BREAKING NEWS
latest

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासाठी आयोजित मेळाव्याला तुफान गर्दी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : राज्यसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली असतानाच डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मेळावा आजोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात लोकांनी 'आमच्या हाकेला धावून येणारा रवि दादा, तुला खूप खूप शुभेच्छा.. एकविरा आई तुला काहीही कमी पडू देणार नाही' असे आशीर्वाद देऊन आगरी समाजाच्या हजारो बंधू भगिनींनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना 'भारत माता की जय, जय श्रीराम' च्या घोषणा देऊन राज्यसभेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

त्या मेळाव्यात एका आजीने मंत्री चव्हाण यांना कमळ हातात देऊन "आणखी मोठा हो" असे सांगून भरभरून आशीर्वाद दिल्याने चव्हाण यांना भरपूर आनंद झाला. डोंबिवली पश्चिमेला ज्येष्ठ माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी चव्हाण यांच्या समर्थनार्थ रविवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्याला आगरी समाजाच्या बंधू भगिनींची तुडूंब गर्दी असल्याचे पहावयास मिळाले. जनार्धन म्हात्रे यांनी नवापाडा, सुभाष रोड भागात मेळावा घेतला होता.
जनार्दन म्हात्रे यांच्याकडील मेळाव्याला सभेचे स्वरूप आले होते, तर कृष्णा पाटील यांनीही जुनी डोंबिवली ग्रामस्थांच्या सहकार्याने 'वैभव हॉल' मध्ये प्रचंड गर्दी केली होती. रवींद्र चव्हाण यांचे म्हात्रे, पाटील कुटुंबियांशी अनेक वर्षांपासून ऋणानुबंध असल्याने रवि दादाची निवडणूक म्हणजे आपल्या घरचा विषय असल्याचे जनार्दन म्हात्रे यांनी सगळ्या उपस्थित बांधवांना आवाहन केले. दादा कधीही काही मागत नाही, पण आता आपण देऊ या आणि दादाला मोठं व्हायला मदत करूया असे कृष्णा पाटील म्हणाले.

मेळाव्याला जमलेल्या भगिनींनी भाऊबीज म्हणून रवी दादाला मतदान करणार असल्याचे सांगताच सभागृहात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि "रवि दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है" चा नारा देत सभागृह दणाणून गेले.

माजी आमदार सुभाष भोईर यांची कल्याण ग्रामीण मतदारसंघात परिवर्तन प्रचार रॅली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीमध्ये परिवर्तन प्रचार रॅली काढण्यात आली. डोंबिवली मानपाडा येथील आयोध्या नगरी येथून या प्रचार फेरीला सुरवात होऊन महावीर नगर, गांधीनगर सुभाष डेअरी, राही पार्क, महावीर हॉस्पिटल, पी.एन.टी कॉलनी, गांधीनगर चौक, गणेश नगर, आयकॉन हॉस्पिटल, आनंदनगर, पांडुरंग वाडी, मॉडेल गल्ली ते धर्मवीर आनंद दिघे सार्वजनिक वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कट्टापर्यंत ही प्रचार फेरी काढण्यात आली.

