BREAKING NEWS
latest

कल्याण ग्रामीण मध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार माजी आमदार सुभाष भोईर यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण ग्रामीण मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिक, भूमिपुत्र माजी आमदार सुभाष भोईर यांना 'महाविकास आघाडी' तर्फे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण मधील अधिकृत उमेदवार २०१४ चे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात काँग्रेस चे संतोष केणे, राष्ट्रवादी चे वंडारशेट पाटील व शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांच्या उपस्थित दाखल केला आहे.
                                                                     
सुभाष भोईर हे ६ वेळेस महापालिका मधून तर दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवीत आहे. कल्याण ग्रामीण मध्ये रस्त्यांच्या समस्या, पाणी समस्या, मुलांसाठी खेळाची मैदाने, बगीचे यासारख्या मोठ्या लोकोपयोगी समस्याचे निराकरण करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे समोर कोण उभे आहे याचा जास्त विचार न करता सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याकडे सोबत असंलेल्या घटक पक्षांना सोबत घेऊन आराखडा तयार असल्याचे आणि ही महाविकास आघाडी भक्कम असल्यामुळे इंजिन चा धूर निघतचं नाहीये त्यामुळे ही मशाल जी आहे ती धगधग करून विधानसभेत जाणार असल्याचे सुभाष भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांना संगितले.
कल्याण ग्रामीण मधील सध्या मनसेचे एकमेव विद्यमान आमदार प्रमोद (राजू दादा) पाटील यांच्या समोर यंदा मविआ चे तगडे आव्हान ठाकले असल्याचे बोलले जात आहे.

स्तन कर्करोगाने पिडीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी एम्स हॉस्पिटलचा “शक्ती” ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप उपक्रम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: स्तन कर्करोगाच्या  जनजागृती महिन्यानिमित्त 'एम्स हॉस्पिटल'ने स्तनाच्या कर्करोगाने पिडीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी "शक्ती" ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप तयार केला आहे. या उपक्रमाचा उद्देश हा रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचार प्रवासादरम्यान आधार देणे, त्यांना आजाराशी लढण्याकरिता प्रेरणा मिळावी याकरिता कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचाही यामध्ये समावेश असणार आहे. 
रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी अनोखा उपक्रम

या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सुमारे १५० कर्करुग्ण तसेच कर्करोगातून वाचलेले रुग्ण, कुटुंब आणि वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुहासी रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. सुप्रिया बांबरकर (संचालक- ऑन्कॉलॉजी विभाग, ऑन्कोसर्जन), डॉ. नीमेश लोध (ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट) डॉ. राकेश पाटील (वैद्यकीय आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. सागर गायकवाड (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट) आदी मान्यवर उपस्थित होते.
"शक्ती" सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून महिलांना स्तनाच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे, स्वयं-तपासणीला प्रोत्साहन देणे, निदान समजून घेणे आणि उपचारांसंबंधी माहिती पुविण्याचे काम केले जाते. भारतात सध्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून त्याविषयी जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. बऱ्याच स्त्रिया अनेकदा गाठ किंवा असामान्य बदल यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे निदानास विलंब आणि त्यामुळे गंभीर परिणाम होतात.
स्तनाचा कर्करोग हा देशभरातील महिलांना होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. दुर्देवीची गोष्ट म्हणजे, बऱ्याचदा सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते जसे की स्तनांच्या गाठी, स्तनाग्रांमध्ये बदल किंवा असामान्य वेदना याकडे फारसे गंभीरपणे पाहिले जात नाही. त्यामुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या "शक्ती” ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना त्यांचे अनुभव सांगणे तसेच मानसिकरिता पाठबळ मिळविण्यास मदत होते. 'एम्स हॉस्पिटल' मधील ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. नीमेश लोध यावर भर देतात की योग्य काळजी आणि पाठिंब्याने, उपचारानंतर बरेच लोक सामान्य आयुष्य जगु शकतात. ज्यांनी या आव्हानांचा सामना केला आहे त्यांचे खरोखरच कौतुक आहे.
"शक्ती" या आमच्या नवीन उपक्रमासह, आम्ही स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या भावनिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. आम्ही महिलांना स्वयं-परीक्षणासाठी आणि वयाच्या पस्तीशी नंतर नियमित मेमोग्राम करण्याचा सल्ला देतो. या प्रवासात कोणालाही एकटे वाटू नये हेच आमचे ध्येय आहे. एकत्रितपणे आम्ही एकमेकांना आधार देऊ शकतो. हे लक्षात असू द्या की, स्तनाचा कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास सकारात्मक उपचार करता येतात, त्यामुळे कधीही आशा सोडू नका अशी प्रतिक्रिया एम्स हॉस्पिटल, डोंबिवली येथील वैद्यकीय आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राकेश पाटील यांनी व्यक्त केली.
'एम्स हॉस्पिटल' केवळ रोगांवर उपचार न करता रुग्णांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठीही तितकेच प्रयत्नशील आहे. हा उपक्रम स्तनाच्या कर्करोगाचा सामना करणाऱ्या महिलांना या आजाराशी लढण्यासाठी आणि त्यावर मात करण्यास नक्कीच मदत करेल ही मला खात्री आहे अशी प्रतिक्रिया श्रीमती सुहासी रवींद्र चव्हाण (सामाजिक कार्यकर्त्या) यांनी व्यक्त केली.