सर्व छोट्या मुलांना प्रेमाने कवेत घेणाऱ्या सर्वांच्या आवडत्या डॉ. प्रेरणा मॅडम म्हणजे लहान मुलांची आईच जणू. असे हे त्यांचे व्यक्तिमत्व नेहमीच भारावून टाकणारे आहे.
२३ सप्टेंबर हा दिवस म्हणजे डॉ. प्रेरणा कोल्हे यांचा वाढदिवस. परंतु हा दिवस केवळ वाढदिवस म्हणून साजरा न करता 'अन्नपूर्णा दिवस' म्हणून ही साजरा केला जातो. कोणत्याही पदार्थाची अविट गोडी ही अलगदपणे प्रेरणा मॅडम यांच्या हातातून तयार होते. अन्नपूर्णा दिवस म्हणून शिशु विहार ते दहावीच्या सर्व मुलांनी आपापल्या वर्गात भेळ बनवली व स्वतःच्या हातांनी डॉ. प्रेरणा कोल्हे यांना प्रेमाने खाऊ घातली. वर्गात प्रवेश करताच सर्व मुलांनी स्वतःच्या हाताने बनवून आणलेले वाढदिवसाचे शुभेच्छा ग्रिटींग्ज त्यांच्या लाडक्या प्रेरणा मॅडम यांना दिले. इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि सुंदर रित्या मॅडम यांच्या केबिन ची सजावट केली होती. वाढदिवसाचे संस्कृत गाणे गाऊन सर्व विद्यार्थ्यानी डॉ. प्रेरणा कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या. अचानकच आश्चर्य रित्या केलेले स्वागत बघुन डॉ. प्रेरणा कोल्हे भारावून गेल्या व तीन ते चार हजार मुलांना, कर्मचाऱ्यांना आईस्क्रीम ची मेजवानी दिली. तर परतीची भेट वस्तू म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना 'जे एम एफ' नाव कोरलेली बॅग दिली.
सर्व शालेय व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील ५६ भोग पदार्थ बनवून आणून सुबक रित्या जेवणाचे टेबल सजवले होते. सर्व शिक्षकांनी मिळून भेटवस्तू देऊन, नृत्य करून प्रेरणा मॅडम यांचा वाढदिवस साजरा केला. सर्वांनी मॅडम बद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर प्राध्यापिका सौ. दिपाली कुलकर्णी यांनी कौतुकाची शीघ्र कविता करून ती वाचून दाखवली. अनेक पावसाळे बघितलेल्या, ज्यांच्या वरदहस्त कायमच डोक्यावर आहे अशा ८९ वर्षीय आदर्श शिक्षिका  श्रीमती तुळसाबाई लाकडे, संस्थेच्या खजिनदार कन्या जान्हवी कोल्हे यांनी व पाच सुवासिनींनी डॉ. प्रेरणा कोल्हे यांना औक्षन केले.

याच दिवशी सर्व इयत्तेचे वर्ग शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, संस्थापक आणि सचिव यांच्या बरोबर वर्ग फोटो काढला जातो. संपूर्ण दिवसाचा वाढदिवसाचा सोहळा बघुन डॉ. प्रेरणा कोल्हे थक्क झाल्या, तुम्ही केलेल्या प्रेमाच्या आपुलकीच्या, वर्षावामुळे माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत, मी तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही, कारण असे केले तर ती औपचारिकता ठरेल आणि आपण मनाने, सहृदयाने  एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत तर असेच प्रेम आपुलकी कायम आपल्यात राहू द्या एवढेच मी म्हणेन, असे सांगून सर्वांप्रती भावना व्यक्त केल्या.
       
माझी आई ही माझी एकटीची आई नसून ती सर्वांची आई आहे, मला कायमच माझ्या आईचा अभिमान वाटत आलेला आहे, आयुष्यातले चढ उतार असताना देखील ठाम पणे लढा देत सामोरी जाणारी आई मी पाहिली आहे आणि अशा माझ्या 'हिरकणी' ला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देऊन खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
 एक वेळ आयुष्याची शिदोरी कमी पडेल परंतु आयुष्यभर साथ देणारी भार्या कायमच माझ्या बरोबरच आहे याचा मला अभिमान आणि आनंद वाटतो. 'सुहास्य तुझे मनासी मोही.. जशी 'नि' मोही सुरासुरात.. अशा पंक्ती गाऊन संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी भार्या, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

जोगेश्वरी के बैनर और नारों के पीछे छिपा है बड़ा संघर्ष: जानिए क्या हो रहा है?

