BREAKING NEWS
latest

गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी शिवसेनेकडून २३३ बस रवाना..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले. बुधवारी कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहर आणि उल्हासनगर येथून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत २३३ हून अधिक बस रवाना केल्या गेल्या.

खासदार शिंदे यांनी सांगली येथून ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्व बसला भगवा झेंडा दाखवला. दिवा, कल्याण पूर्व आणि अंबरनाथ येथून सुमारे २९१ बस रवाना झाल्या.

पश्चिम महाराष्ट्रातही रवाना झाल्या बस

सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी, लांजा, खेड, चिपळूण, कुडाळ, मंडणगड, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर यासह कोकणातील विविध ठिकाणी बस रवाना करण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बस रवाना करण्यात आल्या आहेत, या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, रवी पाटील यांच्यासह शिवसेनेचे संतोष चव्हाण, नितीन पाटील, संजय पावशे, जनार्धन म्हात्रे आदी उपस्थित होते.

भारतीय चलनाच्या बदल्यात परदेशी चलन देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिबली : मानपाडा पोलीस ठाण्यांच्या हददीत सुदामा नगर, एमआयडीसी फेज ०२, डोंबिवली पुर्व येथे राहणाऱ्या औषध विक्रेता यांना दिनांक ३१/०८/२०२४ रोजी तीन अनोळखी इसमांनी भारतीय चलनाचे एकुण १२ लाख रूपयांच्या बदल्यात दुबई देशाचे चलन असलेले एकुण ७०० दिराम देतो असे सांगुन फिर्यादी यांच्या कडुन भारतीय चलनाचे एकुण ४ लाख रूपये घेवून त्याबदल्यात फिर्यादी यांना दिराम न देता कागदी रददी बंडल देवुन ते पैसे असल्याचे भासवुन फिर्यादी यांची फसवणुक केली असल्याने फिर्यादी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यांत दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजी नंबर १००७/२०२४ बी.एन.एस कलम ३१८ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळया टिम तयार करण्यात येवुन गुन्ह्यातील आरोपी यांचा सर्वोत्तपरी शोध घेण्यांत आला. गुप्त बातमीदार तसेच आरोपीच्या वर्णनानुसार आरोपीचा शोध घेण्यात येत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गुप्त बातमी वरून त्यांनी निसर्ग हॉटेल, खोणी पलावा परिसरात सापळा रचला असता दोन संशयीत इसम यांना जागीच पकडुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हददीत त्यांच्या साथीदाराच्या मदतीने फसवणुक करून चोरी केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यात आरोपी नामे १) मोहम्मद सोहेल हसमुददीन शेख (वय: ३० वर्षे) व्यवसाय कॅफे, रा. नेवाळी नाका हनुमान मंदिरजवळ, चाळ नं २, रूम नं. १३४, नेवाळीगाव ता. अंबरनाथ जि. ठाणे मुळगाव वी २८८, गल्ली नं ७, कावलनगर, जि. खजूरी नवी दिल्ली, २) मोहम्मद अबुबकर रज्जाक चौधरी (वय: ४१ वर्षे) व्यवसाय बिगारी रा. नेवाळी नाका हनुमान मंदिरजवळ, चाळ नं २, रूम नं १३४, नेवाळीगाव ता. अंबरनाथ जि. ठाणे मुळगाव खिलीमीस्ताव डालामिन उत्तर दिल्ली यांना अटक करण्यात आलेली असुन सदर आरोपीत यांचेकडुन १,७८,०००/- रूपये रोख रक्कम, एक युनायटेड अरब अमिरात सेंट्रल बँक नावे असलेली शंभर रूपये किंमतीचे दिराम व दोन मोबाईल फोन असे जप्त करण्यांत आलेले आहे. नमुद आरोपी यांचा एक साथीदार याचा शोध घेण्यात येत आहे. सदर कारवाईत मानपाडा पोलीस ठाणे पोलीसांनी  फसवणुक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ - ३ कल्याण, सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुहास हेमाडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सपोनि. संपत फडोळ, महेश राळेभात, प्रशांत आंधळे, सपोउपनि. भानुदास काटकर, पोहवा/राजकुमार खिलारे, पोहवा. शिरीष पाटील,.सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, दिपक गडगे, निसार पिंजारी, पोना. गणेश भोईर, प्रविण किनरे, यल्लापा पाटील, देवा पवार, अनिल घुगे, रवि हासे, पोशि. अशोक आहेर, विजय आव्हाड, महेद्र मंझा, नाना चव्हाण, घनश्याम ठाकुर यांचे पथकाने केलेली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा आणि तिमिरा कडून तेजाकडे नेणारा म्हणजे शिक्षक होय. दिनांक ५ सप्टेंबर म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती व हाडाचे शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म दिवस, तोच शिक्षक दीन म्हणून जगभर साजरा केला जातो. 'जे एम एफ' संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिरमधे देखील शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांची भूमिका साकारली होती. लहानपणापासूनच शिक्षक होण्याचे स्वप्न सर्वच मुलांचे असते, आपल्या आवडत्या शिक्षकांसारखे शिक्षक व्हावे असे वाटते आणि निरीक्षण करून शिक्षक दिनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार झाले व सर्व छोट्या मुलांना वर्गात जाऊन शिकवणे ही त्यांच्या साठी आनंदाची पर्वणीच ठरली. सर्व विषयांचे शिक्षक शिक्षिका तर अगदी शिशु विहार मधील छोटी मुले देखील संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला चे शिक्षक झाले होते.
संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचे व्यक्तिमत्त्व तर नेहमीच सर्व मुलांना प्रेरणादायी ठरते, त्यांच्या व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्वातील झलक थोडीफार तरी आपल्यामध्ये असावी असे सर्वांना वाटते, त्यामुळे आजच्या शिक्षक दिनी संस्थापक आणि सचिव हे व्यक्तिमत्त्व साकारायला मिळाले म्हणून विद्यार्थी गर्वात होते. संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्वच मुलांचे जातीने हजर राहून कौतुक केले. सर्व शिक्षकांच्या भूमिका आत्मविश्वासपूर्वक साकार केलेल्या विद्यार्थ्यांबरोबर कर्मचारी कक्षात बैठक घेतली व सर्वांबरोबर अल्पोपहार घेतला.
मी प्रथम एक शिक्षक आहे व नंतर 'जे एम एफ' शिक्षण  संस्थेचा संस्थापक आहे, आज शिक्षक म्हणून मला तुम्हा सर्वांचा सार्थ अभिमान वाटतो, की विद्यार्थीदशेत असतानाही तुमच्यामध्ये आदर्श शिक्षकाचे गुण आहेत, आज तुमच्या प्रत्येकात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा दडलेली आहे, मी आशा करतो की यामधूनच भविष्य काळात भावी राष्ट्रपती, शिक्षक, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन नक्कीच उदयास येतील. असे प्रेरणादायी उद्गार काढून सर्वांना भेटवस्तू, प्रशस्तीपत्रक व शुभेच्छा दिल्या.
'जे एम एफ' संस्थेच्या मधुबन वातानुकुलीत दालनांत सर्व शाळा, महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिन म्हणून सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील ८९ वर्षीय आदर्श शिक्षिका श्रीमती तुळसाबाई लाकडे यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व मान्यवर अतिथी यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्रीमती तुळसाबाई लाकडे ह्या स्वतः हाडाच्या शिक्षिका असून डॉ.श्री व सौ कोल्हे यांच्या देखील शिक्षिका होत्या. डॉ. राजकुमार कोल्हे आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी श्रीमती तुळसाबाई लाकडे यांचे पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन स्वागत केले तर श्रीमती तुळसाबाई यांनी दोघानाही भरभरून आशीर्वाद दिला व त्यांच्या ८९ वर्षातला प्रवासाचा एक शिक्षक म्हणून अनुभव सांगितला.
डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी शिक्षक कसा असावा तर, आपली तत्वे विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने न थोपावता येत्या काळाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी दिलेली शिकवण म्हणजे तो खरा शिक्षक. असे सांगून शिक्षकांबद्दल आदरयुक्त भीती ही असलीच पाहिजे असे मत व्यक्त केले. शिक्षक दिना चे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या शिक्षकांना 'शिक्षा रत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याच बरोबर सर्व शिक्षकांना कुटुंबासमवेत एक दिवसीय सहलीचे आयोजन करून कूपन देण्यात आले. वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

