BREAKING NEWS
latest

सदानंद थरवळ आणि माझे वर्षानूवर्षांचे ऋणानुबंध असून त्यांचा आशीर्वाद मला मिळाला - रविंद्र चव्हाण

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : माझे आणि सदानंद थरवळ यांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध असून ते माझा निवडणूक अर्ज भरण्याच्या वेळी नेहमीप्रमाणे यंदाही आले, याही वेळी त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला. त्यांनी मैत्री सदैव जपली. त्यांच्यासह माझ्यावर प्रेम करणाऱ्या हजारो डोंबिवलीकर नागरिकांनी मंगळवार २९ तारखेला अर्ज भरण्यापूर्वी आवर्जून येऊन माझा आत्मविश्वास वाढवला.
नागरिकांचे वाढते प्रेम आणि आपुलकी याने मला उत्साह मिळतो, माझ्यात चैतन्य पसरते. थरवळ कुटुंबीयांनी मला नेहमीच सहकार्य केले आहे. आताही निवडणूकित जे सहकार्य लागेल ते मित्र म्हणून करण्याचे त्यांनी सांगून त्या सगळ्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आभार मानले.
थरवळ यांना माझ्या सोबत रहा असे म्हणताच आमच्यात प्रचंड हशा पिकला. आमच्या मैत्रीचा दुवा असलेले आमचे विधानसभा संघटक, ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले यांनीही मला नेहमीच भरपूर सहकार्य केले आहे. त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी मंत्री मार्गदर्शक जगन्नाथ पाटील, शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगरसेविका मनीषा धात्रक, मंदार हळबे, माजी  महापौर विनीता राणे, विकास म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, विश्वनाथ राणे, निलेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर, खुशबू चौधरी, मितेश पेणकर, मंदार टावरे, विश्वदीप पवार, रविसिंग ठाकूर, दिनेश दुबे, कृष्णा पाटील, कृष्णा परुळेकर, मनीषा छल्लारे, यांसह जैन समाज, आगरी समाज, व्यापारी महामंडळ, लेवा समाज, ब्राह्मण ज्ञाती समूह, युवा मोर्चाचे सर्व प्रतिनिधी आदींसह डोंबिवलीकरांनी तुडूंब गर्दी केली होती. प्रसार माध्यमांनी आवर्जून येऊन मला सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचे मंत्री चव्हाण यांनी जाहीर आभार मानले.