या प्रचार फेरीमध्ये ज्येष्ठ नागरिक, दुकानदार, फेरीवाले, इमारतीमधील नागरिक यांच्या गाठीभेटी घेवून महाविकास आघाडीची भूमिका समजावून सांगत महायुतीने केलेला विश्वासघात आणि झालेली फसवणूक दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांना निवडून देण्याचे तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले. या प्रचार रॅलीमध्ये संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, कल्याण ग्रामीण संपर्क प्रमुख अरविंद बिरमोळे, शहर प्रमुख अभिजित अशोक सावंत, युवा सेना जिल्हा अधिकारी प्रतिक पाटील, उपशहर प्रमुख वायकोळे, शहर संघटिका मंगला सुळे, उप शहर संघटिका स्मिता पाटील, शुभदा देसाई, उप विभागप्रमुख जगदीश जुलूम, विभाग प्रमुख मंगेश मोरे, उप विभाग प्रमुख रेवणकर, शाखाप्रमुख मंगेश सरमळकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील उबाठा पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी भरला आपला उमेदवारी अर्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी सोमवारी रथावर आरूढ होत काढलेल्या रॅलीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे पिताश्री तथा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, माजी आमदार आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा) उमेदवार सुभाष भोईर, वैशाली दरेकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, उबाठाचे तात्यासाहेब माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदू मालवणकर, लालबावटा आणि कम्युनिस्ट पक्षाचे तालुकाप्रमुख कॉम्रेड काळू कोमास्कर, दीपेश म्हात्रे यांच्या मातोश्री तथा माजी नगरसेविका रत्नाताई मात्रे आणि त्यांचे कुटुंब यावेळी उपस्थित होते.
दीपेश म्हात्रे यांनी गांवदेवी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीची सुरुवात झाली. जेष्ठ महिला-पुरुषांसह हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रॅलीत सहभागी झाले होते. रॅली सम्राटचौक मार्गे दीनदयाळ रोडवरून हॉटेल द्वारका चौक मार्गे कोपरब्रिज पार करून डोंबिवली पूर्वेत आली. पूर्वेतून केळकर रोड मार्गे इंदिरा चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर पुढे मानपाडा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना नतमस्तक होत त्यानंतर फडके रोड मार्गे गावकीच्या श्री गणेश मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन डोंबिवली विधानसभा क्षेत्र निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे आपल्या आमदारकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, डोंबिवलीचा विकास हाच एक मात्र माझा उद्देश आहे. शहराचा शाश्वत विकास हाच विषय निवडणूकच्या माध्यमातून आहे. रॅलीत "शिवसेना झिंदाबाद, उद्धवसाहेब आगे बढो हम आपके साथ है, महाआघाडी झिंदाबाद" अशा घोषणा देत शिवसैनिकांसह महाआघाडी घटक पक्षातील लोकांनी डोंबिवलीत मोठे शक्ती प्रदर्शन केले.

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दिलखुलास स्वभावाचा प्रभावामुळे डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव आणि जय हिंद कॉलनी मधील शेकडो उत्तर भारतीय बांधवांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  शहराच्या पश्चिम भागातील मोठागाव आणि जय हिंद कॉलनी विभागातील शेकडो उत्तर भारतीय बांधवांनी भारतीय जनता पक्षात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दिलखुलास स्वभावावर प्रभावित होऊन रविवारी जाहीर प्रवेश केला.
राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याच हस्ते प्रवेश करण्याच्या त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव राज्यभर प्रचारात व्यस्त असलेले मंत्री चव्हाण हे त्या सगळ्यांसाठी आवर्जून उपस्थित होते. मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाल्याची माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक, सरचिटणीस नंदू परब यांनी दिली. 
त्यामध्ये प्रमुख अनिल मिश्रा, अंबिका सिंग, ओम प्रकाश विश्वकर्मा, श्रीराम मिश्रा, कृष्णा मिश्रा, उमेश मिश्रा, दिनेश मिश्रा, राघवेंद्र मिश्रा, अजय शुक्ला, अभिषेक मिश्रा, अभिषेक सोनू, अभिषेक सिंग, नवीन शर्मा, विकास प्रजापती, दर्शन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीररित्या प्रवेश केला.
 त्यावेळी लोकसभा प्रभारी शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब,  दत्ता मळेकर, रवीसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर, मीतेश पेणकर, बाळा पवार उपस्थित होते.
भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, रविसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे यांनी या प्रवेश संदर्भात काही महिने विशेष प्रयत्न केल्याबद्दल मंत्री चव्हाण यांनी या सगळ्यांचे विशेष कौतुक केले. संघटना मजबुतीसाठी हे महत्वाचे पाऊल असून आलेल्या सगळ्यांचे स्वागत असून पक्षात एकदिलाने काम करून 'शतप्रतिशद भाजप' हे ध्येय असल्याचे मार्गदर्शन केले.