डोंबिवलीतील 'होली ऍंजेल्स' शिक्षण संस्थेत २०२४-२०२५ करिता 'के.जी' ते 'पी.जी' प्रवेश प्रक्रिया सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली सारख्या शैक्षणिक व सांस्कृतिक दुष्ट्या प्रगत असलेल्या शहरात चांगल्या डिग्री महाविद्यालयांची कमतरता भासत असून उत्तम शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजेस ची संख्या पूरेशी नाही. स्थानिक विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई व इतरत्र जावे लागते. ही उणिव पूर्ण करण्याच्या उद्देशाने 'ट्रीनिटी एज्यूकेशन ट्रस्ट' संचालित 'हॉली ऍंजेल्स' विद्यालय आणि महाविद्यालय चे मा.अध्यक्ष डॉ. ओमेन डेव्हीड यांनी उच्च शिक्षणासाठी 'डॉ. डेव्हीड कालेज' ची स्थापना केली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून 'होली  ऍंजेल्स' शाळेचा रिझल्ट सातत्याने १००% लागत आहे अर्थातच गुणवत्तेविषयी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. शालेय व ज्युनियर कॉलेज स्तरावर जी गुणवत्ता आम्ही आजवर जोपास‌ली तीच गुणवत्ता यापुढे आम्ही नव्याने सुरू केलेल्या डिग्री कॉलेज ची ही  राखण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. २०२४-२५ पासून हे कॉलेज सुरू होत आहे व शिक्षणाच्या या सेवा हेतूने मा.अध्यक्ष डॉ. ओमेन डेव्हीड यांनी बघित‌लेले 'के.जी' टू 'पी.जी' चे स्वप्न एकाच छत्राखाली पूर्ण होत आहे.

त्याचप्रमाणे यावर्षी अर्थात २०२४-२५ साठी ज्युनिअर आणि सिनिअर के.जी ची प्रवेश प्रक्रिया आम्ही १५ ऑगस्ट २०२४ पासून सुरु करत असल्याची माहिती मा.अध्यक्ष डेव्हीड यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

गंभीर गुन्ह्यातील मोका कायद्यांतर्गत कारवाईत फरार असलेले दोन आरोपी कल्याण गुन्हे शाखेकडून जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३०:  गुन्हे शाखा युनिट -३ कल्याण चे सपोउनि. दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत दि. ३०.०८.२०२४ रोजी दुपार दरम्यान बातमी मिळाली की, साल २०२२ मध्ये राहुल पाटील राहणार आडीवली यांच्यावर व त्यांच्या साथीदारावर अंबरनाथ येथील एमआयडीसी कार्यालयासमोरील सुदामा हॉटेल जवळ बैल गाडी शर्यतीच्या बाबतीत चर्चा करायची आहे असे प्लॅनिंग करून त्यांना जिवे ठार मारण्याचा कट रचून रिव्हॉल्वर व बंदूकानी अंधाधुंद फायरिंग करून खून करण्याचा पंढारीनाथ फडके व त्यांचे इतर साथीदारांनी प्रयत्न केला होता. त्या संदर्भात शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंबरनाथ येथे गुन्हा दाखल आहे. 