संवाददाता: विनेश मिश्रा

जोगेश्वरी की सड़कों पर बैनर लहराते हुए नारे गूंज रहे हैं—"जोगेश्वरी के जन-जन का विश्वास, इस बार भाजपा का होगा विकास!" लेकिन इस उत्साह के बीच, भाजपा में उमेदवार की दौड़ में एक बड़ा संघर्ष छिपा हुआ है।

हाल ही में, पूर्व नगरसेविका उज्वला मोडक ने देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर अपनी दावेदारी पेश की। वहीं, जिला अध्यक्ष संतोष मेढेकर के समर्थक भी सक्रिय हो गए हैं और उन्हें उमेदवारी दिलाने के लिए जोरदार आवाज़ें उठा रहे हैं।


विधानसभा अध्यक्ष मंदा माने ने संतोष मेढेकर को खुला समर्थन देकर उनकी मेहनत और जोगेश्वरी के विकास के लिए उनकी योग्यता की सराहना की है। माने का कहना है, "जोगेश्वरी का विकास संतोष के हाथ में है।"


इस उथल-पुथल के बीच, एक ओर उज्वला मोडक का पक्ष है, तो दूसरी ओर संतोष मेढेकर की बढ़ती लोकप्रियता। क्या जोगेश्वरी भाजपा के अंदर सब कुछ ठीक है? या फिर इस जंग का कोई नतीजा निकलने वाला है? जोगेश्वरी के नागरिकों की नज़र अब इस गंभीर विषय पर है, खासकर संतोष मेढेकर की संभावित भूमिका पर।


इस बीच, शिवसेना शिंदे गुट के साथ चल रहे संघर्ष ने भाजपा के भीतर और भी जटिलता बढ़ा दी है। ऐसे में, जोगेश्वरी के विकास के लिए सही निर्णय लेना अत्यंत आवश्यक है। क्या भाजपा इस बार संतोष मेढेकर के नेतृत्व में आगे बढ़ेगी? यह सवाल सभी के मन में है। 

मुंबई उत्तर-पश्चिममध्ये महाआरोग्य शिबिराची धूम, वायकरांचा अवयवदानाचा संकल्प!

वार्ताहर: संदिप कसालकर

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेत खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे भव्य विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ तब्बल 5 हजारांहून अधिक लोकांनी घेतला, ज्यात विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार, आणि औषधांचे विनामूल्य वाटप करण्यात आले.

शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे अवयवदानाचा संकल्प, ज्यात स्वतः खासदार रविंद्र वायकर यांनी सहभाग घेतला आणि अवयवदान फॉर्म भरून समाजासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. या शिबिरात दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर, वॉकर, चष्मे, आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.


शिबिरात आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि अ‍ॅलोपॅथिक उपचार पद्धतींचा समावेश होता, तसेच अस्थिरोग, मधुमेह, त्वचारोग, हाडांची तपासणी आणि इतर अनेक आजारांसाठी तज्ञ डॉक्टरांनी तपासण्या केल्या. शिबिराचे उद्घाटन खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले, आणि त्यांना रोटरी क्लब आणि इतर सेवाभावी संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले.

शिवसेनेच्या या उपक्रमामुळे लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी खासदार वायकर यांचे आभार मानले आणि अवयवदानासारख्या सामाजिक कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचा मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या 'युथ फेस्टिवल' मधे विजयाचा डंका..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
      
डोंबिवली : नव तरुणांचा उत्साह आणि नवीन कला कौशल्यामध्ये सळसळणारे रक्त विजयाची खात्री दर्शवते. दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी, मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या  ५७ व्या युवा महोत्सवामध्ये डोंबिवली शहरातील नामवंत 'वंदे मातरम्' पदवी महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर करून  अंतिम फेरीमध्ये अनुक्रमे  उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त करून वंदे मातरम् पदवी महाविद्यालय चे नाव मुंबई विद्यापीठात उंचावले.

नाट्य स्पर्धेमध्ये यश बडेकर, रोशन बर्डे, गौरी कागले, जया हलदार, सई कुडतुडकर, व कशिश मिश्रा यांचा सहभाग होता तर त्यांच्या साथीला आयुष सावंत, तन्मय वाडेकर, साहील सिंग होते. विद्यार्थी समन्वयक मयंक कोठारी व सव्या अंचन तसेच समन्वयक प्राध्यापिका मृणाल जाधव  यांनी दुवा सांधला. संपूर्ण टीमला विजय मिळवण्यासाठी या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले. एखाद्या स्पर्धेमध्ये जिद्दीने सहभागी होऊन व विजयाचे लक्ष्य केंद्रित करून आणि तो साध्य करून मिळवलेला विजय हा कितीतरी पटीने सगळ्यांनाच निस्वार्थी आनंद देणारा आहे, असे बोलून संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून यशाचा आनंद साजरा केला. संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व सहकार्य केलेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून विजयी पताका अशीच फडकवत ठेवा असा आशीर्वाद दिला. प्राचार्य डॉ. नाडर यांनी पण विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी विजयाचा चषक उंचावून केलेल्या अभिमानास्पद कामगिरीचा आलेख उंचावला.