ज्यांनी स्वार्थासाठी विघातक प्रवृत्तींना जवळ केले, त्यांना त्यांची जागा दाखवा - मंत्री रविंद्र चव्हाण

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सन्मान करणारा आहे. मात्र भाजप परिवाराला सोडून जाणारे सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या सोबत जात आहेत. 'राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः' ही आमची भूमिका आहे, पण पक्ष सोडून जाणाऱ्या सहकाऱ्यांची भूमिका ही 'स्वतः प्रथम' अशी स्वार्थी भूमिका आहे. त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा !" असं आवाहन रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल करण्यात आला. त्यापूर्वी रत्नागिरी मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चव्हाण यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केलेल्या विधानाची देखील आठवण करून दिली. चव्हाण म्हणाले की अमित शाह यांनी पुण्यातील अधिवेशनात म्हटल्याप्रमाणे भाजप हा महायुतीतील मोठा भाऊ आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील आपल्याला ही मोठ्या भावाची भूमिका बजावायची आहे. महायुती म्हणून लढत असताना मनात एक आणि पोटात एक असं चालणार नाही. रत्नागिरी मतदारसंघातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. समन्वय असल्यामुळेच लोकसभेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांचा दणदणीत विजय झाला. आपल्याला महायुती म्हणून पुन्हा याचीच पुनरावृत्ती करायची आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकही जागा भाजपला मिळाली नाही, तरीही भाजपचा कार्यकर्ता महायुती सोबत राहिला हे सांगता आलं पाहिजे. त्यासाठी वीस तारखेपर्यंत रात्रीचा दिवस करा. महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी झाला पाहिजे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करा." असे आवाहन देखील मंत्री रवींद्र चव्हाणांनी  रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना केले आहे.
रविंद्र चव्हाण यांनी माजी आमदार बाळ माने यांचा खरपूस समाचार घेतला. "संघटनात्मक पातळीवर पक्षाने त्यांना अनेक पदं दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना त्यांना नेहमीच उजवं माप दिलं. आणि तरीही आज स्वार्थासाठी त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. तेव्हा कुठलाही भाजपा कार्यकर्ता त्यांची साथ देणार नाही." असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची '२७ गावातील सर्व पक्षीय हक्क संघर्ष समिती'च्या अध्यक्षपदी निवड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांची सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीचे पूर्वीचे अध्यक्ष गंगाराम शेलार आणि शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी संघटनेचे सर्व सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्यामुळे त्याच्यावर इतर सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची नव्याने अध्यक्षपदी निवड केली असल्याचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर २७ गांवातील स्वतंत्र नगरपालिकासह अनेक समस्या सुटव्यात याकरता आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांनी सांगितले. बुधवारी दुपारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. वंडार पाटील यांच्या कार्यालयात सर्व पक्ष संघर्ष समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित जमून भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची कल्याण ग्रामीण मधील '२७ गांव सर्व पक्षीय संघर्ष समिती'च्या अध्यक्ष पदी एकमताने निवड केली. त्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीकडून जोरदार झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी वंडार पाटील, सत्यवान म्हात्रे विजय भाने, रामदास काळण, दत्ता वझे, तुळशीराम काळण, वासुदेव संते, वासुदेव गायकर, शरद म्हात्रे, राम पाटील, युवा मोर्चा चे सुमित वझे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण ग्रामीणमध्ये २७ गावांची सर्व पक्षीय संघर्ष समिती आहे. ही समिती गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. या समितीने गांवे महापालिकेतून वेगळी करण्यासाठी लढा दिला होता. २००२ साली २७ गांवे महापालिकेतून वगळण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही गांवे २०१५ साली महापालिकेत समाविष्ट केली गेली. सदर गांवे महापालिकेत समाविष्ट करण्यास समितीचा विरोध होता. या गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी जोर लावून होती. २७ पैकी १८ गांवे वगळून त्याची नगरपालिका करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सद्याचे मुख्यमंत्री आणि खासदारांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी काही निर्णय घेतले, ते निर्णय राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे, मात्र आत्ता सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी भिवंडी चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची निवड करण्यात आली. नवे अध्यक्ष हे संघर्ष समितीचे प्रश्न सोडवितील अशी आशा आहे. 