त्या गुन्ह्यातील काही आरोपी पकडले गेले असून काही आरोपी अद्यापर्यंत फरार आहेत. त्यापैकी फरार असलेले व मोका अंतर्गत कायद्याच्या कारवाईत पाहिजे असलेले महत्त्वाचे दोन इसम किरण गायकवाड राहणार देसले पाडा डोंबिवली पूर्व व दुसरा दिपेश जाधव राहणार वडवली मानपाडा डोंबिवली पूर्व हे कुठेतरी बाहेर जाण्यासाठी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान मानपाडा शीळ रोड येथे रुणवाल गार्डनच्या गेट समोर डोंबिवली पूर्व येथे भेटणार आहेत. त्यांची वर्णनानुसार खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट -३ कल्याण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना कळविताच त्यांनी तात्काळ विलंब न लावता ते स्वतः व सपोनि. संतोष उगलमुगले, सपोउनि. दत्ताराम भोसले, पोहवा. विलास कडू, विश्वास माने, उमेश जाधव, गुरुनाथ जरग, बोरकर (चालक) असे पथकासह बातमी मिळाल्या ठिकाणी सापळा लावला असता बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे सदर दोन्ही इसम त्या ठिकाणी आले असता पोलीसांना पाहून कावरे बावरे होऊन ते पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पळून जाण्याचा मोका न देता घेराव करून जागीच पकडले. 
त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव १) किरण अशोक गायकवाड (वय: ३५ वर्षे) राहणार देसले पाडा भोपर रोड, डोंबिवली पूर्व, व २) दिपेश तुळशीराम जाधव (वय: ३० वर्षे) राहणार आडवली खुर्द, मानपाडा डोंबिवली पूर्व, असे सांगितले. त्यांना पोलीसांनी कार्यालयात आणून अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याची कबूली दिली असून इसम किरण अशोक गायकवाड हा मानपाडा पो.स्टे. च्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून पोलीसांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ येथे संपर्क साधून चौकशी केली असता शिवाजी नगर स्टेशन गु.र.नं. ४०३/२०२२, भा.दं.वि. कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ५०६, ५०६(२)४२७, १२०(ब) सह शस्त्र अधिनियम कलम.३,२५, म.पो.का. कलम ३७(१)१३५ या गुन्ह्यात दोन्हीही आरोपी हे गेले दिड वर्षा पासून फरार (वॉन्टेड) आरोपी असून सदर वरील गुन्ह्यात निष्पन्न झाले. तसेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम १९३२ चे कलम ७ सह,महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३(१), ३(२), ३(४) (मोका) अंतर्गत कायद्या प्रमाणे कारवाईत पण वरील दोन्हीही आरोपी पाहिजे असून सदर वरील दाखल गुन्ह्याचा तपास मा.सहा.पोलीस आयुक्त सो.अंबरनाथ विभाग/अंबरनाथ यांचे कडे असून पुढील कारवाई करिता गुन्हे शाखा युनिट -३ कल्याण यांनी रिपोर्टसह आरोपीना ताब्यात देण्यात आले आहे.