मात्र गेल्या महिन्यापासून समितीमध्ये मतभेद असल्याचे चर्चा आहे. समितीचे पदाधिकारी गुलाब वझे आणि काही पदाधिकाऱ्यांची खासदार शिंदे यांच्याशी जवळीक आहे. यातील काही सदस्य अन्य पक्षाचे आहे. त्यामुळे स्थानिक सध्याच्या राजकारणाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे का अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. २७ गांव संघर्ष समितीच्या मार्फत २७ गावांचे रखडलेले विषय आणि सर्व नागरिकांची मागणी आहे की  आम्हाला वेगळी नगरपालिका असावी जेणेकरून या गावांचा व्यवस्थित पणे विकास व्हायला हवा. मला असे वाटतं हे लोकशाही राज्य आहे. लोकशाही राज्यामध्ये लोकांच्या मताला खूप महत्त्व असतं आणि जी महानगरपालिका बनते ही लोकांसाठी बनते, स्थानिकांचा विकासासाठी बनते आणि जर स्थानिकांची मागणी असेल तर नक्कीच शासनाने या मागणीचा विचार करायला हवा. आणि ते स्वतंत्र महानगरपालिका किंवा नगर पालिका याची निर्मिती करावी अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करत आहोत आणि हा सर्व ग्रामस्थांचा हक्क आहे आणि तो हक्क आपल्याला मागून मिळत नसेल तर त्याच्यासाठी लढा देखील उभारला आहे. या लोकांनी यासाठी अनेक वर्षे लढा दिला आहेत आणि नव्याने जे सरकार येईल या सरकारच्या माध्यमातून लोकशाहीने लोकांना लोकांच्या मताला महत्व दिल जाईल. नवीन महानगरपालिका अस्तित्वात येईल असा विश्वास खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

सुलभा गणपत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज विनोद तावडे आणि राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : सुलभ गणपत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज महापालिकेच्या 'ड' प्रभाग कार्यालयात केंद्रातील भाजप वरिष्ठ नेते विनोद तावडे, राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी उत्पादनशुल्क मंत्री तसेच ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, उल्हासनगर चे आमदार कुमार ऐलानी यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याने परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. प्रवाश्यांना वाहतूकची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस अथक परिश्रम घेत होते.
आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रती येथील जनतेचा असलेला विश्वास आणि सुलभा गायकवाड यांनी वाढवलेला जनसंपर्क या मुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतीत असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
राज्यातील महायुतीच्या माध्यमातून १४२ - कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. सुलभा गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी प्रभाग 'ड' कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या पूर्वी तिसाई हाऊस ते प्रभाग 'ड' कार्यालय या दरम्यान युतीच्या अनेक गणमान्य नेत्यांच्या उपस्थितीत भव्य अशी शक्तीप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार कपिल पाटील, भाजपा नेते विनोद तावडे, आमदार कुमार आयलाणी, दलीत मित्र अण्णा रोकडे, कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या सह सुमारे ८ हजाराहून अधिक महायुतीचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते .
मोठ्या उत्साही वातावरणात आणि ढोल ताशांचा गजरात, डिजे, चित्र रथ, त्याच बरोबर विविध जाती धर्मातील ताल वाद्यांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत आमदार गणपत गायकवाड यांचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
या समयी प्रसार माध्यमांशी बोलतांना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की गेली अनेक दशके या मतदार संघात सेना-भाजपाची युती आहे, आमदार गणपत गायकवाड यांचा प्रचंड असा जनसंपर्क आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सुलभाताई गायकवाड ही निवडणूक लढत असल्याने त्यांचा विजय नक्की आहे या रॅली दरम्यान कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.