'जे देखे रवि' या सन्मानग्रंथाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३१: राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जीवनावर आधारित मोरया प्रकाशन प्रकाशित 'जे देखे रवि' या सन्मानग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात  राजकीय समीक्षक तसेच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैलीत त्यांचा स्वभाव याबद्दल लिखाण केले आहे. त्याद्वारे रवींद्र चव्हाण यांच्यावर आधारित 'जे देखे रवि' या सन्मानग्रंथाचे प्रकाशन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 
या शहराने मला भरपूर प्रेम दिलं या सांस्कृतिक संस्कारमय शहारामुळे मी आमदार झालोय, आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परम वैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार आचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन असे विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कोणत्याही राजकीय पक्षाची पाळंमुळं ही त्या पक्ष कार्यकर्त्याच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतात. याठिकाणी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासाठी उपस्थित आसलेल्या जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे स्पष्ट होते. तसेच त्याआधी माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते. त्यांनी केलेल्या चांगल्या कार्यामुळे पक्षाला रवींद्र चव्हाण मिळाले. मला सगळ्यात कौतुकाचं वाटलं की त्या समारंभाचा शेवट झाला शिवाय एका गोविंदा दही हंडी पथक त्या लोकांनी पंचावन्न हजाराची गणेश मंदिर संस्थानाला देणगी दिली. माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी आहे की आज सगळीकडे मागितलं जात असताना देणारे कोणीतरी समोरून आले. रवींद्र चव्हाणांनी देणारे लोकं तयार केले असतील तर माझ्या मते त्यांनी मोठं काम केलं आहे. नाहीतर राजकीय नेते हे फक्त हात पसरवून मागायला शिकवतात. कोणीतरी एकजण असा नेता दिसला की ज्याने द्यायचं शिकवलं हे माझ्या दृष्टीने रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केलेलं मोठं काम आहे असे राजकीय समीक्षक तसेच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी बोलताना सांगितले.
या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, सुधीर जोगळेकर, मोरया प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन, श्रीकांत कोजेवार, श्रीराम शिदये, माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर, सुरेश देशपांडे, श्रीगणेश मंदिर संस्थान चे अध्यक्षा अलका मुतालिक, आमदार कुमार ऐलानी, 'ऊर्जा फाउंडेशन' च्या स्नेहल दीक्षित, माजी नगरसेवक  राहुल दामले, शशिकांत कांबळे, भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, उपाध्यक्ष हरीश जावकर, ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे, वर्षा परमार, पूनम पाटील, 'कामा' संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, राजू बेल्लूर आदी मान्यवर तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून भाऊ तोरसेकर यांचे राजकारण आणि समाजकारण या विषयावर त्यांचे विचार ऐकले.

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांवर नव्याने गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  ऍडव्होकेट शेखर जगताप, सेवानिवृत्त एसीपी सरदार पटेल, पीआय मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल अशी या प्रकरणातील सहआरोपींची नावे आहेत.

सदर व्यक्तींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत पुढील विविध गंभीर गुन्ह्यांचा आरोप लावण्यात आला आहे.

१६६(ए): कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने सार्वजनिक सेवक कायद्याचे उल्लंघन करणे.
१७०: सरकारी सेवक असल्याचे भासवणे
१९३: खोट्या पुराव्यासाठी शिक्षा.
१९५: गुन्ह्याबद्दल दोषी ठरविण्याच्या हेतूने खोटे पुरावे देणे किंवा बनवणे.
१९९: घोषणेमध्ये केलेले खोटे विधान जे कायद्याने पुरावा म्हणून प्राप्य आहे.
२०३: केलेल्या गुन्ह्याबद्दल खोटी माहिती देणे.
२०५: एखाद्या कृत्यासाठी किंवा खटला किंवा खटला चालवण्याच्या उद्देशाने खोटे व्यक्तित्व.
२०९: अप्रामाणिकपणे न्यायालयात खोटा दावा करणे.
३५२: गंभीर चिथावणी देण्याऐवजी हल्ला किंवा गुन्हेगारी शक्तीचा वापर.
३५५: गंभीर चिथावणी देण्यापेक्षा, व्यक्तीचा अपमान करण्याच्या हेतूने हल्ला किंवा गुन्हेगारी शक्ती.
३८४: खंडणीसाठी शिक्षा.
३८९: गुन्ह्याच्या आरोपाच्या भीतीने व्यक्तीला, खंडणीसाठी लावणे.
४६५: खोटेपणासाठी शिक्षा.
४६६: कोर्टाच्या रेकॉर्डची किंवा सार्वजनिक नोंदवहीची खोटी.
४७१: बनावट दस्तऐवज अस्सल म्हणून वापरणे.
५०६: गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा.
आज करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. कारण यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.